कोल्हापूर
कोल्हापूर
जबरदस्त Smile
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
देव भेटला नाही....
देव भेटला नाही
मी आजन्म केले पूजापाठ
म्हटली स्तोत्रे , श्लोक साठ
मी राहिलो उपाशी अख्खा दिवस
श्रध्देने फेडले सारे नवस
दिन ऐसा शोधावा जेंव्हा
मी सूर्यास अर्घ्य वाहिले नाही
पण आजतागायत एकदाही
मी देवाला पाहिले नाही
माझी कठोर होती उपासना
मनोभावे देवाची आराधना
नित्य केली पंढरीची वारी
ध्यानधारणा गंगेकिनारी
मी पूजेशिवाय पाण्याच्या
थेंबाला शिवलो नाही
तरी कसा अजून मी कधी
देवाला दिसलो नाही
चारोळी
पाळणा
Hiii...मुलींसाठी लिहिलेला पाळणा...जेंव्हा मला मुलगी झाली तेंव्हा मी खूप शोधलं पण एकही खास मुलीसाठी लिहिलेला पाळणा मिळाला नाही....म्हणून राम आणि शिवाजीराजांचा पाळणा म्हणून लेकीला पाळण्यात घातलं....मात्र परवा भावाच्या मुलीसाठी पाळणा लिहायचा प्रयत्न केला ...तिचा हक्काचा पाळणा...पहिलाच प्रयत्न आहे...समजून घ्या...
- मीनल
राजकारण
दिसत नसेल आरशात पण...
दिसत नसेल आरशात पण....
दिसत नसेल आरशात पण
आता वय होत चाललयं....
केस असतील काळेभोर
मन मात्र पांढरंफटक पडलयं...
डोळे झालेत अधू
नाही वाचता येत कोणाच्या
चेह-यावरचे भाव
हात घेता येतो हाती
नाही ओळखता येत
कोणाच्या मनाचा ठाव
माझ्या ओळखीच जगचं
कदाचित धूसर होत चाललयं...
दिसत नसेल आरशात पण....
शब्द ही तोलून मापूनच
पडतात कानावर
गर्भितार्थ कळत असतात
पण मी नाही घेत मनावर...
मनही जाणिवनेणिवेच्या
पलिकडे जात चाललयं....
दिसत नसेल आरशात पण....
तू वाच..
वाचक नसला तरी सुचे
शब्द एकला तुला रुचे
श्वास,फुले, तन-मन,आत्मा
नाती, नभ, आकाश, धुवा
तेच तेच पुन्हा पुन्हा
नदीलाही फुटतो पान्हा
अत्तर, दरवळ, सांज खुले
कातरवेळी जीव भूले
सांभाळ ऋतुंची अस्त्रे तू
भूईवर हिरवळ वस्त्रे तू
वाढावी मग कविता राणी
सूर गुंफूनी होतील गाणी...
तरीपण आहे कवी उदास
म्हणतो नाही जामले खास
पण तरी तू वाच हा !!
कहर
ग़़्झल हवी आहे
"सांगु कसे हे शब्दात मि जानुन घे डोळ्यातुनी भाव माज्या मनीचे " हि गजल हवी आहे
Pages
