बोटळर वेंकटसामी आणि त्यांचे खीड्डपप्प्स्
Posted
1 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
1 वर्ष ago
पिवळे पडलेले जाड, पण जीर्ण कागद. साधारण वहीच्या पानाच्या आकारचे, पण अरुंद. कधीकाळी एका बाजूनं ते जाड दोर्यानं एकत्र शिवले असावेत, अशा खुणा. पहिल्या पानावर बाळबोध देवनागरीत काहीतरी लिहिलंय, पण ते आता वाचता येत नाही. शाई पुसली गेली आहे. कोपर्यात तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयाचा अतिपुसट शिक्का. त्या खाली जाड, काळ्या पेनानं लिहिलंय - D. No. 2644 ; MS 2319. ’इंग्रजी जेवण्याचे जिनस करावयाची पद्धती’, हा तपशील ग्रंथालयाच्या सूचीत अधिकचा. हीच या हस्तलिखिताची ग्रंथालयातली ओळख.
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा