अंतरंग

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

साधारण महिनाभरापुर्वीच नवीन कॅमेरा घेतला. एस एल आर वगैरे नाही. साधाच आहे. अजून सगळे फिचर्स हाताळले पण नाहीत. सध्यातरी केवळ इंटेलिजंट मोड मधेच फोटो काढतोय. आता जरा जरा हात बसायला लागलाय असे वाटते.
या कॅमेरानी काढलेले फूलांचे फोटो एडीट करत असताना, त्यांच्या अंतरंगातील रंगाचे आणि रचनेचे सौंदर्य डोळ्यांना खुपच आवडले. ते सादर करतोय. (हे काहि सूक्ष्म चित्रण नाही. ) केवळ एक प्रयोग म्हणून इथे मांडतोय --

हि आहे एक गुलाबी जास्वंद

j1.jpg

हा आहे एक प्रकारचा वेली गुलाब, गुच्छात आठ दहा फूले असतात

j2.jpg

बागेत आढळणारे एक कॉमन फूल

j4.jpg

धोत्र्याचा एक प्रकार. याचे झाडही मोठे असते आणि फूलही

j5.jpg

लिलीचा एक प्रकार

j9.jpg

हा पण जास्वंदीचाच एक प्रकार

j10.jpg

आणि हा आहे सिल्व्हर ओकचा फुलोरा

j11.jpg

आणि हि पिवळी जास्वंद

j8.jpg

सुंदर फोटू आहेत सगळॅ.. मला तो लिलीचा तर खासच आवडला. उन मस्त पडलंय त्यावर.

आता ह्या कॅमे-यातुन केनया दर्शन कधी घडवणार???

वाह!!
मस्त फोकसिन्ग आहे की.
कोणता कॅमेरा घेतला?? (माझा अंदाज कॅनन SX 120 IS / SX20IS)
अभिनन्दन Happy

दिनेशदा,
मस्त फोटो !
तुमचा जाता जाता केलेला एक साधा प्रयोगही सूक्ष्म चित्रणापेक्षा कमी नसतो ...!
Happy
आता बोला ....
आता ह्या कॅमे-यातुन केनया (कि अफ्रिका?)दर्शन कधी घडवणार???

आभार रे.
हे प्रकरण माझ्यासाठी जरा नवे आहे. कारण वरच्या ज्या चौकटी आहेत, त्या मूळ फोटोतला अगदी छोटासा भाग आहे.
कॅमेरा पॅनासोनिक ल्यूमिक्स टि झेड ८ आहे. काल गरब्याचे व्हिडियो शूटींग पण केले.

साधना... लवकरच येत आहे.. रिक्षा.

वा!!! सुंदरच आहेत दिनेशदा हे फुलांचे फोटो!!! आपल्या ओळखीचेच फोटो ह्या झुम लेव्हलला किती अनोळखी आणि सुंदर भासतात!!!!! अंतरंग हे नावही सार्थ आहे.... आवडले... Happy

खरे तर हे सगळे अजाणतेपणी घडले. मी नेहमीप्रमाणेच केवळ फूलांचे फोटो काढत होतो. एक जास्वंदीचे फूल तूटून खाली पडले होते. त्याचा फोटो काढला तर तो असा होता.

P1000341.JPG

त्यातले फक्त फूलच घेऊ असे म्हणत क्रॉप करायला गेलो, तर हे "अंतरंग" दिसले.
बाकी टेक्नीकल डिटेल्स असे.
फोकल लेंन्थ ३९.७ एम एम, एक्स्पोझर टाईम ०.००२ सेकंद (१/५००) अपरेचर एफ ५.६, रेझोल्यूशन ४००० बाय ३०००

दिनेशदा, फोटो जबरी आलेत. क्रॉपिंग मस्त जमलयं, फुलांचे रंग एकदम खुलून दिसतायत.

पॅनॅसॉनिकची लेन्स सगळ्यात उत्तम असे वाचलेले. निकॉन, कॅनन आणि पॅनॅसॉनिक यांच्यात तुलना करताना वाचले होते. कॅमेरा घेताना पॅनॅसॉनिकचा एक F-१५ फार आवडलेला, पण पॅनॅसॉनिकचे नाव भारतात कमी ऐकले असल्यामुळे (मी तरी) व आफ्टरसेल्स सर्विस बद्दल जास्त माहिती न मिळाल्यामुळे , कॅनन घेतला.

व्वा!!! Happy

आभार सगळ्यांचे.
रंगासेठ,
माझे या आधीचे सर्व फोटो मी कोडॅक ने काढले होते. दोन्हीची तूलना करता, हा जास्त कॉम्पॅक्ट आहे.
शटर स्पीड आणि अपरेचर दोन्ही हवे तर सेट करता येतात. पण मूव्हीचा अनुभव तितका चांगला नाही, म्हणजे चित्रीकरण सुंदर झालेय, रंगही छान आहेत, पण रिप्ले करताना जर्क्स जाणवतात. शिवाय त्या फार काळ शूट करता आल्या नाहीत (आता पुढच्या दुबई वारीत, कॅमकॉर्डर घ्यावा लागणार.) २ जीबी मेमरी कमी पडली. लॅपटॉपवर त्या फाईल्स, फक्त त्यांचे सॉफ्टवेअर वापरुनच बघता आल्या. विंडोज मिडीया प्लेअर मधे, बघता आल्या नाहीत.
अजून बाकिचे फिचर्स वापरुन्, इथे पोस्टतो.

Back to top