जास्वंद
रंग जास्वंदींचे
प्रथम पुज्य गणपतीच आवडत फुल म्हणजे जास्वंद. जास्वंदीचा पुजेपासुन आयुर्वेदिक औषधांसाठी वापर केला जातो. जास्वंदीचे मुळ, पान फुल अगदी सगळ्याचाच औषधा मध्ये वापर केला जातो. केसांच्या संवर्धनासाठी जास्वंद ही वरदान ठरली आहे. पुर्वी जास्वंद ही लाल रंगात जास्त दिसायची पण
निसर्गनिर्मित जास्वंदीला आता कृषीतज्ञांनी वेगवेगळी रुप व रंग दिले आहेत. त्यातील काही जास्वंदी.
ह्याचा रंग अगदी लाल भडक आहे आणि फुल मोठ्ठे येते.
काही फुले
अंतरंग
साधारण महिनाभरापुर्वीच नवीन कॅमेरा घेतला. एस एल आर वगैरे नाही. साधाच आहे. अजून सगळे फिचर्स हाताळले पण नाहीत. सध्यातरी केवळ इंटेलिजंट मोड मधेच फोटो काढतोय. आता जरा जरा हात बसायला लागलाय असे वाटते.
या कॅमेरानी काढलेले फूलांचे फोटो एडीट करत असताना, त्यांच्या अंतरंगातील रंगाचे आणि रचनेचे सौंदर्य डोळ्यांना खुपच आवडले. ते सादर करतोय. (हे काहि सूक्ष्म चित्रण नाही. ) केवळ एक प्रयोग म्हणून इथे मांडतोय --
हि आहे एक गुलाबी जास्वंद
हा आहे एक प्रकारचा वेली गुलाब, गुच्छात आठ दहा फूले असतात