माझी मुलगी सध्या सहा वर्षांची आहे. गेल्या वर्षी तिला ॲक्टीव्हिटी कम बालनाट्य अश्या एका क्लासला टाकले होते. (क्लासचे नाव विचारू नका) मुलगी पुरेशी क्रिएटीव्ह आहे आणि ड्रामा ॲक्टींगचीही आवड आहे हे पाळण्यातले पाय साधारण दिसले होते. फार नाही पण बरेपैकी रमायची तिथे. चारसहा महिन्यांनी त्यांच्या नाटकाचा सीजन आला तेव्हा प्रत्येकाला छोटीमोठी भुमिका मिळणारच या हिशोबाने एका कळपातल्या बकरीची भुमिका तिला देण्यात आली. सोबत चक्क एक डायलॉग !
नाही म्हटले तरी आमचा हिरमोडच झाला. पण म्हटले जाऊ दे कदाचित आपल्या मुलीतील कलागुण त्यांना फारसे दिसले नसतील वा तिनेच दाखवले नसतील.
पोरगी एके दिवशी म्हणाली, "मम्मा मला सुमीतशी लग्न करायचे आहे"..
मी उडालोच !!
कारण पोरीची अजून वय वर्षे चार पुर्ण व्हायची होती. सध्या नर्सरीमध्ये शिकते.
तसे या फ्रेंडबद्दल थोडी कल्पना होतीच. कारण गेले काही दिवस घरातल्या भिंती आणि वह्यापुस्तके या सुमीतच्या नावाने रंगत होती. आधी आम्हाला वाटले, असेल एखादा फ्रेंड. लिहायला सोपे म्हणून लिहितेय. तसेही पोरगी न शिकवता स्वत:च्या मनाने काहीतरी लिहीतेय याचेच आम्हाला फार कौतुक. पण प्रकरण ईथवर गेले असावे याची कल्पना नव्हती
आज डॉक्टरकडून निघालो आणि केमिस्टच्या दुकानात शिरलो. रात्रीचे साडेदहा उलटून गेल्याने वर्दळ अशी नव्हतीच. मोजून दोन गिर्हाईक. मी आत शिरताच त्यातील एक बाहेर पडले. आता फक्त एक बाई तेवढी होती. सोबत तिचा चारपाच वर्षांचा मुलगा. आणि दुकानातील पोरे.
गर्भधारणा झाल्यापासून सदतीस आठवड्यांच्या आत होणार्या प्रसूतींना मुदतपूर्व प्रसूती म्हटले जाते. बर्याचदा मुदतपूर्व प्रसूतीचं नेमकं कारण काय हे सांगणं कठीण असतं. तरीही गर्भारपणात पुरेशी काळजी न घेतली जाणं, पोषणाची अबाळ, उपचार न केले गेलेले आजार, गर्भाशयासंबंधीच्या समस्या या गोष्टी मुदतपूर्व प्रसूतीस कारणीभूत ठरू शकतात.