ताई (अंतिम भाग )
Submitted by मिरिंडा on 2 September, 2020 - 08:13
माझ्या तोंडाला कोरड पडू लागली. कोरड्या तोंडानेच मी ओरडलो, " क्...क्... कोण आहे तिकडे......." पण माझा आवाज दोन फुटांपर्यंतही गेला नसावा. माझ्या खिशात अजूनही मेन फ्यूज होते. मोबाईलही जवळ नव्हता. अतिशय थंड शांततेत पावसाचा तेवढा लागलेला एकसूर भयाण शांततेचा भंग करीत होता. खिडक्या सगळ्याच बंद असल्याने बाहेरची हवा आत येत नव्हती. हॉलमधलं डायनिंग टेबलही बरंच दूर होतं. तिथे पाणी असलं तर......? आत पुन्हा कोणाच्यातरी फिरण्याची खसफस ऐकू आली. मला भीती वाटू लागली. मला स्वत:च्या नेभळटपणाचा राग आला. जरा बरं वाटलं. रागाने भितीवर नियंत्रण आणलं. तात्पुरत्या निर्माण झालेल्या बळावर मी भराभर पावले टाकली.
प्रांत/गाव:
शब्दखुणा: