माज
स्वैर वारा खेळ खेळतो, लालबुंद मातीशी
कणकणास उंच उडवे, दूरवर आकाशी
रंग वेगळा धूलिकणांचा मिसळला नभांत
सूर्यागमनाने झाल्या दशदिशा मूर्तिमंत
डोकावे अधूनमधून कळस एका मंदिराचा
दावे जणू दिशा कुणा , जरी आसमंत धुरळ्याचा
स्वैर वारा अन कळस , स्थितप्रज्ञ भासले
रंग घेऊनि सोनेरी मात्र धूलिकण माजले
माज उतरला क्षणात आपटले धर्तीवरती
स्वैर वारा मंद झाला , परतली लाल माती
==================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर