Submitted by मन मानस on 6 April, 2021 - 02:05
खिडकीच्या काचेवर ओघळणारे पाणी जरा स्तब्ध झाले ।
ना ठाऊक कोणते प्रश्न मागे ठेऊन गेले ।
ना जाणे प्रश्नच होते की उत्तरे होती काही ।
समजण्यासाठी त्या क्षणी भान ही नाही ।
भेभान होती स्पंदने बेभान विचार होते ।
खरेच होते सर्व की जग हे भासाचे ।
डोळ्यांत ओल,त्या मनात खंत होती ।
खळाळणार्या नदी सारखी ती पण आज पाऊस असून शांत होती ।
ओसरणारा पाऊस अन डोळे दाटून आणणारी आठवण सगळे स्तब्ध होते ।
बघून हे सर्व मेघांचेच डोळे आज भरभरून रडत होते ।
सरायला आली सांजवेळ काळोख दाटलेला नभी।
चाहूल वेचायला मात्र अजूनही ती खिडकीत तशीच उभी ।
मन मानस ,पुणे
मोबाईल नंबर-९६६५२०३८४२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान. पुलेशु
छान. पुलेशु
छान
छान
अजिंक्यराव,साद दोघांनाही
अजिंक्यराव,साद दोघांनाही धन्यवाद.