अंतरंग
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
30
साधारण महिनाभरापुर्वीच नवीन कॅमेरा घेतला. एस एल आर वगैरे नाही. साधाच आहे. अजून सगळे फिचर्स हाताळले पण नाहीत. सध्यातरी केवळ इंटेलिजंट मोड मधेच फोटो काढतोय. आता जरा जरा हात बसायला लागलाय असे वाटते.
या कॅमेरानी काढलेले फूलांचे फोटो एडीट करत असताना, त्यांच्या अंतरंगातील रंगाचे आणि रचनेचे सौंदर्य डोळ्यांना खुपच आवडले. ते सादर करतोय. (हे काहि सूक्ष्म चित्रण नाही. ) केवळ एक प्रयोग म्हणून इथे मांडतोय --
हि आहे एक गुलाबी जास्वंद
हा आहे एक प्रकारचा वेली गुलाब, गुच्छात आठ दहा फूले असतात
बागेत आढळणारे एक कॉमन फूल
धोत्र्याचा एक प्रकार. याचे झाडही मोठे असते आणि फूलही
लिलीचा एक प्रकार
हा पण जास्वंदीचाच एक प्रकार
आणि हा आहे सिल्व्हर ओकचा फुलोरा
आणि हि पिवळी जास्वंद
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
व्वा दिनेशदा, झकास फोटो!
व्वा दिनेशदा, झकास फोटो!
सुंदर फोटू आहेत सगळॅ.. मला तो
सुंदर फोटू आहेत सगळॅ.. मला तो लिलीचा तर खासच आवडला. उन मस्त पडलंय त्यावर.
आता ह्या कॅमे-यातुन केनया दर्शन कधी घडवणार???
सुंदर आलेत सगळेच.
सुंदर आलेत सगळेच.
मस्तच! शेवटचा खूप आवडला.
मस्तच! शेवटचा खूप आवडला.
वा सुरेखच. मस्त रंगीबेरंगी
वा सुरेखच. मस्त रंगीबेरंगी वाटतय....
खुप मस्त आलेत फोटो दिनेशदा...
खुप मस्त आलेत फोटो दिनेशदा... रंग फार मोहक आहेत..
वाह!! मस्त फोकसिन्ग आहे
वाह!!
मस्त फोकसिन्ग आहे की.
कोणता कॅमेरा घेतला?? (माझा अंदाज कॅनन SX 120 IS / SX20IS)
अभिनन्दन
फोटो छानच आलेत ..
फोटो छानच आलेत ..
सुरेख ! अजून बरीच फुलं वाट
सुरेख !
अजून बरीच फुलं वाट बघताहेत तुमची आणि नव्या कॅमेर्याची !
दिनेशदा.. मस्तच फोटो
दिनेशदा.. मस्तच फोटो
दिनेशदा, मस्त फोटो ! तुमचा
दिनेशदा,
मस्त फोटो !
तुमचा जाता जाता केलेला एक साधा प्रयोगही सूक्ष्म चित्रणापेक्षा कमी नसतो ...!
आता बोला ....
आता ह्या कॅमे-यातुन केनया (कि अफ्रिका?)दर्शन कधी घडवणार???
खुप छान फोटो. आवडले.
खुप छान फोटो. आवडले.
सुंदर!
सुंदर!
आभार रे. हे प्रकरण माझ्यासाठी
आभार रे.
हे प्रकरण माझ्यासाठी जरा नवे आहे. कारण वरच्या ज्या चौकटी आहेत, त्या मूळ फोटोतला अगदी छोटासा भाग आहे.
कॅमेरा पॅनासोनिक ल्यूमिक्स टि झेड ८ आहे. काल गरब्याचे व्हिडियो शूटींग पण केले.
साधना... लवकरच येत आहे.. रिक्षा.
सुंदर!
सुंदर!
मस्त फोटो !
मस्त फोटो !
