मभागौदि २०२५ शशक - प्रश्न - हाडळीचा आशिक

Submitted by हाडळीचा आशिक on 27 February, 2025 - 05:28

आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...

हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'

'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !

'दादा, बंद डोळ्यांआडून दिसणारं ब्रह्मांडात भरलेलं तुझं हे अस्तित्व.. तरीही आमच्या तिघांचं पोट रिकामं..? असं का बरं ? आणि तुझं ?... ते भरलंय वा रिकामं आहे मला का बरं नाही कळत ?'
पुन्हा मंद हसला...
मंदबुद्धी ! मनात म्हटलोसुद्धा..

पोटातील भुकेनं पुन्हा डोकं काढलंच.. चरफडलो..
दणाणा पावलांनी आत जाऊन ताटी लावता झालो.

२७.०२.२५

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्तच.
खालची तारीख जुनी टाकली असती तर अजून मजा आली असती..

मस्त!

नवीन प्रतिसाद लिहा