हक्काची जागा

Submitted by तुष्कीनागपुरी on 26 February, 2025 - 23:25

आज मी खूप आनंदात आहे. का सांगू ?
आज ती भेटायला आली तेच आवडणा-या हिरव्या ड्रेस मधे.
आणि कहर म्हणजे..स्वतः केलेला शिरा घेऊन आली.
शि-याचा एक घास तयार केला आणि चक्क मला भरवायला पुढे केला.
माझ्यासाठी ते इतके अचानक होते की सर्वदूर आतल्या पेशी पेशींमधे काटा उभा रहीला...
त्याच निमित्ताने... तिच्या मऊ बोटांचा ओठांना झालेला स्पर्श
कसे सांगू ... शब्दच नाहीयेत बघ

अरे वेड्या, आपणच नव्हतो भेटलो का? मलाच काय सांगतोयस?

अगं माहिताय गं ईतकं भरून आलेय ना की कुणाला सांगितल्याशिवाय राहवतच नव्हतं.
कुणालाच माहित नसल्याने कुणाला सांगू समजतच नव्हते.
एकच हक्काची जागा आठवली म्हणून तुलाच फोन करून सांगतोय.

तुष्की नागपुरी
नागपूर, गुरूवार, २७ फेब्रुवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults