मभागौदि २०२५ शशक – माल घाण असेल तर – तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 04:26

“बाबा हे काय करता?” नेहमीच्या बालसुलभ कुतुहलाने तिने विचारले.
“अगं घाणेरडे झालेले भाग काढून टाकतोय
आपण जो माल विकतो
तो घाण असेल तर लोकं घेणार नाहीत ना”
हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले तोंड वावच्या अभिनिवेषात उघडेच होते काही वेळ
काहीतरी विलक्षण शोध लागलाय असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
ती तिच्या झपाटलेल्या अवस्थेत जाता जाता बोलून गेली,
“एक सॉलिड आयडिया आली यावरून बाबा
मी आजच मिनी ला सांगते शाळेत
की नेहमीप्रमाणे कुणी घरात नसताना तुझे मोठे काका आले
की तोंडात माती कोंबत जा
आणि चड्डीत सू करून टाकत जा
माल घाण असेल तर ते कुणी फायदा घेऊ शकत नाही ना!”

Group content visibility: 
Use group defaults

OMG !

Sad

@कविन, @झकासराव, @मृणाली, @शार्मिला, @माझेमन, @मनिम्याऊ, @अनिंद्य, @मामी, @अस्मिता, @स्वाती,
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार
.
ही शशक एका झिप फाईल सारखी झाली आहे, वाचताना असंख्य विचार आणि उपविचार उपस्थित होतात की यावर एक निबंध माला लिहिता येईल, जसे मलाच जेव्हा पुन्हा पुन्हा वाचली तेव्हा असे काही काही मनात आले
• त्या मुलीच्या जवळ केवढा मोठा ट्रॉमा साचलाय जो अचानक बाहेर आला
• त्या मुलीला तिची मैत्रीण इतका वैयक्तिक त्रास सांगू शकलीय
• बाबाला असे काही सांगता येईल इतका त्या बाबाचा संवाद मुलीशी आहे
• या एका उलगड्यानंतर तर मला ओलिविया बेनसन ला कळेल तेव्हा ती काय काय करेल यावर एक दोन एपिसोड लिहिता येतील (लॉ एण्ड ऑर्डर – एस व्ही यू चा संदर्भ)
• मुलीने सुचवलेला उपाय फारच हास्यास्पद आहे आणि कदाचित काम करणार नाही, पण तिला उपाय सुचला आणि त्यावर युरेका झाले हे एक विदारक सत्य

तुम्हा सगळ्यांचा अभिप्राय सुद्धा हा ट्रॉमा तुम्ही वाचतांनाही अनुभवताय हे सांगतो आणि कथेला विषय पोहोचवता आला याची साक्ष देतोय.

बाप रे... Sad
पण शशक म्हणून जमलीय.

Screenshot_20250309_171903_WhatsApp.jpg

अभिनंदन तुष्कीनागपुरी.

इतका वेगळा ट्विस्ट असणारी ही कथा सर्वाधिक चटका लाऊन गेली >>> +1

सर्व मायबोली वाचकांचे मतदानासाठी आणि या कथेला निवडण्यासाठी अनेक धन्यवाद. आयोजकांचे या संधीसाठी आणि शिताफीने उपक्रम नियोजित करून राबवण्यासाठी अनेक आभार. याच निमित्ताने अनेकांच्या लेखनाचा आस्वाद घेता आला हा आनंदानुभव स्मरणात राहील.
.
सर्वांना धन्यवाद आणि आभार

Pages