Submitted by तुष्कीनागपुरी on 25 February, 2025 - 04:26
“बाबा हे काय करता?” नेहमीच्या बालसुलभ कुतुहलाने तिने विचारले.
“अगं घाणेरडे झालेले भाग काढून टाकतोय
आपण जो माल विकतो
तो घाण असेल तर लोकं घेणार नाहीत ना”
हे ऐकून तिचे डोळे मोठे झाले तोंड वावच्या अभिनिवेषात उघडेच होते काही वेळ
काहीतरी विलक्षण शोध लागलाय असे तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते.
ती तिच्या झपाटलेल्या अवस्थेत जाता जाता बोलून गेली,
“एक सॉलिड आयडिया आली यावरून बाबा
मी आजच मिनी ला सांगते शाळेत
की नेहमीप्रमाणे कुणी घरात नसताना तुझे मोठे काका आले
की तोंडात माती कोंबत जा
आणि चड्डीत सू करून टाकत जा
माल घाण असेल तर ते कुणी फायदा घेऊ शकत नाही ना!”
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
झटका वगैरे बसतोय पण शेवटच्या
झटका वगैरे बसतोय पण शेवटच्या वाक्यातील माल, फायदा अशा शब्दयोजनेमुळे आणि त्यामुळे सुचीत होणार्या अर्थाने नाही आवडली. सॉरी.
Pages