Submitted by हाडळीचा आशिक on 27 February, 2025 - 05:28
आज काहीसुद्धा मिळालं नाही... उलट नेहेमीपेक्षा जास्तच ऐकायला लागलं...
हा मोठ्ठा ! सदानकदा ध्यानस्थ पंचवटीखाली.. काहीही न करता... मला दररोज गावात जावं लागतं.. भावाबहिणीकडे बघून.. याला बोलायला गेलं तर हसून म्हणतो कसा; 'मला कुठं खायला लागतं ! हा देह श्वासांवर चालतो.. तुम्हीसुद्धा प्रयत्न करा..'
'वारेवा.. तूही बस आम्हीसुद्धा बसतो..' यावरसुद्धा हसलाच.. नेहेमीसारखा.. गूढ..
आळशी !
'दादा, बंद डोळ्यांआडून दिसणारं ब्रह्मांडात भरलेलं तुझं हे अस्तित्व.. तरीही आमच्या तिघांचं पोट रिकामं..? असं का बरं ? आणि तुझं ?... ते भरलंय वा रिकामं आहे मला का बरं नाही कळत ?'
पुन्हा मंद हसला...
मंदबुद्धी ! मनात म्हटलोसुद्धा..
पोटातील भुकेनं पुन्हा डोकं काढलंच.. चरफडलो..
दणाणा पावलांनी आत जाऊन ताटी लावता झालो.
२७.०२.२५
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
संदर्भ लागतोय असे वाटले
संदर्भ लागतोय असे वाटले
मस्तच.
मस्तच.
खालची तारीख जुनी टाकली असती तर अजून मजा आली असती..
मस्त!
मस्त!
नीटशी समजली नाही. कुणी संत्रे
नीटशी समजली नाही. कुणी संत्रे सोलेल का?
ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर
मस्त!
मस्त!
आवडली.
आवडली.
आवडली. ताटी शब्दामधे सगळॅ
आवडली. ताटी शब्दामधे सगळॅ क्लीयर होतेय.
आवडली.
आवडली.
आवडली. निवृत्तीनाथ आणि
छान.
छान.