मुळात माझा स्वभाव खूप मित्र जमावणारा नाही. काही मोजकेच क्लोज फ्रेंड्स आहेत. कायप्पा वर बोलणे चालू असायचे. बरेचदा भेटी गाठीही. पण गेल्या काही महिन्यापासून हे मित्र मैत्रीण नकोत अशी फीलिंग्स येत आहेत. यात त्यांनी लांब जाण्याऐवजी त्यांचे विचार ऐकून धक्का बसत आहे. काही दोस्तांच्या मनात किती विखार भरला आहे हे आजकाल जाणवते आहे. अजून भांडण नाही झालेय पण हे अशा विचारांचे लोक आपले इतकी वर्षे मित्र होते ह्या विचाराने खूप त्रास होतो आहे. मैत्री पूर्ण तोडावी का नाही हे कळत नाही. मतभेद राजकारणातले तर आहेतच, एखाद्या प्रवृत्तीविरुद्धही आहेत. वयाप्रमाणे लोक बदलतात व विचित्र वागतात हेही माहित आहे.
कुहु - नाव अधिक गोड का ती अधिक गोड असा संभ्रम पडावा अशीच होती कुहु. मनमिळाऊ असुनही मनस्वी बनण्याकरता लागणारा आग्रह होता तिच्या वागण्यात. पण मी अशी भूतकाळात का तिचा उल्लेख करते आहे प्रश्न पडला ना तुम्हाला. कळलेच ते. तशा मला बर्याच मैत्रिणी होत्या. काये ना नेटवर्क पाहीजेच. कोण कधी उपयोगी पडेल सांगता थोडीच येते! लोकसंग्रहाचा कसा फायदा करुन घ्यायचा ते कौशल्य शिकून थोडीच येते?
पैठणी म्हंटलं की प्रत्येकीच्याच काही आठवणी असतात. त्यात लग्नसराई असली की प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नातली पैठणी खुणावत असते. कधी मैत्रिणीच्या लग्नातली, कधी आजीच्या आठवणीतली तर कधी चालत चालत दुकानाच्या काचेत बघितलेली पैठणी मनात घर करून असते. शालूच्याही मनात अशीच एक पैठणी होती- तळहातावर मेंदी खुलल्यावर येणाऱ्या रंगाची. लहानपणी जेव्हा आईनी तिच्या शालूचं वर्णन करून सांगितलेलं, तेव्हापासूनच तिनं ठरवलेलं की तिचं जेव्हा केव्हा लग्न ठरेल तेव्हा चक्क आधी मेंदी काढायची, ती गडद रंगली की मग खरेदी करायची - अगदी हुबेहूब त्याच रंगाची पैठणी घ्यायची! कोणी हसलं, तऱ्हेवाईक म्हंटलं तरीही...
त्या दिवशीची लांबलचक पसरलेली दुपार संपवायला एखादा चांगला मूव्ही मिळतोय का, ते शोधत शोधत
शेवटी तो 'जैत रे जैत'पाशी थांबतो..!
मग बेडवर अस्ताव्यस्त लोळत पडून बघत असतानाच,
पुढे त्यात एक असा सीन येतो की स्मिता पाटील मोहन आगाशेंच्या दंडाला चावते आणि विचारते,
"माशी चावलेली चालती आन् मी चावलेली चालत नाय व्हय?"
तर त्या सीनमध्ये स्मिता पाटील जो एक मिश्किलीत भिजून आर्द्र झालेला, मऊ सूर लावते,
त्यामुळे इकडे त्याच्याही आत कसलीतरी ओळखीची
सळसळ नकळत निर्माण व्हायला लागते..!
कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आईकडं दुडूदुडू धावत येतं आणि
पिल्लाची आई त्याच्यावर पाखर घालते,
असं काही दिसलं की त्याच्या पोटात तुटतं..!
आपल्यालाही आई आहेे, हे त्याला आठवतं.. आणि काही दिवस तो विस्कटून जातो..!
मग त्याला सांगावं लागतं की असं करू नये अरे...
एवढं तोडू नये..बोलावं अधूनमधून घरी..
विचारपूस करावी सगळ्यांची...
स्वतःबद्दल काही सांगण्यासारखं नाही, असं वाटत असेल, तरीही ठीक आहे..
पण किमान एवढं तरी सांगू शकतोसच की बरा आहे मी,.. काळजी करू नकोस.. होईल माझं सगळं व्यवस्थित...!
एवढंही खूप असतं आयांना..!!
मध्यंतरी एका सिनेमात सॅन अँटॉनिओचा उल्लेख आला आणि नवरा म्हणाला - सॅन अँटॉनिओ! तुझं घर. मी त्याला उत्तर दिलं - तुम्ही दोघं जिथे आहात ते माझं घर. बाकी ठिकाणचं नाईलाजाचं वास्तव्य. आपणच आपल्याला चकित करतो असे काही क्षण असतात. हा क्षण त्यातलाच एक. मला घराचा तो मुद्दा माहीतच नव्हता ... निदान मूर्त मनाने तसा कधी विचार बोलून दाखवला नव्हता. अमूर्त मनातूनही काही उद्गार उमटतात का? फ्रॉईडने म्हटलेले आहे - स्लिप ऑफ टंग असे काही नसते. पटकन निघणारे चूकीचे उद्गारही - अमूर्त मनाच्या पातळीवरील काही वैशिष्ट्ये बरोबर घेउन येतात.
शब्द दाराजवळी येऊनि वाट विसरले काही ।
हरवलेल्या शब्दांचा तो गाव दूरच राही ।
गावामध्ये सगळे होते सोडूनि शब्द काही ।
त्या गावाची खासियत त्या गावाच्या लोकांमध्येच येई ।
सुख दुःख होते सोबती शेजारीच घर त्यांचे ।
मध्ये येऊनि वसली नियती दोघांवर हुकूम जिचे ।
जय पराजय एकामागे एक वसले होते ।
गर्वाचे घर आडवे येता घर पराजयाचे भासे मोठे ।
आपले सगळे सोबती आनंदाने नांदती ।
अहंकार शिरता मध्ये मी आणि ते आपल्यातून वेगळे होती ।
माया मोह यांचे घर गावात उठून दिसे ।
आपुलकी मात्र त्या घरासमोरी तळ ठोकून बसे ।
खिडकीच्या काचेवर ओघळणारे पाणी जरा स्तब्ध झाले ।
ना ठाऊक कोणते प्रश्न मागे ठेऊन गेले ।
ना जाणे प्रश्नच होते की उत्तरे होती काही ।
समजण्यासाठी त्या क्षणी भान ही नाही ।
भेभान होती स्पंदने बेभान विचार होते ।
खरेच होते सर्व की जग हे भासाचे ।
डोळ्यांत ओल,त्या मनात खंत होती ।
खळाळणार्या नदी सारखी ती पण आज पाऊस असून शांत होती ।
ओसरणारा पाऊस अन डोळे दाटून आणणारी आठवण सगळे स्तब्ध होते ।
बघून हे सर्व मेघांचेच डोळे आज भरभरून रडत होते ।
सरायला आली सांजवेळ काळोख दाटलेला नभी।
चाहूल वेचायला मात्र अजूनही ती खिडकीत तशीच उभी ।
तू मुलींना आवडत नाहीस. कितीही कडू असली तरी हीच fact आहे. ती तुला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नाही. तुझे वागणे चांगले आहे. तुझे बोलणे चांगले आहे. तुझे विचार चांगले आहेत. तुझा व्यक्तिमत्व चांगले आहे. तुझे सगळे चांगलेच आहे. परंतु.............
तू मुलींना आवडत नाहीस
माईंची एकसष्टी.
"मी आणि माझी छोटी बहीण अमृतवल्ली यांचं शिक्षण फार कष्टात झालं. आमच्या मोठ्या काकांनी आमची सगळी इस्टेट बळकावली आणि आम्हाला घराबाहेर काढलं. बाबा एका छोट्याश्या कंपनीत स्टोअर कीपर म्हणून काम करायचे. आम्ही लहानपणी बरेच हाल सोसले. आई इतरांच्याकडे स्वैपाक करायला जायची. अशा परिस्थितीत माझं शिक्षण झालं. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. केलं आणि आणि नंतर शिमोगा इथल्या एका कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून मी नोकरीला सुरुवात केली. अमृतवल्लिने ही तेच केलं आणि त्यानंतर आमच्या घरात थोडीशी आर्थिक सुबत्ता आली."