ADCET, आष्टा

Submitted by webmaster on 6 April, 2008 - 21:31

ADCET, आष्टा ईथले मायबोलीकर

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकशाहीत सर्वात महत्वाचा घटक आहे लोक- मतदार. जो पर्यंत तो जागा होत नाही तोपर्यंत लोकशाहीचा काही उपयोग होईलसे वाटत नाही. अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय लोकशाही मात्र इथे तुफान लोकप्रिय होईल. बाकी आपली जगप्रसिद्ध प्रशासनव्यवस्था, त्यात ढवळाढवळ करणारे पुढारी हे सगळे आपले काम नेहमी चोख पार पाडत असतात.
कोण तो प्रमोद मुतालिक आता प्रसिद्धीच्या शिखरावर असेल तिकडे कर्नाटकात. निवडणुकांच्या तोंडावर तिथलं सरकार त्याला हात लावेल तर शप्पथ. १४ ला हा पट्ठ्या चांगला धुडगुस घालणार दिसतोय. बरच बरळतोय सध्या. किती सोप्पय नाही.. जनतेच्या हिताच्या गोष्टी बाजुला सारुन त्यांचाच उपयोग अशा कार्यक्रमात करायचा.(येऊन जाऊन परत त्याच्यावरच घसरलो. असो.)
बघुयात. Happy

मित्रांनो,
Alumni बद्दल कुणाला काही माहिती आहे का? उत्साही मंडळींची बरीच मेलामेली चालु असल्याचे कळले.

भारतीय क्रिकेट संघ सध्या भलताच फॉर्मात आहे. चांगले दिवस आहेत म्हणायचे.

हो भलताच. ४१ वर्षानंतर आपण न्युझीलँड मधे मालिका जिंकली. Happy
पण आजच्या पावसामुळे २-० च्या आशेवर पाणी पडले Sad

कुणी 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' पाहिला का?

असो,
बर्‍याच दिवसानंतर ADCET च्या हितगुजवर नविन प्रतिसाद आला.
बाकीचे कुठे आहात?

हो मी पाहिला, चित्रपट खुपच छान आहे.
**********
मी या जगाचा नागरिक आहे.

नमस्कार मित्रानो. बर्‍याच दिवसानी इकडे आलो.

नमस्कार मित्रानो कसे आहात्....योगाच लग्न झाल. योगानद ला खुप शुभेछा ...

drukghoshana.jpg

नमस्कार !!

आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.

यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.

त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.

या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.

यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.

आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.

स्वत:च प्लान करा केरळची सहल कुटुंबाबरोबर किंवा मित्र मैत्रिणिंबरोबर
अगदी कमी खर्चात आणि घरगुती वातावरणात आपल्या माणसांबरोबर.

तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

mbs_nibandh.jpg

प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख जवळ येतेय! आपल्या प्रवेशिका २० फेब्रुवारी, २०११ च्या आधी आमच्या पर्यंत पोचल्या पाहिजेत.

स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
आणि आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.

या वर्षीच्या 'मराठी भाषा दिवस' कार्यक्रमात उत्साहाने भाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करा..
कार्यक्रमाच्या संपूर्ण माहितीसाठी खालील धाग्यावर पहा-
मराठी भाषा दिवस- स्पर्धा आणि कार्यक्रम

तुमच्या प्रवेशिकांची वाट पहात आहोत.

धन्यवाद
संयोजक_संयुक्ता