मधेच एकदा झटका येऊन मी माझ्या मैत्रिणींना एक इमेल पाठवल होत त्यातलाच एक भाग इथे कॉपी पेस्टतेय
त्याआधी हे थोडसं (?) निवेदन..
-----------------------------------------
आपल्या पैकी बहुतेक सर्वांना कधी ना कधी किंवा नेहमीच हे प्रश्न पडले असतील. मंजुडीने मला तेव्हाच म्हणजे इमेल केल तेव्हा "हे तू संगोपन मधे टाक ना" अस सुचवल होत. पण बर्याचदा ही नाव पाण्यात सोडल्यावर "वादळ वार्यात" किंवा अजुन अनेक परिस्थितीत कुठच्या किनार्याला लागेल, मुळात ती किनार्याला लागेल की नाही की तिची टायट्यानिक होईल हे आपल्या हातात रहात नाही. ह्याच भितीने मी तिला पाण्यात सोडायला घाबरत होते.
भाग्यानी सुरु केलेल्या चर्चेच्या अनुशंगाने मला ही हा धागा सुरु करावासा वाटला
मी माझी गोष्ट सांगणार आहेच इथे तुम्हीही शेअर करा !
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.
नमस्कार मायबोलीकर,
मला माझ्या मुलासाठी नाव हवं आहे. त्याचे राशी अक्षर "ह" आहे. आणि जन्म रामनवमीचा, ३ एप्रिल २००९. (काही कारणाने बारश्याला उशीर होतो आहे.) पण आता १६ ऑगस्ट तारिख पक्की झाली आहे. नाव "ह" वरून किंवा रामाचे किंवा दुसरेही अर्थपूर्ण आणि त्याला शोभेसे हवे. आम्ही "हर्षित" ठरवतो आहे. पण मला ते पंजाबी वाटते. नवर्याला "हर्षवर्धन" हवे आहे. पण मला ते जास्तच लांब आणि common वाटते. कृपया मदत करा.
मायबोलीवर नविन असल्याने काही चूक झाल्यास सांभाळून घ्या.
- रचनाशिल्प