“बाबा हे काय करता?” नेहमीच्या बालसुलभ कुतुहलाने तिने विचारले.
“अगं घाणेरडे झालेले भाग काढून टाकतोय
आपण जो माल विकतो
तो घाण असेल तर लोकं घेणार नाहीत ना”
हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले तोंड वावच्या अभिनिवेषात उघडेच होते काही वेळ
काहीतरी विलक्षण शोध लागलाय असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
ती तिच्या झपाटलेल्या अवस्थेत जाता जाता बोलून गेली,
“एक सॉलिड आयडिया आली यावरून बाबा
मी आजच मिनी ला सांगते शाळेत
की नेहमीप्रमाणे कुणी घरात नसताना तुझे मोठे काका आले
की तोंडात माती कोंबत जा
आणि चड्डीत सू करून टाकत जा
“अगं तू सुयश ला घ्यायला लवकरच येशील का, अगं काही नाही कुणाशी बोलतच नाहीये तो?” असा फोन आला आणि तिच्या मनात विचारांची गर्दी सुरू झाली. मित्राच्या वाढदिवसासाठी दोन तास तरी लागतील म्हणून त्यानंतर घ्यायला जायचे ठरले होते.
आपल्याला बाबा नाही याबद्दल तो कधीही उघड बोललेला नव्हता. तिनेही कधी बाबाची उणीव भासू नये म्हणून कोणतीच कसर राहू दिली नव्हती. पाचवीतच होता कोवळेच वय त्याचे.
मत्सर मैत्रीतही काय घडवेल सांगता येत नाही. बाबा नसण्यावरून तर चिडवले नसेल?
त्याचे डबडबलेले डोळे पाहून तिच्या मनात अनुकंपा झरू लागली.
ग्राऊंड च्या कडेला एकटाच शिक्षा म्हणून तो उभा होता.
“आधीच वेळ दिलेली होती आणि गटातले सगळे खेळाच्या सरावासाठी बरोबर आले, तू वेळेवर का आला नाहीस?”, कर्कश्य आवाजात ओरडत सरांचा तिसऱ्यांदा विचारलेला प्रश्न, तरी तो गप्पच होता.
“तुझ्या बाबांना फोन केला तेव्हा तू वेळेवर निघाला हे त्यांनी सांगितले, अरे मग तरीही उशीर कसा झाला? कुठे घालवलास हा वेळ?”, सरांचा थयथयाट शब्दात मावत नसल्याने डोळ्यांवाटे पण प्रकटत होता.
खोटे त्याला बोलायचे नव्हते, जे घडले त्या आनंदासमोर ही शिक्षा काहीच नव्हती.
तो पठ्ठा गप्पच होता.
दोन दिवसांनी पेपर आहे.
आजचा सुटीचा दिवस निट अभ्यास करण्यात घालवायचा,
तिने मनात ठरवले होते.
“आज तरी अभ्यास करणार आहेस का?”, या आईच्या वाक्याने दिवसाची सुरवात झाली.
तिने काय ठरवले आहे न विचारता, ती काय करणार आहे हे गृहित धरून असलेले आईचे वाक्य ऐकताच तिचे डोके सटकले.
अभ्यास करण्याची कोणतीच कृती करायची इच्छा किंवा विचाराला तिच्या डोक्यात आता जागाच उरलेली नव्हती.
सगळी जागा रागाने भरलेली.