साधारणतः सध्या सगळ्या घरांमध्ये बाहेरुन आणलेले तयार खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण खूपचं वाढलंय. पिझ्झा, बर्गर, पावभाजी, वडापाव, कोला हे खास आवडीचे पदार्थ. हे पदार्थ खाणं कितपत योग्य आहे? हा प्रश्न प्रत्येक पालकाच्या मनात आहे म्हणून सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरमतर्फे 'केमिस्ट्री ऑफ जंक फूड' ह्या विषयावर एक चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला होता. व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असलेले श्री रविकिरण महाजन आहारशस्रेआवर कसे बोलणार हा प्रश्न काहींना होता. पण बोलायला सुरुवात करताच, थोड्या वेळातच आहारशास्त्रावर त्यांनी किती अंगाने आणि किती खोलवर अभ्यास केलाय हे सुज्ञांना स्मजायला वेळ लागला नाही.
माझा मुलगा आता दीड वर्षाचा आहे. त्याला पुढचे ४ दात वर- खालि आनि दाढा येन्याची सुरवात झालि आहे. पण तो अजुन ही काही चावुन खात नाहि. चपाती, भात सर्व त्याला बारीक करुन भरवावे लागते. मध्ये एखादा घास जरि असाच भरवला कि लगेच उलटी करतो. मागे वरदा ने सान्गितल्या प्रमाणी कि त्याला बिस्किट चे तुकडे करुन दिले, तर त्याने ते उचलुन मलाच भरवले. त्याला काहीही दिल कि तो समोरच्या व्यक्तिलाच भरवतो, त्याने चावुन खान्यासाठी काय करु?
आणी अजुन एक, तो पकडुन उभा राहतो, आणि आपण बोलवल कि ५-६ पावल चालत पन येतो. पण अजुन आधाराशिवाय उभा राहत नाहि. तर त्यासाठी काय करत येइल?
माझा मुलगा सव्वा वर्षा चा आहे, काल त्याला doc कडे नेल होत तर त्यानि iron n calcium deficiency सांगितल आहे, त्यासाठी औषध पन दिली आहेत. पण आहारातुन iron n calcium n vitamin d level वाढवण्यासाठी काय देता येइल??
मी मायबोलीवर आलो त्याला आता आठ वर्षे होत आहेत. या आठ वर्षांत मला मायबोलीने भरभरून ज्ञान. मनोरंजन, विरंगुळा आणि मायबोलीचे व्यसन दिले. आता त्याची किमान आंशिक भरपाई करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. म्हणून मी ही "अनुदिनी परिचयां"ची मालिका सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांत महाजालावर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण शुद्ध मराठीतून केले गेले. त्यांची दखल घ्यावी आणि मायबोलीकरांच्या नजरेस ते लिखाण आणून द्यावे हाच उद्देश या मागे आहे. महाजालावरील अनुदिनी लेखनाची सुरूवात मायबोलीवरील "रंगीबेरंगी"नेच झालेली होती. ते लिखाण आपल्या परिचयाचेच आहे.