सामिया - तिचा जन्म ऑस्ट्रेलियातला. वडील मूळचे पाकिस्तानातले. तिला त्यांनी एकदा सांगितले की आपल्याला फिरायला जायचे आहे पाकिस्तानात. तेथे गेल्यावर त्यांनी तिचे लग्न लाऊन टाकले तिच्या चुलत भावाशी. हे लग्न त्यांनी ती फक्त १२ वर्षांची असतानाच ठरवले होते.
नमस्कार.. माझ्या ६ महिन्याच्या लेकीला- राजवीला वरचं खाणं सुरु करायच आहे.. त्यात काय काय देता येईल ते सांगाल का कुणी?? डॉक्टर ''सगळं द्या'' असं मोघम सांगतायत...
- एकाच शहरात राहूनही नातेवाईकांना भेटणं कमी होणं.
- नोकरी करू लागल्यावर शाळेतल्या-कॉलेजमधल्या जुन्या मित्रांना भेटणं कमी होणं.
- मित्र-मैत्रिणींची लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी भेटी न होणं.
असे प्रकार हल्ली बरेचदा होताना दिसतात. "भेटूया परत!" म्हणत निरोप घेतला, तरी परत भेटणं महिनोन महिने होत नाही, दिवस निघून जातात.
माझा मुलगा आता दीड वर्षाचा आहे. त्याला पुढचे ४ दात वर- खालि आनि दाढा येन्याची सुरवात झालि आहे. पण तो अजुन ही काही चावुन खात नाहि. चपाती, भात सर्व त्याला बारीक करुन भरवावे लागते. मध्ये एखादा घास जरि असाच भरवला कि लगेच उलटी करतो. मागे वरदा ने सान्गितल्या प्रमाणी कि त्याला बिस्किट चे तुकडे करुन दिले, तर त्याने ते उचलुन मलाच भरवले. त्याला काहीही दिल कि तो समोरच्या व्यक्तिलाच भरवतो, त्याने चावुन खान्यासाठी काय करु?
आणी अजुन एक, तो पकडुन उभा राहतो, आणि आपण बोलवल कि ५-६ पावल चालत पन येतो. पण अजुन आधाराशिवाय उभा राहत नाहि. तर त्यासाठी काय करत येइल?
आमचे एकत्र कुटूंब आहे. म्हणजे होते. मी मोठा, लहान भाऊ. दोन महिन्यापूर्वी मालमत्तेची विभागणी झाली. वडिलांनी जे कमावले त्यापेक्षा जास्त मी एकत्र कुटूंब असताना कमाविले. पण वाटताना मात्र भावाने ती एकत्र संपत्ती धरली, मी तश्या रिसीट दाखवल्या पण एकुणच नाराजीचा सूरच निघाला. विभाजन झाल्यावर असे ठरले की मी जे कमाविले त्याचा पण काही हिस्सा द्यायचा, मी ही लहान भाऊ असल्याने मान्य केले. व ती रक्कम अर्धी दिली. ठरल्याप्रमाणे अर्धी पुढील मार्च मध्ये व्याजासह देणार होतो.
वर्तमानपत्रात छोट्या जाहिरातींमध्ये एक ठळक अक्षरातील जाहिरात लक्ष वेधून घेते : वधू पाहिजे, वर सुशिक्षित/ उच्चशिक्षित, परदेशात कायमचे वास्तव्य / ग्रीन कार्ड, स्वतःचे घर, गाडी इत्यादी इत्यादी, कोणतीही जबाबदारी नाही.... वधूबद्दल अपेक्षा....
आणि मग एवढ्या माहितीच्या आधारे अनेक वधुपिते त्या स्थळाच्या मागे लागतात. भराभर सोयीच्या तारखांना भेटीगाठी ठरविल्या जातात, चट मंगनी पट ब्याह होतो, नवरा-नवरी परदेशी त्यांच्या घरी रवाना होतात, किंवा नवरा अगोदर जातो - नवरी काही कालाने व्हिसा वगैरे औपचारिकता पूर्ण करून मग जाते. सारे काही आलबेल होते. पण ते तसे खरेच होते का?
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे
आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.
गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.
कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.
लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.
आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.
*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
खरतर भरपुर विचार करुन काही न सुचल्याने इथे लिहितेय.
गेले काही आठवडे लेक खुप जास्त चिडचिड करतेय. आधी आम्हाला वाटलं कि असेच मुलांचा स्वभाव बदलतो किंवा मधे मधे एक एक फेजेस येतात तशी हि नविन फेज असेल. म्हणुन दुर्लक्ष केले.
पण अगदी मला मारायला येणे टोचणे असे प्रकारही अलिकडे सुरु झालेत. हे सहसा मुलं दुसर्या वर्षी करतात पण तीने हे कधीच केलं नव्हतं. त्याशिवाय ती तीच्या वयापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह आणि मॅचुअर आहे असे नेहेमीच आम्हाला वाटते दिसते. मग हा बदल का ते लक्षात येत नव्हते.
सत्तर वर्षाच्या डॉ. सिंग यांना दोन वर्षांपूर्वी पत्नीशोक झाला. पण आपला मुलगा, सून व नातू यांच्या सहवासात आपले दु:ख कमी होईल असे त्यांना वाटले. पण खरे दु:ख तर पुढेच होते. आपल्याच मालकीच्या घरात डॉ. सिंगांना हळूहळू जगणे असह्य झाले. मधुमेहाचे रोगी असलेल्या डॉक्टरांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, घरातील वावरणे, घरातील व्यवहारांत सहभाग याविषयी त्यांच्याच घरच्यांनी उदासीनता दाखवायला सुरुवात केली. नियमित वेळेला खाणे, पथ्य वगैरे तर राहूच दे, पण त्यांनी काही सांगितलेलेही घरच्यांना पटेना. गोष्टी एवढ्या थराला गेल्या की डॉ.