Submitted by सिद्धेश्वर विला... on 4 May, 2021 - 06:02
यज्ञास बैसलों आम्ही
आहुतीचा मान घ्यावा
भरा झोळी माझीच फक्त
भरभराटीचा आशिष द्यावा
अवकाळी पाऊस , भूकंपाची जोड त्याला
घरे पडली भूकंप येता , पडल्या दगड आणि विटा
त्याच चोरुनी यज्ञ मांडला
आता आहुतीसाठी आटापिटा
तिथे दूरवर चूल पेटली
राखण करती दोन मशाली
भाकरी रांधण्या तिथेच बैसली
सुन्न चेहरा घेऊन माउली
महत्प्रयासे पार मशाली
आता राहिली फक्त माउली
तिला एकदा का आडवी केली
आहुतीची मग चिंता मिटली
माऊलीचा भोग चढवितो
जगणं आलंय जिवा
क्षुब्ध व्हाल अशी आस धरितो
भरभराटीचा आशिष मज द्यावा
====================================
सिद्धेश्वर विलास पाटणकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा