क्रोध

मभागौदि २०२५ शशक - प्रश्न - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 27 February, 2025 - 05:28

आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...

हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'

'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !

विषय: 

मभागौदि २०२५ शशक - उशीर - तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 02:10

ग्राऊंड च्या कडेला एकटाच शिक्षा म्हणून तो उभा होता.

“आधीच वेळ दिलेली होती आणि गटातले सगळे खेळाच्या सरावासाठी बरोबर आले, तू वेळेवर का आला नाहीस?”, कर्कश्य आवाजात ओरडत सरांचा तिसऱ्यांदा विचारलेला प्रश्न, तरी तो गप्पच होता.

“तुझ्या बाबांना फोन केला तेव्हा तू वेळेवर निघाला हे त्यांनी सांगितले, अरे मग तरीही उशीर कसा झाला? कुठे घालवलास हा वेळ?”, सरांचा थयथयाट शब्दात मावत नसल्याने डोळ्यांवाटे पण प्रकटत होता.

खोटे त्याला बोलायचे नव्हते, जे घडले त्या आनंदासमोर ही शिक्षा काहीच नव्हती.

तो पठ्ठा गप्पच होता.

मभागौदि २०२५ शशक - स्टेयरिंग व्हील - तुष्की

Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 01:33

दोन दिवसांनी पेपर आहे.
आजचा सुटीचा दिवस निट अभ्यास करण्यात घालवायचा,
तिने मनात ठरवले होते.

“आज तरी अभ्यास करणार आहेस का?”, या आईच्या वाक्याने दिवसाची सुरवात झाली.

तिने काय ठरवले आहे न विचारता, ती काय करणार आहे हे गृहित धरून असलेले आईचे वाक्य ऐकताच तिचे डोके सटकले.
अभ्यास करण्याची कोणतीच कृती करायची इच्छा किंवा विचाराला तिच्या डोक्यात आता जागाच उरलेली नव्हती.
सगळी जागा रागाने भरलेली.

Subscribe to RSS - क्रोध