या/ही म्हण( म्हणी) कशा वा कशी तयार झाली व झाल्या ??

Submitted by Mi Patil aahe. on 4 January, 2019 - 13:02

संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मकरसंक्रांतीची पुराणात अशी कथा सांगितली आहे की संकरासुर राक्षस जनतेचा फार छळ करीत असे यामुळे सर्व लोक हैराण झाले. या राक्षसाचा नि:पात करण्यासाठी परमेश्वराने संक्रांत देवीचा अवतार धारण करून त्या संकरासुराचा वध केला. लोकांचे संकट निवारण होउन सर्व जनता सुखी झाली. या देवीला अनेक हात आहेत. एखाद्या वाहनावर बसून वस्त्रालंकारानी सुशोभित होऊन, हातात विविध शस्त्रे घेऊन ती एका दिशेकडून दुसरया दिशेकडे जात असते असे वर्णन पंचांगात दिलेले आहे.संक्रांतीचे वर्णन प्रत्येक वर्षी निरनिराळे असते.विशेष म्हणजे संक्रांत देवीस ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींची महागाई होते असे मानतात यावरून आपल्याकडे संक्रांत वळणे म्हणजे संकट येणे हा वाक्प्रचारही आलेला आहे.

http://www.mumbaipuneonline.com/index.php?option=com_content&view=catego...

माझ्या माहिती प्रमाणे पानिपत चे तिसरे लढाई मराठे, मकर संक्रांती च्या दिवशी हरलेत म्हणुन संक्रांत आली अशी म्हण रुढ झाली असावी.

संक्रात महाराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार येते आणि आपण ख्रिस्ती कॅलेंडर वापरतो. त्यामुळे ती एकाच तारखेला येईल याची शाश्वती नसल्याने जेव्हा जेव्हा ती येते तेव्हा संक्रात आली असे सांगावे लागते.

ईसवीसन शाहरूखच्या उदयापूर्वी जेव्हा अमिताभ सुपर्रस्टार म्हणून गणला जायचा तेव्हा त्याच्या सुपर्रहिट चित्रपट शोलेमध्ये देखील गब्बरसिंग नामक डाकूला असेच होली कब है विचारावे लागले होते.

जर सरकारने शिवजयंतीचा गोंधळ संक्रातीतही घातला आणि ती अमुकतमुक तारखेला फिक्स केली तर मात्र यापुढे कोणी संक्रात कब है विचारणार नाही आणि त्यावर कोणी घे रे संक्रात आली असे उत्तर देणार नाही.

- एक अभ्यासू उत्तर द्यायचा क्षीण प्रयत्न.
उत्तर पटले तर पसरलेल्या पंखाना त्याला अलगद कवेत घेऊ द्या.

दिवाळी महाराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार येते. ती कधी ऑक्टोबर तर कधी नोव्हेंबर मध्ये येते. तारखा एवढ्या वेगवेगळ्या असतात. पण संक्रांत मात्र १४ किंवा १५ जानेवरीलाच का येते? इसवी सन १६००, १७००, १८०० मध्ये संक्रात किती जानेवारीला होती? २१००, २२००... २५०० मध्ये किती जानेवारीला असेल? असे प्रश्न पाडून माहिती शोधून बघा.

संक्रांत मात्र १४ किंवा १५ जानेवरीलाच का येते?>>

संक्रांत हा सण सूर्याच्या संक्रमणाशी संबंधित आहे. आपले बाकीचे सण चंद्राच्या संक्रमणावर आधारित आहेत. जसे दिवाळी ही अश्विन चतुर्दशी, अमावास्येला येते. ह्या चांद्र तिथी इंग्रजी दिनदर्शिकेशी जुळत नाहीत कारण १२ चांद्र महिने आणि १२ सौर महिने यांचा लसावी जुळत नाही (दिवसांच्या भाषेत). संक्रांतीचे तसे नाही. चांद्र तिथीशी तिचा संबंध नाही. तिचा संबंध मुळातच सौर तिथीशी असल्यामुळे सौर दिनदर्शिका असलेल्या इंग्रजी कॅलेंडरवर ती दरवर्षी एकाच तारखेला यायला हवी. पण तिथेही ३६५ दिवस आणि पृथ्वीला १ प्रदक्षिणेसाठी लागणारा अचूक वेळ हे सारखे नसल्यामुळे एखाद्या वर्षी सूर्याचे संक्रमण एखाद्या दिवसाने पुढे जाते. तेव्हा संक्रांत १५ ला येते.

बरोबर शंतनु.

सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस मकर संक्रात.
पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालण्यास ३६५ दिवसांच्या पूर्णांका पेक्षा जास्त वेळ लागतो. निरयण पद्धतीने ३६५ दिवस, ६ तास आणि ९ मिनिटं. त्यामुळे मकर संक्रात दरवर्षी ६ दिवस ९ मिनिटांनी पुढे जाते. चार वर्षात १ दिवस ३६ मिनिटांनी.
पण चार वर्षांनी लीप वर्ष येते त्यात एक दिवस जास्त असतो. त्यामुळे पुढली मकर संक्रात १ दिवस मागे येते.
म्हणजे चार वर्षात संक्रात ३६ मिनिटे पुढे जाते.
म्हणजे वर्षाला सरासरी ९ मिनिटं.
म्हणजे १०० वर्षांनी ९०० मिनिटं.
पण दर शंभर वर्षांनी लीप वर्ष वागळतात. तेव्हा संक्रांत दर शंभर वर्षांनी १ दिवस आणखी पुढे जाते. मात्र ४०० व्या वर्षी लीप वर्ष वगळत नाहीत. त्यामुळे चारशे वर्षात संक्रांत दर वर्षी ९ मिनिटे व्यतिरिक्त १००, २०० आणि ३०० या वर्षी वगळलेल्या ३ लीप वर्षांमुळे आणखी ३ दिवस पुढे जाते.
४०० x ९ = ३६०० मिनिटे = २.५ दिवस + ३ दिवस = ५.५ दिवस.

इसवीसन १६०० मध्ये संक्रांत ८/९ जानेवारीला होती, इसवीसन २५०० मध्ये २१/२२ जानेवारीला असेल.

http://khagolmandal.com/indian-astronomy/astronomy-of-makar-sankranti/

मानव, बाकी गणित बरोबर आहे. परंतु एका वर्षाचा अचूक (?) काळ ३६५ दि ६ ता ९ मि नसून ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४६ सेकंद (साधारण) असा आहे. त्यामुळे दर ४ वर्षांनी साधारण २३ तास १५ मिनिटे जास्त होतात. लीप वर्षामुळे ते दर ४ वर्षांनी ४५ मिनिटे मागे पडते. असे १०० वर्षांनी १८ तास आणि ४३ मिनिटे मागे पडते. तेव्हा १००व्या वर्षी लीप वर्ष नसल्यामुळे ते २४-१८//४३ = ५ तास १७ मिनिटे पुढे जाते. आणि ४०० वर्षांनी २१ तास ७ मिनिटांनी पुढे जाते, आणि तेव्हा लीप वर्ष असल्यामुळे पुन्हा २ तास ५३ मिनिटांनी मागे पडते. साधारण ४००० वर्षांनी संक्रांत १ दिवस मागे पडेल.

तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये ९ मिनिटे ही ढोबळमानाने पकडली आहेत आणि ती वजा करण्या ऐवजी अधिक केली आहेत. सामान्यपणे एक वर्षाचा काळ हा ३६५.२४२२ दिवस इतका मानला जातो.

https://www.wwu.edu/skywise/leapyear.html
https://en.wikipedia.org/wiki/Leap_year

एका वर्षाचा अचूक (?) काळ ३६५ दि ६ ता ९ मि नसून ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४६ सेकंद (साधारण) असा आहे. >>>

बरोबर आहे. पण विषय पंचांगाप्रमाणे येणाऱ्या मकर संक्रातीच्या तारखेचा आहे. ज्यात एकवर्षाचा अचूक कालावधी धरलेला नाही.
निरयन पद्धतीनुसार एक वर्षाच्या कालावधी करिता तारांगण रेफरन्स घेतला आहे. पुढल्यावेळी तारांगण परत त्याच स्थितीत येईल तो काळ. यात पृथ्वीच्या स्वतः भोवती फिरण्याच्या अक्षात होणारा बदल दुर्लक्षिला गेल्या. त्यामुळे या पद्धतीने एक वर्षाचा कालावधी ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे १० सेकंद एवढा येतो.

जॉर्जियन कॅलेंडर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सायन पद्धतीने सौर्य वर्षावर आधारीत आहे.
जर या पद्धतीने कालगणना केली असती तर मकर संक्रातीची तारीख बदलली नसती, तीच राहिली असती. ४००० वर्षात १ दिवस मागे पडली असती. (पण अचूकता राखण्यास पुढे दर ४००० वर्षांनी लीप वर्ष वगळावे लागेल, तेव्हा संक्रांत ४००० वर्षांनी एक दिवस मागे येईल आणि परत त्याच तारखेला राहील.).

परंतु मकर संक्रांत ठरवताना होणारी वर्षाची कालगणना ही निरयन पध्दतीनुसार (sidereal year) आणि जॉर्जियन कॅलेंडर सौर वर्षाचे असल्याने हा फरक पडतो हेच दाखवायचे आहे.

त्या लेखातही शेवटी मकर संक्राती अशी पुढे जात राहू नये म्हणून सौर वर्ष वापरणे सुरू करावे हा उपाय सुचवला आहे.

अच्छा! माझी आतापर्यंत अशी समजूत होती की सर्वच सौर कॅलेंडर्स हे तारांगण रेफरन्स घेतात म्हणून. माहितीबद्दल अनेक आभार. तुम्ही दिलेले विश्लेषण वाचून मग अयनांश वगैरे वाचले आणि मी वरती घातलेला घोळ लक्षात आला Happy