तत्त्वज्ञान

अंतरंग – भगवद्गीता – भाग ७

Submitted by शीतल उवाच on 8 July, 2020 - 01:32

सम्राट अकबर आपल्या दरबारात बसून मोठ्या उत्कंठेने तानसेनाचे गाणे ऐकत असतो. केवळ आपल्या सुरांच्या मायेने दरबाराला मोहून टाकणा-या तानसेनाच्या गाण्याचे त्याला नेहमीच नवल वाटत असते. त्याला अचानक असा प्रश्न पडतो की हेच गायन जर अद्भूत आणि अद्वितीय वाटते तर तानसेनाला ते शिकविणा-या गुरुंचे गायन कसे असेल? अकबराच्या या प्रश्नावर तानसेन म्हणतो की माझे गायन माझ्या गुरुंच्या पासंगालाही पुरणारे नाही. केवळ विनयाने आपण हे म्हणत नसून आपण त्याच्या अनुभव प्रत्यक्ष घेतलेला आहे. अकबरालाही या अनुभवाची आस लागते. परंतु आपले गुरुवर्य संन्यस्त आणि वानप्रस्थ जीवन व्यतीत करतात.

अंतरंग - भगवद्गीता - भाग ५

Submitted by शीतल उवाच on 20 June, 2020 - 08:41

मोजक्याच शब्दात गहन तत्त्वज्ञान सांगणे हे भारतीय तत्त्वज्ञांचे वैशिष्ट्य आहे. याबद्दल एक प्रसिद्ध कथा आहे. जगज्जेत्या अलेक्झांडर राजाने भारतातल्या तत्त्वचिंतकांबदद्ल खुप ऐकलेले असते., जेव्हा तो भारतात प्रवेश करतो तेव्हा अशा एका थोर तत्त्वचिंतकाला तो भेटायला जातो. तत्त्वज्ञ त्याच्या कुटीच्या बाहेर सकाळी सूर्यप्रकाश अंगावर घेत पडलेला असतो.अलेक्झांडर त्याला म्हणतो, “मी जगज्जेता अलेक्झांडर. आपल्याला भेटायला स्वतः आलो आहे. आपल्याला जे हवे ते मागा, मी देईन.” तो तत्त्वज्ञ शांतपणे उत्तर देतो, “मला काही नकोय.

अंतरंग – भगवद्गीता – ४

Submitted by शीतल उवाच on 17 June, 2020 - 05:58

नासदासीन्नो सदासीत्तदानीं नासीद्रजो नो व्योमा परो यत् ।
किमावरीवः कुह कस्य शर्मन्नम्भः किमासीद्गहनं गभीरम् ॥ऋग्वेद १०-१२९॥

अंतरंग – भगवद्गीता – २

Submitted by शीतल उवाच on 11 June, 2020 - 22:44

प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही!

अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले.

साधना (प्रस्तावना)

Submitted by प्राचीन on 8 March, 2019 - 04:16

नमस्कार मंडळी.
माझ्या परिचयातील एका ज्येष्ठ व्यक्तीने केलेली काही टिपणे, त्यांच्या निधनानंतर माझ्या हाती देताना त्यांच्या पत्नीने खंत व्यक्त केली की, त्यांचा हा अभ्यास लोकांपर्यंत पोहोचला असता तर बरे झाले असते. त्यांमध्ये त्यांचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि नोंदी असे स्वरूप आहे. तर आता मुख्य मुद्द्याकडे येते. प्रस्तुत लेख हा त्या टिपणांचं संकलनात्मक रूप आहे, याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे त्यामधील मते वा उल्लेख माझे व्यक्तिगत व अभ्यासपूर्ण असे नसून केवळ उद्धृत केलेले आहेत.
मायबोली हे विचारांना व्यक्त करण्याचे योग्य व सुलभ माध्यम असल्याने केलेला हा एक प्रयत्न.

सूक्ष्म जग आणि Quantum Physics : 2

Submitted by समीर देसाई on 26 September, 2016 - 17:21

. . . . . जड पदार्थांना वस्तुमान असतं तर अजड गोष्टी ह्या चैतन्यस्वरूपात असतात, त्यांना वस्तुमान नसतं. जड देह आणि अजड आत्मा हे गणितीय परिभाषेत अपसंख्येने म्हणजेच complex number notation ने दाखवता येतात. अपसंख्येचे दोन भाग असतात :
१. स्थूलांक (real part) आणि
२. सूक्ष्मांक (imaginary part)

शब्दखुणा: 

सूक्ष्म जग आणि Quantum Physics : 2

Submitted by समीर देसाई on 26 September, 2016 - 17:10

. . . . . जड पदार्थांना वस्तुमान असतं तर अजड गोष्टी ह्या चैतन्यस्वरूपात असतात, त्यांना वस्तुमान नसतं. जड देह आणि अजड आत्मा हे गणितीय परिभाषेत अपसंख्येने म्हणजेच complex number notation ने दाखवता येतात. अपसंख्येचे दोन भाग असतात :
१. स्थूलांक (real part) आणि
२. सूक्ष्मांक (imaginary part)

शब्दखुणा: 

विवेकानंद विचारः विसंगती-सुसंगती

Submitted by आतिवास on 12 January, 2015 - 02:31

'विवेकानंद साहित्य' वाचणे म्हणजे काहीतरी विशेष गोष्ट करणे असा आपल्याकडे आजही काही लोकांचा समज आहे. विवेकानंद साहित्य वाचणा-या व्यक्तीचे कौतुक तर होतेच पण ही व्यक्ती काहीतरी अवघड बाब करते आहे, असा समज होऊन त्या व्यक्तीकडे आदराने पाहण्याची प्रवृत्ती आजूबाजूच्या लोकांमध्ये निर्माण होताना दिसते. अर्थात काही लोक विवेकानंद 'वाचणे' ही निरर्थक कृतीही समजत असावेत – पण ला तरी असे लोक अपवादानेच भेटले आहेत. आयुष्याबद्दल विचार करणा-यांच्या वाटेवर बहुधा विवेकानंद नावाचा हा टप्पा कधी ना कधी येतोच.

पोपट झाला रे ...

Submitted by मामी on 5 December, 2012 - 11:37

दोनेक महिन्यांपूर्वीची गोष्ट. रविवारच्या निवांत दुपारी शाकाहारी जेवण जितपत अंगावर येईल तितपत आलेलं. मला होत असलेली झोपेची तीव्र इच्छा निग्रहाने नाकारून लेकीच्या अभ्यासाला बसण्याकरता मिनतवार्‍या करत होते. अर्थात 'असल्या प्रयत्नांना कसे टाळावे?' या विषयात पीएचडी केली असल्यामुळे ती नुसतीच इथे तिथे वेळकाढूपणा करत होती.

अचानक माझ्या बाल्कनीला आवाज फुटला. टीटीव्....टीटीव... (याचं मराठी भाषांतर विठू विठू असं करतात.)

माझ्या बाल्कनीला वेगवेगळे आवाज फुटतात. त्यातला घुट्टरघूं आवाज अतिशय वैतागवाणा असतो. आणि तो सदोदित येत असतो. कावळेदादा कधीमधीच येतात.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - तत्त्वज्ञान