१ कच्चा फणसाचे गरे साफ करून अख्खेच ठेवावेत
भजीचे सामानः
चवीला मीठ, चिरलेली कोथींबीर, ओवा, धणे, बडीशेप कच्चेच भरडून, लाल मसाला, हिरवी मिरची, लिंबू रस, १ वाटी बेसन आणि १ चमचा तांदूळ पीठी.
गरे तळायला:
खरे तर कोकणात कौलावर वाळत घालतात गरे व ते मस्त सुकवून भरून ठेवतात उपवासाला खायला. तळायची पद्धत दक्षिणेला ज्यास्त दिसते. पण इथे उन्हं मिळणं कठिण म्हणून तळले व अप्रतिम लागले.
सामानः कच्चा गर्याचे लांबट तुकडे, नारळाचे तेल, चवीला मीठ.
हे असे, वरच्य कोपर्यात भजीसाठी केलेले अर्धे तुकडे तर खाली लांबट तुकडे नुसतेच गरे तळायला.
भजी कृती:
भजीचे सामान भिजवून घ्यावे. खूप पाणी न घालता बटाटा वड्यासारखे असावे. ते एकाच दिशेने खूप फेटावे. अगदी फुलून येइपर्यंत. मग त्यात गरे टाकून लगेच तळावे भजीप्रमाणेच. वरून चाट मसाला भुरभुरावा.
तळके गरे कृती: नारळाचे तेल तापले की गर्याचे लांबट तुकडे टाकून सतत हळूवार पणे ढवळून घ्यावे व आच जराशी मध्यम करून कुरकुरीत तळून काढावे व हवाबंद डब्यात भरावे. मस्त टिकतात. वर म्हटल्याप्रमाणे उन्हात सुकलेले गरे सुद्धा अप्रतिम लागतात.
काहीच नाही.
भजी लवकरच संपली फोटो
भजी लवकरच संपली फोटो काढायच्या आत. व तळके गरे सुद्धा. त्यामुळे पुन्हा केले (जर फणस मिळाला तर) टाकेन फोटो. धन्यवाद.
उन्हात कच्चे गरे सुकवायचे की
उन्हात कच्चे गरे सुकवायचे की पिकलेले?
उन्हात पिकलेले गरे(कापा
उन्हात पिकलेले गरे(कापा फणसाचे) सुकवायचे. काहीही लावायचे नाही(मीठ वगैरे). ऊन एकदम कडकडीत पाहिजे.
पारंपारीक कृती आहे असे गरे सुकवायची.
तळायला व भजीला मात्र कच्चे घ्यायचे. गरे एकदा पिकले की साखर ज्यास्त होते व पाण्याचे प्रमाण वाढते. तळताना मग कुरकुरीत होत नाहीत,
मस्त. तळलेले गरे माझ्या
मस्त. तळलेले गरे माझ्या लेकीला खुप आवडतात. इथे पुर्ण तयार कच्चा फणस जर चुकून मिळालाच तर नक्की करेन. मुंबईत एकतर लहान भाजीचे फणस (कुय-या) मिळतात नाहीतर मग पिकलेला फणस.
देवीका, मस्तच कृती
देवीका, मस्तच कृती भज्यांची.
साधना, चेंबूरला भाजीबाजाराच्या समोर एका भाजीवाल्याकडे जवळजवळ वर्षभर कच्चा गर्याचा फणस मिळतो.
अरे वा भजी नव्हती मला माहीती.
अरे वा भजी नव्हती मला माहीती. बाकी गावाला तळलेले गरे करतात आमच्याकडे.
गरे काय मस्त दिसताएतं!
गरे काय मस्त दिसताएतं!
देवीका, गर्यांची भजी प्रथमच
देवीका, गर्यांची भजी प्रथमच पाहिली. मस्त वाटतायत. आम्ही पण कापे गरे वाळवून ठेवतो तु लिहिलेस तसेच.
साधना, तळलेले गरे तुझ्या मुलीला आवडतात ना ? हे घे. गावाला आमच्या घरी केलेले. मांजरानाही ते अतिशय प्रिय असतात. मँव मँव करुन पायात घुट्मळून मागून घेतात. नाही दिले तर आपली नजर चूकवून डल्ला मारतात आणि कुडुम कुडुम करत खात बसतात.
From mayboli
अरे बापरे! इतकं मोठ पातेलं
अरे बापरे! इतकं मोठ पातेलं भरून गरे. मजा आहे.
हेमाताई काय हे गरे वगैरे.
हेमाताई काय हे गरे वगैरे. मनीमाऊ पण तीन तीन आहेत गावाला, माझ्या दिरांच्या अतिशय लाडक्या. आमच्या घरातलाच फोटो आहे असं वाटलं.
पहिल्यांदाच बघितली अशी भजी.
पहिल्यांदाच बघितली अशी भजी.
देवीका गरे वाळवण्यात मला
देवीका गरे वाळवण्यात मला भलताच इंटरेस्ट आहे, प्लीज जरा प्रोसेस सांगा ना
गरे धुवायचे का?
वाळवताना कशावर (म्हणजे प्लॅस्टिक) चालेल का?
वरून झाकण घालायचे का?
मुंग्या इ. नाही लागत का? कारण ओले गरे सर्व जातीजमातीना आकर्षण आहेच
किती दिवस वाळवायचे
झाडाखाली चालेल का? की कडक ऊन हवे?
आधीच धन्स
पुण्याचीविनिता, अश्या स्टेप्स
पुण्याचीविनिता,
अश्या स्टेप्स आहेत,
पाणी अजिबात आजूबाजूला, हाताला किंवा ताटाला असु नये. लवकरच सकाळी करावे जसे ऊन वाढते तसे आपल्याला त्रास होतो व ते कडक ऊन लागले पाहिजे.
