सुशिक्षित होण्यासाठी

Submitted by नरेश रावताला on 26 December, 2024 - 10:24

सुशिक्षित होण्यासाठी
सुशिक्षित होण्याच्या नादात
माणूस
आपले सर्वस्व गमावून बसलाय,
सुशिक्षित झाला; पण
सुसंस्कृत झाला काय?
ज्या मुलूखात त्याला
राहावे लागते,
तिथे त्याचा होतो चेंदामेंदा!
असंख्य सवाल असतात
हल्ला करण्याच्या तयारीत...
मात्र, त्याची तयारी नसते
प्रश्नांचा मुकाबला करण्याची-
कारण,
ती तातडीची गरज नसते
त्यामुळे तो चक्रव्यूहात नाही शिरत
म्हणूनच तर
गुंडी नेमकी इथेच अडकते
सुशिक्षित झाल्यानंतरची!
वचर्स्व नसते, तसे सर्वस्व हरते
हाराकिरीच्या या स्पर्धेत
अखेर माणूस हरतो,
हरताना तेव्हढा तात्पुता हसतो
सुसंस्कृत नसल्याने...
असंस्कृत असल्याच्या बहाण्याने
पुन्हा सुशिक्षित होण्यासाठी.
© नरेश रावताला
nareshrawatala@gmail.com
***

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults