हे कितपत खरंय ?
.
.
मम आत्मा गमला..१
***********
एकामागोमाग गाणी सुरु होत होती, सरत होती आणि इथे मला किती तरी, काय काय आठवत होतं.. एका आठवणीतून दुसरी निघावी, दुसरीतून तिसरी.. रेशमाची लड अलगद उलगडत जावी तसं. मनापासून तल्लीन होऊन, आरामखुर्चीवर रेलून गाणी ऐकण्यात मग्न होउन गेलेले अण्णा आठवले.. "अगं, भांडी घासून विसळताना आणि ठेवताना आवाज करु नको गं! हे बालगंधर्वांची गाणी ऐकतायत ना, हळू आवाज कर.. " म्हणत आमच्या घरच्या कौसल्यामावशींना हलकेच दटावणारी वैनी आठवली.
मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघानी आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले.
मी सुरभी. व्यवस्थापन शास्त्रातली मास्टर्स पदवी घेतलीये. एका MNC मध्ये उच्च पदावर २/३ वर्षे नोकरी केली. नवरा software engi तो ही एका MNC मध्ये आहे. कामाच्या निमीत्तानी दोघेही १२/१३ तास घराबाहेर असायचो.
संगिताची आवड - माझा अत्यंत आवडीचा विषय.
माझ्याबाबतीत, माझ्या भावाच्या बाबतीत आणि माझ्या लेकाच्या बाबतीत काय उपयोगी पडलं ते सांगणार आहे इथे.
त्याआधी हे ही सांगणं आवश्यक की माझा भाऊ उत्तम हार्मोनियम, तबला, बासरी वाजवतो. त्यापैकी फक्त तबला थोडाफार शिकलाय.
मी तबला वाजवते (बहुतेक बर्यापैकी ), हार्मोनियम शास्त्रोक्त गायकाला साथ करता येईल इतपत. तबल्याच्या योगे ढोलकी आणि ढोलक सारखी वाद्य वाजवता येतात. भावालाही.
मी मायबोलीची नियमित वाचक आहे हे आता बहुतेकांना माहीत आहेच.