-एक मध्यम पिकलेला कापा(ज्याचा गरा करकरीत लागतो) फणस नीट साफ करून कोरडया हाताने त्याचे गरे काढून वरील चित्रात दिलेत तसे तुकडे करून घ्यावे. (अश्याने लवकर सुकतात)
- जिथे वाळवणार ती सर्व आजूबाजूची जागा स्वच्छ करून सुकवून घेतली की त्यावर प्लॅस्टीक पेपर घालावा. त्यावर मऊ सुती सहावारी/नववारी लुगडं एकेरी घालून गरे सुटसुटे पसरावे. व उरलेली लुगडयाची बाजू वरून घालावी व चारी बाजूला दगड लावून बंद करावे. दोन एक तासानी सर्व गरे पलटी करावे. पुन्हा झाकून ठेवावे. संध्याकाळी ५ पर्यंत काढून आणावे. गरे कोरडयाच मोठया रुंद पातेल्यात काढून परत दोन ते तीन दिवस हिच कसरत करावी. गरे कडकडीत झाले पाहिजे. नीट वाळवले नाही तर बुरशी येइल.
लहान मुलं, मोठी खादाड माणसं पासून जपून हे करावे. गावी कौलावर घालतात तरी झाडावरची वानरं आणि घरातील माकडां पासून सुटका नाही.
तोपासु.
तोपासु.
मस्त टीप्स!
मस्त टीप्स!
मनीमोहोर, टोपभर गरे??
मनीमोहोर, टोपभर गरे?? मज्जाय...
जरा एक मुठ इथेही पाठवुन दे
जरा एक मुठ इथेही पाठवुन दे त्या मोठ्ठ्या टोपातली...
अनिश्का, ठाण्याहून नवऱ्याने,
अनिश्का, ठाण्याहून नवऱ्याने, हेमाताईच्या(मानिमोहोर) घरचे गरे आणले होते, मिळतात ठाण्याला. (sorry अवांतर). तसे आमच्या घरचे असतात पण यंदा गावाला गेलो नाहीना.
धन्यवाद. साधना तिच्या मुलीला
धन्यवाद. साधना तिच्या मुलीला आवडतात म्हणाली म्हणून आवर्जून फोटो डकवला.
खरे खरे गरे खायला आपण गावालाच जाऊ या ना.
मनीमोहोरः तुमची गरे तळण्याची
मनीमोहोरः तुमची गरे तळण्याची काय पद्धत आहे?
देवीका, आम्ही असे गरे
देवीका, आम्ही असे गरे तळत्तो
प्रथम कच्चा फणस कापायचा. आणि त्याचे हातात मावतील अशा आकाराचे तुकडे करायचे. नंतर त्यांचा पाठीकडचा भाग म्हणजे काटे असलेला भाग काढायचा. आता ह्यातून चारखंड काढून टाकून गरे वेगळे काढायचे
परत ह्या गर्यातून आठ्ळी आणि आठ्ळी लगतचा कोशेरा बाहेर काढायचा. आता हे गरे विळीवर उभे उभे साधारण पाव इंच रुंदीचे असे चिरायचे.
एका कढईत खोबरेल तेल गरम करत ठेवायचे आणि तेल मध्यम गरम झाले की त्यात हे गरे घालून जरा मंद विस्तवावर हलवून हलवून कुरकुरीत, खुसखुशीत होईपर्यंत तळायचे. एका ठराविक स्टेजला ह्यात मीठाचे पाणी घालत्तात.
पण मला वाटत की हे एकटी दुकटीने करायचे काम नाही. खूप किचकट आहे. आमच्या कडे गावाला आम्ही घरच्याच खूप जणी असतो आणि कामकरी बायका पण मदतीला असतात म्हणूनच जमतं. बरं एका फणसातून एवढे कष्ट करून गरे ही खूप मिळतात असे ही नाही.
हेमाताईच्या पोस्टला मम. सुंदर
हेमाताईच्या पोस्टला मम. सुंदर विश्लेषण. आमच्याकडे थोड्या प्रमाणात हे काम असतं, मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे कामकरी बायकांची मदत लागतेच.
मनीमोहोर: अच्छा! मग मी ह्याच
मनीमोहोर: अच्छा! मग मी ह्याच पद्धतीने केले. पण पार थकले. फणस सोलण्यापासून, गरे चिरण्यापासून(वर दाखवले तसे) आणि तळणी. तळणी खूप कष्टाचे काम वाटले. गावी नुसते उन्हात सुकवतात. ते सुद्धा काम खूप आहे पण तुम्ही म्हणता तसे पैरीणी(कामकरी बायका) असतात मदतीला. धन्यवाद.
सिंगापूर विमानतळावर मला
सिंगापूर विमानतळावर मला तळलेले गरे मिळाले ( थायलंडचे होते. ) तळल्यासारखे अजिबात लागत नव्हते. अगदी ताजे पण कोरडे केलेले असे लागत होते. तेलाची चवही नव्हती. थायलंडमधे लिंबापासून ताडगोळ्यापर्यंत अनेक फळे सुकवून ठेवलेली असतात. रंग, चव सगळे टिकवलेले असते. ते तंत्र आपल्याकडे आलेले नाही.
( गरे अगदी कमी पॉवरवर मायक्रोवेव्ह करुन बघणार का ? आमच्याकडे भला मोठा फणस मिळतो. तो मला एकट्याला महिनाभर संपणार नाही. म्हणून प्रयोग करता येत नाही. )
हि आयडिया छान आहे. मी उद्याच
हि आयडिया छान आहे. मी उद्याच एक फणस आणून करून बघते. कालच भरपूर नवीन माल(फणस) आलेले पाहिले मेक्सिकन बाजारात.