तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
वळू
वळू हा शब्द जरी उच्चारला तरी माणस एकमेकांकडे टकमका पाहायला लागतात. काय दिवसभर नुसता वळूसारखा बसून रहातोयस असे एखाद्याला गमतीने जरी म्हटले तरी त्याचा रागाचा पारा 100 च्या पुढे जातो. थोडक्यात काय तर वळूची उपमा दिलेली फारशी कोणाला आवडत नाही. वळू हा कोणत्याच कामाचा उपयोगी नसतो. अवाढव्य, बशा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वळू म्हणजे जंगली बैलच की.
शिक्षक म्हणून सोसताना
मी आहे समाज शिक्षक
मला आहे राष्ट्र शिल्पकार
मी पाळतो आदर्श तत्वे
मी स्वछता अभियान घटक
मी कुटुंब नियोजन घटक
निवडणूक कामात सतत मग्न
मी आहे मुलाचा आचारी वाढपी
मी ठेवतो शासनाच्या सर्व नोंदी
चोवीस तास मी आहे सेवेकरी
मी करतो मतदारांची नोंदणी
संचालक घेतात दरवर्षी खंडणी
प्रशिक्षणाची कटकट जन्मोजन्मी
ऑनलाईन माहितीची नवीन खेळी
बदलती धोरण अन गावचं राजकारण
पेन्शन बंद धोरण अन बायकोची कटकट
अति लोभाचे फळ
राघव नावाचा एक गरीब कोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या नदीकाठी रहात होता. त्याचे घर अगदी साधे होते. नदीत मासे पकडायचे व ते गावात नेऊन विकायचे हा त्याचा उद्योग होता. या व्यवसायावर तो स्वतःची व पत्नीची उपजीविका करीत असे. त्याची पत्नी धूर्त होती. तिला गरिबीत राहणे पसंत नव्हते. तिच्या अपेक्षा खूप मोठ्या होत्या.
गोष्ट एका बजेटची
हुबालवाडी गावात एक मध्यमवर्गीय कुटुंब होते. तस पाहिलं तर जेवून खाऊन सुखवस्तू असणाऱ्या पैकी हे एक कुटुंब. स्वतःचे तीन खोल्यांचे राहत घर. शासकीय अनुदानातून शौचालय बांधून घेतलेलं. दोन मुलं त्यांच्या बायका, दोन मुली अन गण्या व गंगी अस आठ जणांचं दणदणीत कुटुंब. घरात टीव्ही, डायनिंग टेबल, वॉशिंग मशीन या साऱ्या सुविधा. दोन्ही मुलं कमावती. दोन मुली कॉलेजमध्ये शिकणाऱ्या. पैका अमाप मात्र खर्चाच्या बाबतीत कुणाचा कुणाला पायपोस नव्हता. गण्या व गंगी इचार करायची की इतका पैका मिळून तो पुरत कसा नाय.
मला ५ बाय ४ फूट असा व्हाइट बोर्ड हवा आहे. शाळा कॉलेजात असतोतसा.. ज्यावर ड्राय एरेजर पेनने लिहिता येईल. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे कुठे मिळेल. बोर्ड फक्त लिहिण्यासाठी हवा आहे म्हणजे नॉन मॅग्नेटिक हवा.
साधारण किंमत किती असेल?
भिंतीला लावायला हूक असतात का? की स्टँडही येते त्याच्या बरोबर?
साधारण आकार ५ बाय ४ किंवा ३ फूट
१५० बाय १२० किंवा ९० सेमी.
ADCET, आष्टा ईथले मायबोलीकर