एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २
२२ एप्रिल २०११
मागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.
ठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला !!!! वर शुभेच्छाही मिळाल्या मला