संगोपन

लहान मुलांना "जात" संकल्पना कशी सांगाल?

Submitted by सिम्बा on 30 July, 2018 - 03:27

Tr निमित्त झाले मराठा मोर्चाचे.
सकाळी मुलगी शाळेसाठी तयार होत असताना vanवाल्या काकांचा मेसेज आला,
सकाळी स्कुल बसेस, vans काही ठिकाणी अडवल्या आहेत, बरोबर मुले असल्याने आंदोलकांचा सूर समजावण्याचा होता , पण संध्याकाळ पर्यंत वातावरण कसे असेल माहित नाही , त्यामुळे आज van सर्विस बंद राहील.

शब्दखुणा: 

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २

Submitted by मितान on 6 March, 2012 - 09:28

२२ एप्रिल २०११

मागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.

ठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला !!!! वर शुभेच्छाही मिळाल्या मला Happy

गुलमोहर: 

एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी

Submitted by मितान on 3 March, 2012 - 09:28

१२ एप्रिल २०११

आज एका प्रसिद्ध शाळेत बायोडेटा घेऊन गेले. एका मोठया कंपनीची ही शाळा. इंग्रजी-मराठी अशा दोन्ही माध्यमात मिळून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी संख्या. शाळेची ओळख परिसरात चांगली. निकाल पण दरवर्षी ठीकठाक लागतो. हे सगळं पाहून वाटलं इथे मला शालेय मानसतज्ञ म्हणून काम करायला मिळावे...

मुख्याध्यापकांची वाट बघत बसले होते. "सरांच्या येण्याची काही निश्चित वेळ नसते..!" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले ! माझ्या आधीपासून एक पालक येऊन बसल्या होत्या त्यांना डावलून मला आधी बोलावण्यात आले.

सरः बोला मॅडम
मी: मी अमुक तमुक

गुलमोहर: 

मुलांसाठी उपयुक्त अ‍ॅप्स

Submitted by मेधा on 14 September, 2011 - 09:44

आयपॅडच्या अ‍ॅपस्टोअरमधे शैक्षणिक या प्रकाराखाली हजारो अ‍ॅप्स दिसतात व त्यात रोज भर पडत असते. ज्यांनी अशा प्रकारची अ‍ॅप्स वापरली आहेत, त्यांनी आपापले अनुभव इथे लिहिले, रेकमेंडेशन लिहिले तर इतरांना त्या माहितीचा उपयोग होईल.

विषय: 

शिवधनुष्य पेलताना...

Submitted by कविन on 17 February, 2010 - 23:37

मधेच एकदा झटका येऊन मी माझ्या मैत्रिणींना एक इमेल पाठवल होत त्यातलाच एक भाग इथे कॉपी पेस्टतेय

त्याआधी हे थोडसं (?) निवेदन..
-----------------------------------------
आपल्या पैकी बहुतेक सर्वांना कधी ना कधी किंवा नेहमीच हे प्रश्न पडले असतील. मंजुडीने मला तेव्हाच म्हणजे इमेल केल तेव्हा "हे तू संगोपन मधे टाक ना" अस सुचवल होत. पण बर्‍याचदा ही नाव पाण्यात सोडल्यावर "वादळ वार्‍यात" किंवा अजुन अनेक परिस्थितीत कुठच्या किनार्‍याला लागेल, मुळात ती किनार्‍याला लागेल की नाही की तिची टायट्यानिक होईल हे आपल्या हातात रहात नाही. ह्याच भितीने मी तिला पाण्यात सोडायला घाबरत होते.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - संगोपन