सगळेच फोटो मस्त मला
सगळेच फोटो मस्त
मला जास्वंदीचा ६वा फोटो विशेष आवडला
छान फोटो
छान फोटो
वा सुंदर. झूम काय आहे ह्याची
वा सुंदर. झूम काय आहे ह्याची दिनेश आणि तुम्ही किती ठेवली होती फोटो काढताना?
सही! सगळेच फोटो मस्त
सही! सगळेच फोटो मस्त आहेत.
जास्वंद तर माझं ऑल टाईम फेवरेट.
वा!!! सुंदरच आहेत दिनेशदा हे
वा!!! सुंदरच आहेत दिनेशदा हे फुलांचे फोटो!!! आपल्या ओळखीचेच फोटो ह्या झुम लेव्हलला किती अनोळखी आणि सुंदर भासतात!!!!! अंतरंग हे नावही सार्थ आहे.... आवडले...
आवडले. Bug's Life सिनेमाची
आवडले.
Bug's Life सिनेमाची आठवण आली.
खरे तर हे सगळे अजाणतेपणी
खरे तर हे सगळे अजाणतेपणी घडले. मी नेहमीप्रमाणेच केवळ फूलांचे फोटो काढत होतो. एक जास्वंदीचे फूल तूटून खाली पडले होते. त्याचा फोटो काढला तर तो असा होता.
त्यातले फक्त फूलच घेऊ असे म्हणत क्रॉप करायला गेलो, तर हे "अंतरंग" दिसले.
बाकी टेक्नीकल डिटेल्स असे.
फोकल लेंन्थ ३९.७ एम एम, एक्स्पोझर टाईम ०.००२ सेकंद (१/५००) अपरेचर एफ ५.६, रेझोल्यूशन ४००० बाय ३०००
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत
दिनेशदा, फोटो जबरी आलेत.
दिनेशदा, फोटो जबरी आलेत. क्रॉपिंग मस्त जमलयं, फुलांचे रंग एकदम खुलून दिसतायत.
पॅनॅसॉनिकची लेन्स सगळ्यात उत्तम असे वाचलेले. निकॉन, कॅनन आणि पॅनॅसॉनिक यांच्यात तुलना करताना वाचले होते. कॅमेरा घेताना पॅनॅसॉनिकचा एक F-१५ फार आवडलेला, पण पॅनॅसॉनिकचे नाव भारतात कमी ऐकले असल्यामुळे (मी तरी) व आफ्टरसेल्स सर्विस बद्दल जास्त माहिती न मिळाल्यामुळे , कॅनन घेतला.
दिनेशदा सगळेच फोटो छान आहेत.
दिनेशदा सगळेच फोटो छान आहेत.
व्वा!!!
व्वा!!!
छॉनेत अगदी.
छॉनेत अगदी.
आभार सगळ्यांचे. रंगासेठ, माझे
आभार सगळ्यांचे.
रंगासेठ,
माझे या आधीचे सर्व फोटो मी कोडॅक ने काढले होते. दोन्हीची तूलना करता, हा जास्त कॉम्पॅक्ट आहे.
शटर स्पीड आणि अपरेचर दोन्ही हवे तर सेट करता येतात. पण मूव्हीचा अनुभव तितका चांगला नाही, म्हणजे चित्रीकरण सुंदर झालेय, रंगही छान आहेत, पण रिप्ले करताना जर्क्स जाणवतात. शिवाय त्या फार काळ शूट करता आल्या नाहीत (आता पुढच्या दुबई वारीत, कॅमकॉर्डर घ्यावा लागणार.) २ जीबी मेमरी कमी पडली. लॅपटॉपवर त्या फाईल्स, फक्त त्यांचे सॉफ्टवेअर वापरुनच बघता आल्या. विंडोज मिडीया प्लेअर मधे, बघता आल्या नाहीत.
अजून बाकिचे फिचर्स वापरुन्, इथे पोस्टतो.
वाह ! छानच !
वाह ! छानच !