वळू

Submitted by Pradipbhau on 23 February, 2018 - 05:39

वळू
वळू हा शब्द जरी उच्चारला तरी माणस एकमेकांकडे टकमका पाहायला लागतात. काय दिवसभर नुसता वळूसारखा बसून रहातोयस असे एखाद्याला गमतीने जरी म्हटले तरी त्याचा रागाचा पारा 100 च्या पुढे जातो. थोडक्यात काय तर वळूची उपमा दिलेली फारशी कोणाला आवडत नाही. वळू हा कोणत्याच कामाचा उपयोगी नसतो. अवाढव्य, बशा बैल म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. वळू म्हणजे जंगली बैलच की.
एखादा माणूस कोणताच कामधंदा करत नसला तर त्याला गावाला वळू सोडलंय काय? अशी विचारणा केली जाते. काय बोध होतो यावरून माहिती आहे. वळूची संपूर्ण जबाबदारी गावाची असते. त्याला देवाचा अंश मानतात. लोक आपणहून त्याचा सांभाळ करतात. वळू हा ग्रामीण भागात पूजनीय असतो. असे असताना एखाद्याला वळू म्हटले तर राग का येतो हे मला समजत नाही.
राज्यात असे वळू मोठ्या प्रमाणात आहेत. बहुतांशी भागातून हे वळू पहावयास मिळतात. दिवसभर बसून असतात. काम तर काहीच करीत नाहीत उलट गावालाच दहशतीखाली ठेवतात. सांगलीतल्या वळूची सर मात्र राज्यातील इतर कोणत्याही वळूला येत नाही. हसू नका आमची सांगली आहेच तशी. मी सांगतो त्याला काही आधार आहे. दिगदर्शक उमेश कुलकर्णी यांनी वळू चित्रपट 2008 मध्ये प्रसिध्द केला. त्यातील मुख्य भूमिका असलेला वळू हा सांगलीच्या पांजर पोळातील होता. त्याचे निधन झाले आहे. सांगली जिल्हा कशातच मागे नाही मग तो वळूच्या बाबतीत तरी कसा मागे रहाणार ?
उमेश कुलकर्णी यांनी 2008 मध्ये एक चित्रपट प्रसिध्द केला त्याचे नावच मुळी वळू होते. आपल्या मूक अभिनयाने त्याने या चित्रपटात धुमाकूळ घातला होता. अनेक पुरस्कारांचा हा चित्रपट पर्यायाने सांगलीच्या पांजर पोळातील वळू मानकरी ठरला होता. मग सांगा एखाद्याला वळू म्हटल्यावर राग का यावा.?
सांगलीतल्या हरिपूरचा शिवऱ्या बैल असाच प्रसिध्द होता. टकरीच्या मैदानात त्याने सांगलीचे नाव महाराष्ट्र कर्नाटकात केले होते. सूंदर गजराज व बबलू हत्तीने अनेकांची मने जिकली होती. त्याच मार्गाने या वळूची वाटचाल झाली.
सांगलीचे पांजर पोळ राज्याला माहीत झाले. कोण काही ऐकेना झाले की माणसं म्हणायची याला सांगलीच्या पांजर पोळात नेऊन सोडा. फार पूर्वीपासून सांगलीचा पांजर पोळ चर्चेत आहे. या चित्रपटात वळूच खरा नायक आहे.राज्यात 300 पेक्षा जादा वळूची पाहणी या चित्रपटासाठी केली. त्यात सांगलीच्या वळून हा नायकाचा मान पटकावला. थोडे थोडके नाही त्याचे वजन 300 किलो होते. एखाद्याला दहशत बसावी असाच त्याचा रुबाब होता. लाल डोळे, जाड शिंगे, वशिंड, मजबूत देहयष्टी त्यामुळे त्याला कोणी स्पर्धक नव्हताच. आजारी पडल्याने त्याचे वजन घटले. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
थोडक्यात काय तर आम्हा सांगलीतल्या लोकांना वळूचाही आदर आहे. त्याने आमच्या जिल्ह्याला प्रसिध्दी मिळवून दिली आहे. असा वळू झाला नाही व यापुढे होणे नाही. त्यामुळे कोणी वळूची उपमा दिली तर खचुन जाऊ नका उलट अभिमानाने आपला उर भरून आला पाहिजे. आदर्श शिक्षक, आदर्श खेळाडू, आदर्श कर्मचारी, आदर्श नेता याप्रमाणे आता आदर्श वळू हा नवा पुरस्कार दिला गेला पाहिजे. काय आहे की नाही गंमत.
फोटो.. इंटरनेट महाजालावरुन साभार
प्रदीप जोशी
मोबाईल..9881157709

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults