खरड़ फळा

Submitted by अज्ञानी on 17 October, 2023 - 11:02

मायबोलीवर कुणीही येऊन कुठल्याही विषयावर छोट्या छोट्या पोस्टी लिहू शकण्यासाठी अर्थात मनमोकळे पणाने व्यक्त होण्यासाठी हा वाहता धागा...

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आचार्य, बाबांना श्रद्धांजली _/\_...
खूप हृद्य आणि हळव्या आठवणी लिहिल्यात तुम्ही..
तुम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो...

आचार्य __/\__
खूप हृद्य आणि हळव्या आठवणी लिहिल्यात तुम्ही..
तुम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो...++१

आचार्य __/\__
खूप हृद्य आणि हळव्या आठवणी लिहिल्यात तुम्ही..
तुम्हाला या दुःखातून सावरण्यासाठी बळ मिळो...++१

काय लिहू खरंच कळत नाही
भावना थोड्याफार समजू शकते असं म्हणायचं धाडस करतेय.
माझे बाबा कोविड ने आजारी होते, थेट icu गाठललं, dr म्हणाले होते हे जातील एका दिवसात तेव्हा ह्या भावना अनुभवल्या होत्या, रडून गोंधळ घालता येत नव्हता. कडेवर एक आणि पोटात एक बाळ, नवराही covid ने admit होता.
नशीबाने तेव्हा दोघेही वाचले.
पुन्हा स्मृती जाग्या झाल्या. भयानक काळ होता तो..

आचार्य,
ओह... वडिलांना श्रद्धांजली ___/\___
आणि तुम्हाला खूप सगळी एनर्जी.
घरातलं मोठं माणूस, त्यातून वडील गेले की अगदी पोरकं व्हायला होतं...
इथे व्यक्त झालात ते खूप हृद्य आहे.

धनुडी, सामो, अस्मिता, मृणाली, अनु, मंजूताई, स्वान्तसुखाय, प्रज्ञा ९, किल्ली, अवल आणि अमितव
आपल्या सर्वांचे आभार. इथे व्यक्त व्हावं कि नाही असं वाटत होतं, पण तुम्ही सर्वांनी धीर देऊन मला उपकृत केलेत.

किल्ली तै, तुझ्यावर जे संकट आलं होतं त्यातून सावरणे हे खूप मोठे काम आहे. पुढच्या आयुष्याला शुभेच्छा !

आचार्य
श्रद्धांजली बाबांसाठी
तुम्ही अगदी हृद्य मनोगत लिहिलंय.
अजूनही शाळकरी वयात आहोत कारण पाठीशीआईबाबा आहेत ही भावना सर्वत्र एकच.

धनि, अंतरंगी, झकास राव आभारी आहे.
हा धागा वापरला यासाठी क्षमा असावी. तात्पुरती नोंद करावी असे वाटत होते.
आता नेहमीप्रमाणे गप्पा मारायला या.

आई
आज दहा दिवस झाले

दिवस इतरांसाठी,आम्ही तर श्वास मोजतोय तोही तूच दिलेला.. जड होऊन राहिलाय प्रत्येक श्वास तुझ्या अंतिम श्वासानंतरचा!

मायेचा हात, काळजीची हाक आणि प्रेमाचा घास असणारी तू आम्हा तिघांना पोरकं करून गेलीस.
हो, आम्ही तुझी दोन मुले आणि एक आमचे बाबा.

तुझ्या आईची धीराची मोठी लेक होतीस तू, बहिणींची हक्काची अक्का होतीस तू, नातेवाइकांची आवर्जून खुशाली विचारणारी धागा होतीस तू,मैत्रीणींसाठी उत्साहाचा झरा होतीस तू, गाण्याच्या बाईंची लाडकी शिष्या होतीस तू..आमच्या साठी सर्वस्व होतीस तू!

