बंगळुरु मत्स्यालय
Submitted by अभि_नव on 7 October, 2017 - 08:36
..
..
..
एक अकेला इस शहर में...
असं वाटलं.. घरची आठवण आली..
माय मराठी ची ओढ जाणवु लागली की पहिलं काम काय करावं?
माबो उघडावं!
अन ह्या सुंदर विश्वात स्वतः ला झोकुन द्यावं.. इथे काय नाही?
आईची माया.. बाबांचा कडक पणा.. बहीण भावांचं प्रेम.. मायेचा ओलावा.. आणि ज्ञानाचं भंडार..
ईथेच..भाववेधी काही वाचतो, हीरीरी ने आपली मते मांडतो, कुठला चित्रपट पाहीला ते बोलतो, काय खाल्लं, काय घेतलं सगळं शेअर करतो आपण..
आणि आपल्या सारखेच इतर अनेक जण..
ह्या सगळ्या लोकांना प्रत्यक्षात भेटावसं न वाटेल तर नवल!
पण ते जरा कठीण आहे कारण आपण देशा-देशात विभगलेलो..