दिनेश. यांचे रंगीबेरंगी पान
लेकुरवाळे वृक्ष
इंदिरा संत यांची एक कविता आम्हाला अभ्यासाला होती. त्यात त्यांनी फणसच्या झाडाला, लेकुरवाळा
असा शब्द वापरला आहे. मे महिन्यात फणसाच्या एखाद्या झाडाकडे बघितल्यास, हि उपमा अगदी
पटतेच.
निवृत्ती हा खांद्यावरी, चोखामेळा बरोबरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, असे ध्यान असते, त्या झाडाचे.
फळे म्हणजे आपल्या डोक्यात एक साधारण कल्पना असते. फ़ांद्यांच्या टोकाला आधी मस्त मोहोर
वा फुले येणार. मग आधी छोटी फ़ळ, दिसामाजी ती वाढत जाणार. मग हळूच एक दिवशी, पिकून
पिवळी वा लाल वगैरे होणार. फणसाच्या बाबतीत, या पायर्या कधी लक्षातच येत नाहीत.
अंतरंग
साधारण महिनाभरापुर्वीच नवीन कॅमेरा घेतला. एस एल आर वगैरे नाही. साधाच आहे. अजून सगळे फिचर्स हाताळले पण नाहीत. सध्यातरी केवळ इंटेलिजंट मोड मधेच फोटो काढतोय. आता जरा जरा हात बसायला लागलाय असे वाटते.
या कॅमेरानी काढलेले फूलांचे फोटो एडीट करत असताना, त्यांच्या अंतरंगातील रंगाचे आणि रचनेचे सौंदर्य डोळ्यांना खुपच आवडले. ते सादर करतोय. (हे काहि सूक्ष्म चित्रण नाही. ) केवळ एक प्रयोग म्हणून इथे मांडतोय --
हि आहे एक गुलाबी जास्वंद
हा आहे एक प्रकारचा वेली गुलाब, गुच्छात आठ दहा फूले असतात
अभयचा - श्री गणेश
अवघी विठाई माझी (२३) सलाद ग्रीन्स
पाश्चात्य जेवणात ग्रीन्सचे स्थान महत्वाचे आहे. आपल्याकडे मेथीच्या पानांची, किंवा मूळ्याच्या पानांची पछडी असे काहि अपवाद सोडल्यास, हिरव्या भाज्या कच्च्या खाण्याची परंपरा नाही. आपल्याकडची आहारपद्धती लक्षात घेतल्यास, आपल्याला आपल्या नेहमीच्या आहारातून, भरपूर चोथा मिळत असतो. त्यामुळे मुद्दाम कच्ची पाने खायची रित नाही.
पाश्चात्य जेवणात मात्र, मैद्यासाखरेपासून केलेले पदार्थ, पास्ता आणि मांस यांवर भर असल्याने, त्यांना सलाद खाणे आवश्यक असते.
अवघी विठाई माझी (२२) अस्पारागस
हि भाजी अगदी डेलिकसी समजली जाते. अगदी कोवळे हिरवे कोंब
असे हिचे रुप असते (हेच कोंब अंधारात वाढवले तर पांढरे दिसतात. आणि
अस्पारगस चा एक प्रकार म्हणून ते ओळखले जातात.)
या भाजीचे वरचे शेंडे अगदी कोवळे असतात. आणि ते पट्कन शिजतात.
त्याखालचा भाग शिजायला जरा जास्त वेळ लागतो. त्यावर कधीकधी कडक
साल असते आणि ती पोटॅटो पीलरने काढावी लागते. आणि मूळाकडचा भाग
(हा पांढरट असतो) तो काढून टाकावा लागतो.
अशा तीन तर्हा असल्याने. अस्पारागस शिजवताना जरा काळजी घ्यावी लागते.
अवघी विठाई माझी (२१) गोटु कोला
गोटू कोला, नाव जरा विचित्रच वाटतेय ना ? हा शब्द आहे सिंहली भाषेतला. गोटू म्हणजे गोल
आणि कोला म्हणजे पाने.
पण फोटोवरुन अनेकजणांनी ओळखले असेल, की हि आहे ब्रम्ही. पुर्वी ब्रम्ही, माका सारख्या
वनस्पती जागोजाग दिसायच्या. आता त्या तितक्या सहजी दिसत नाहीत.
ब्रम्ही म्हंटले कि आपल्याला, भारतातले प्रसिद्ध, ब्रम्ही आवला हेअर ऑईलच आठवणार.
ब्रम्हीचा आपण खाण्यासाठी उपयोग करत नाही. (दक्षिणेकडे करत असावेत. खात्री नाही.)
डॉ. डहाणुकरांच्या लेखनात याचा खाण्यासाठी उपयोग होतो, हे पहिल्यांदा वाचले.
अवघी विठाई माझी (२०) - अवाकाडो
अवाकाडो ला भाजी म्हणता येणार नाही. अगदी क्वचितच ते शिजवले जाते, तेही अगदी
काहि क्षणांपुरतेच. जास्त शिजवल्यास ते कडवट बनते.
पण त्याला फळही म्हणता येणे कठीण आहे, कारण त्यातले साखरेचे प्रमाण नगण्य (
१०० ग्रॅम गरात केवळ ०.६६ ग्रॅम ) असल्याने ते चवीला अजिबात गोड लागत नाही.
मी अवाकाडो पहिल्यांदा खाल्ले ते साधारण ३५ वर्षांपूर्वी. त्यावेळी ते मुंबईला बाजारात
मिळत नव्हते. आमच्या शेजारच्या कुर्गी आंटीने ते मला दिले होते. तिने त्याचा एक
गोड प्रकार मला करुन दिला होता. त्याची बी आम्ही पेरली होती आणि तिचे झाडही
मंडळ आभारी आहे !
अवघी विठाई माझी (१९) मांसाचे फळ - टोमॅटो
कांद्याच्या खालोखाल आपल्या जेवणात मानाचे स्थान मिळवून बसलेली भाजी
म्हणजे हे मांसाचे फळ, अर्थात टोमॅटो. हे फळ आपल्याकडे पहिल्यांदा आले
त्यावेळी त्याला मांसाचे फ़ळ असेच म्हणत असत. आणि आजही आपण त्याला
देवाच्या नैवेद्यात स्थान दिलेले नाही.
आपण बाजारात गेलो, कि थोडे का होईना टोमॅटो घेऊन येतोच. कुठल्याही
भाजी आमटीत ते वापरता येतात. शिवाय आपली ती खास कांदा टोमॅटो कोशिंबीर
आहेच.
आपल्याकडे टोमॅटोच्या स्वादाबाबत आग्रह धरला जात नाही. झाडावर पिकलेला
Pages