अचानकपणे कळलेला तुझा आजार, आम्ही सारे धास्तावलो होतो पण तूच धीराने लढायला तयार झालीस. कितीही त्रास सहन करत कायम हसत राहिलीस. अगदी होता होईतो घरातील प्रत्येक गोष्ट उत्साहाने करत राहिलीस. शरीर आजारलं पण मनाने कायम टवटवीत आणि प्रचंड सकारात्मक राहिलीस.
शेवटी ही ना कसली तक्रार, ना आकस... शांतपणे अनंतात विलीन झालीस.

तुझ्या असंख्य आठवणी,तुझ्या हातची चव,आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझी असलेली खंबिर साथ,जितकी शिस्त त्याहून जास्त लाड,समजुतीच्या गोष्टी अन् चुकांबद्दल माफी... ह्या सगळ्याला पारखे झालो कायमचे... आता आम्ही काय करायचे ग?

तुझ्याच घरात,तुझ्या दिवसांविषयी बोलणं,तयारी करणं ह्या सारखं दुर्दैव नाही. घरभरच्या तुझ्या खुणा, तुझ्या हसण्या-गाण्याचा नाद,प्रत्येक गोष्टी वरून फिरलेला तुझा हात, नीटस ठेवलेली प्रत्येक वस्तू,त्यांना हात लावताना धाडस गोळा करावं लागतं ग प्रत्येक वेळी..! का असा भरला संसार अर्धवट सोडून निघून गेलीस? का माझी माहेरपणाची हक्काची जागा सुनी करून गेलीस?

तुझी आई देव पाण्यात ठेऊन बसली होती तिच्या साठी तरी थांबायचं ग..! नातवाची मुंज,नातीचं लग्न होईतोवर तरी थांबायचंस ना ग..! सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडून आता कुठे गाणं, पेटी शिकायला सुरवात केली होतीस,ते पूर्ण होईपर्यंत तरी थांबायचंस् की ग..! किमान लग्नानंतर ज्याची सावली झालीस त्या साथीदारासाठी तरी थांबायला हवंच होतंस ग..!

आता जिथे कुठे असशील तिथूनही सगळ्यांची काळजी करत असशील.. प्रेमाने आशीर्वाद देत असशील हे नक्की.. आता गेलीच आहेस आमच्या आधी तर देवाकडे एक मागशील का? प्रत्येक जन्मात आपलं हेच चौकोनी कुटुंब असावं .. हे वरदान घेशील का? प्रत्येक जन्मी तुझ्या पोटी जन्म घेण्याचा मान देशील का?

तुझ्याबद्दल लिहिण्यासाठी पुरतील एवढे शब्दच नाहीत खरं तर आणि हे वाचायला तू तरी परत कुठे येणारेस...पण माझी हाक तुझ्यापर्यंत नक्की पोहोचेल न ..
खूप खूप आठवण येतीये ...आई...

ओह !
श्रद्धांजली तेजो आईला.
या आठवणी अशाच मनात जपून ठेवा. लिहून काढा. आपलं माणूस कुठेही जात नाही. मनातली त्याची हक्काची जागा कधीही रिक्त होत नाही.
या दु:खातून बाहेर पडण्याचे बळ तुम्हाला मिळो ही प्रार्थना !

भावपूर्ण श्रद्धांजली.
तेजो, काळजी घे.
तुम्हा सर्वांना सावरण्याचं बळ मिळो. फार कठीण काळ असतो हा..!

तुझी आई देव पाण्यात ठेऊन बसली होती तिच्या साठी तरी थांबायचं ग..! >>> त्यांना तर अपत्यशोकाचा मोठा धक्का बसला असेल. Sad

तेजो, श्रद्धांजली आईंना. खरं मुलीच्या जाण्याचा शोक करावा लागणं हे अतिशय दुर्दैवी. काळजी घ्या सगळे. आणि काही आनुवंशिक आजार स्ट्रेन असेल तर योग्य तपासण्या पण.

रघु आचार्य, किल्ली,अस्मिता,सामो,, अनु,मंजूताई सर्वांची काळजी पोहोचली,धन्यवाद
अपत्य शोकाचे दुःख कल्पनेपलीकडले आहेच,पण तरीही आम्हाला सांभाळण्याकरिता आजीच धीराने उभी आहे

तेजो आईंना भावपूर्ण श्रद्धांजली!..तुमच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो...