ती व्यक्ती म्हणजे स्त्री, बाई, महिला,नारी,मादा,स्त्रीलिंगी
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा,गडी,नर,पुल्लिंगी
तर "ती व्यक्ती"- सामान्यतः माणूस, मानवप्राणी मधील स्त्रीलिंगी मानली जाते---- व्याकरणदृष्ट्या,विज्ञानानुसार,अध्यात्मानुसार, सामाजिक मानसिकतेनुसार!
निसर्गाने तिला निर्माण केले,असे विज्ञान सांगते.
ब्रम्हदेवाने/परमात्म्याने/ईश्वराने तिला निर्माण केले असे अध्यात्म सांगते.
पुरूषांसाठी तिला निर्माण केले असे सामाजिक मानसिकता (?????) व्याकरण सांभाळत कथा, कादंबरी,लेख,निबंध, कविता,काव्य,महाकाव्य,कथा,कहाणी,पुराण,महापुराण, कीर्तन,प्रवचन,भारूड,गोष्ट, शेरोशायरी, नाटकं,सिनेमा,सिरीयल,गीत, गाणी,श्र्लोक, विचार,मत, लिखाण, वक्तृत्व,बोली, दंतकथा, वगैरे, वगैरे च्या माध्यमातून बरेचदा सांगते.
कारण काय असावे बरे-------???????
ती व्यक्ती स्त्री असली तरी ती स्त्री म्हणून कधीच जगत नाही,अन् ती व्यक्ती "एक व्यक्ती"(माणूस) म्हणून तर मुळीच जगत नाहीच नाही.मग व्याकरणदृष्ट्या 'ती व्यक्ती'हे संबोधन (सामान्य नाम) सामान्यतः स्त्री- पुरुष दोन्ही (ला) साठी संबोधित (उल्लेख) करीत असले तरी व्यवहारात सामान्यपणे ती व्यक्ती (माणूस) म्हटले की सहजच डोळ्यासमोर पुरुषदेहाची आकृती सवयीने समोर येते.(जसे बाळ जन्मल्यानंतर ,गर्भ राहिल्यास,मूल-बाळ आहे,असे म्हटले की तो मुलगाच असावा ही इच्छा/अपेक्षा मनोमनी आढळते,पुरुषदेहप्रधानमानसिकतेमुळे!) कारण ती व्यक्ती तो नसून ती आहे म्हणजे चुकूनमाकून स्त्री, बाई आहे,असे आढळल्यास "ती व्यक्ती" हा तिच्यासाठी उल्लेख सहसा कोणी करीत नाही.बरेचदा आवर्जून ती व्यक्ती म्हणजे एक स्त्री सुद्धा असू शकते हे आठवणीने लक्षात आणून द्यावे लागते.म्हणून समाजात तिचा नामोल्लेख सुरू होतो तो म्हणजे
ती कुणाची मुलगी ( त्यातही आईची मुलगी म्हणून नाही),त्यानंतर कुणाची (ओवाळून घ्यायला भाऊ असावा) बहीण म्हणून, पुढे जाऊन कुणाची बायको किंवा सून अन् नंतर कुणाची आई (मुलीची नाही बरं!!!) म्हणून होतो आणि ती जगतेही त्यासाठी किंवा तिने जगावे त्यासाठी असे गृहीत (म्हणून तर ती गृहीणी बनली नसेल ना???) धरून जग चालत राहते किंवा जगाला माहीती होते किंवा जग तिला ओळखत राहते,अन्यथा तिचे अस्तित्व जग (पुरूषदेहप्रधान) मानतही नाही.तिचा जन्म हा तर आधिच नाकारलेला असतो.त्यामुळे तिचं जीवन हे सामन्य ,सरळ कधीच नसते, आणि तरीही "लग्नाआधी आणि लग्नानंतर" ही साधी,सरळ विभागणी तिच्या उभ्या आयुष्याची या पुरूषदेहप्रधानमानसिकतेतून निर्माण झाली आहे.
ती व्यक्ती रोटी-बेटी व्यवहारातून पहिल्यांदा समाजापुढे दिसते म्हटले तरी चालेल.
ती व्यक्ती जिचा 'कन्यादान' या रीतसर विधीतून,राजरोसपणे,वाजतगाजत, थाटामाटात एका घरातून (पालकाकडून/पुरुषदेहाकडून/वडीलांकडून वडीलांद्वारे) दुस-या घरात (पालकाकडे/पुरुषदेहाकडे/नवय्राकडे/मालकाकडे/पतीकडे) पाठवणी, रवानगी,प्रवेश(गृह),हस्तांतरण होते.
यामुळे बरेचदा ती व्यक्ती (जिला माणूस म्हणून कधीच पाहिले जात नाही; व्यक्ती म्हणून तर, नाहीच नाही) सहानुभूतीचा विषय बनते आहे.
बरेचदा, "तिच्या अधिकारासाठी तीनेच लढा द्यायला हवा!", असही मान्यवर मत मांडून जातात.कारण काय असावे बरे?/मान्यवरांना असं का वाटलं?की ती लढा देत नाही.
"ती स्वत:चे नाव पुसून नवय्राचे नाव लावते,नवय्राच्या घरी राहते-----म्हणजे तिला आत्मसन्मान,आत्मभान नाही, अजूनही!!!!" असेही मत मांडणारे अलिकडे पुढे येत आहेत.
कारण काय असावे बरे????
तिच्या स्वातंत्र्यासाठी, कुठे थोडी हालचाल दिसली, की अशी मतं मांडून ,त्या हालचालीत काही दमच नाही; असे तर नसेल ना सुचवायचे,त्या मत/विचार/चर्चा करणार्यांना????
खरोखरीच ती व्यक्ती आत्मभान, आत्मसन्मान हरवलेली/विसरलेली आहे का?
मूळात "ती" व्यक्ती आहे का? नसेल तर "ती " कोण आहे? कोणी मला सांगू शकेल का? सांगू इच्छित आहे का?जमेल का कुणास माझ्या या फुटकळ प्रश्नांकित (प्रश्नाचे) धाग्याचे उत्तर देऊन ,माझ्यासारखे धागे विणने,अन् स्पायडरवुमन(म्यान) बनणे?
बघा प्रयत्न करून!!!!!!
"ती" तुम्ही तर नाहीत ना? नाही तर मग कोण आहे,ती व्यक्ती?
Submitted by Mi Patil aahe. on 6 January, 2019 - 05:56
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शब्दसंपदेला सलाम!!!
शब्दसंपदा चांगली आहे!!! छान!
तुम्ही म्हणताय तर असेल तसेच!
तुम्ही म्हणताय तर असेल तसेच!
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा
तो व्यक्ती म्हणजे पुरुष, बाबा,गडी,नर,पुल्लिंगी >>>>
हे पहिल्यांदाच ऐकतेय. व्यक्ती हे नेहमी "ती व्यक्ती" असच ऐकलं आहे. भले स्त्री असो वा पुरूष.
हे पहिल्यांदाच ऐकतेय>>>आपण
हे पहिल्यांदाच ऐकतेय>>>आपण ऐकले नसून वाचले आहे,बरं का!
तो इसम ती व्यक्ती तो माणूस
तो इसम
ती व्यक्ती
तो माणूस