महिला दिन २०१२ च्या निमित्ताने घडवलेला निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक तुम्ही वाचला असेल किंवा वाचत असालच.
अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.
या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया. चर्चा करताना काही थोडीशी पथ्ये पाळूया.
'लिंगनिरपेक्ष मैत्री-ओ़ळख(आयडेन्टिटी)-' परिसंवाद विशेषांक
नमस्कार मंडळी,
स्वतःकडे स्त्री वा पुरूष असूनही लिंगनिरपेक्ष पाहता येते का? ते शक्य असते का?
असेच समोरच्याकडे पाहता येते का?
अशी मैत्री असू शकते का?
या सगळ्याचा स्त्रीवादाशी संबंध येऊ शकतो का? या परस्परविरोधी गोष्टी तर होत नाहीत?
वेगवेगळ्या व्यवसायासंदर्भाने लिंगनिरपेक्ष अस्तित्व आणि मैत्री या दोन्हीचे वेगवेगळे पैलू असू शकतात का? असतील तर कसे?
हे मुद्दे तर आहेतच आणि या प्रश्नांमधे नसलेलेही अनेक मुद्दे तुमच्या मनात असू शकतातच.
या सगळ्याला घेऊन आपण एक 'लिंगनिरपेक्ष मैत्री-अस्तित्व' या विषयाकडे विविध अंगांनी बघायचा प्रयत्न करूया.
मागच्या आठवड्यात 'सुखांत' या चित्रपटाच्या निर्मितीच्या निमित्ताने एक दयामरण विषयावर चर्चासत्र कोथरुडच्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात आयोजित केले होते. परिसंवादाला जाईपर्यंत हा चित्रपटावर आधारलेला परिसंवाद आहे हे मला माहित नव्हत. डॊ मोहन आगाशे, लोकसत्ताचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, साप्ताहिक सकाळच्या कार्यकारी संपादिका संध्या टाकसांळे, पुण्यातील नामवंत डॊ शिरिष प्रयाग, चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लेखक किरण यज्ञोपवित, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेती ज्योति चांदेकर, निर्माती अनुया म्हैसकर उपस्थित होते. परिसंवाद उत्तमच झाला.