फणसाचे सांदण..
Submitted by MSL on 13 June, 2021 - 06:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
"कुटुंब वत्सल उभा फणस हा कटि खांद्यावर घेऊन बाळे" अशा कवितांमधुन किंवा "भटो भटो कुठे गेला होतात" या सारख्या बडबड गीतां मधुनच भेटणारा फणस कोकणात मात्र आपल्याला पावला पावलाला भेटतो. आंबा हा कोकणचा राजा आहे आणि फणस आहे त्या राजाचा सरदार.
फणसाचे कशाला चित्र टाकले? असेच वाटले असेल ना? पण कित्येक वर्षांनी पुर्ण फणस मिळाला बाजारात आणि आनंद मावेनासा झाला. म्हटलं, तुम्हाला सुद्धा सामिल करु या.
ह्या आधीही चायना बाजारातून आणलेले फणस खराब निघालेले, तेव्हा घाबरतच अख्खा फणस घेतला. आणि काय आश्चर्य , सुंदर करकरीत गरा अवीट गोडीचा व सोनेरी रंगाचा निघाला. मन एकदम गावी पोहोचले. भारताबाहेर असताना ह्या अश्या गोष्टींचे भारीच कौतुक असते. नाही का?