कहर

Submitted by रमा. on 20 April, 2015 - 22:55

मी रोज उभी त्या ठरल्या जागेवरती
तू रोजच द्यावा ना येण्याचा बहाणा
मी अशी कशी रे रोजच ठरते वेडी
तू साळसूद वर बनचुका शहाणा..

मी कलम चालवत कागदावर उतरावे
दिवसाचे कुठलेही ना पहाता प्रहर
तू द्यावी त्यावर दाद ही इतकी सुंदर
मनी शब्दांचा निव्वळ माजावा कहर

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users