तथ्ये ही तथ्ये नसतातच

Submitted by तुष्कीनागपुरी on 19 February, 2025 - 05:22

.
विवेक अग्निहोत्री या चित्रपट दिग्दर्शकाने एका मुलाखतीत उच्चारलेल्या इतक्यात भागाचा उल्लेख करून त्यांची बरिच हेटाळणी केलेली वाचायला मिळते. देशभक्त या युट्यूब वाहिनीचे अभिषेक बॅनर्जी तर हे वाक्य आणि त्याचबरोबर अग्निहोत्रींचा अनक वेळा उद्दार करायला अजिबात विसरत नाहीत. तुमच्या सारख्या लोकांकडून सांगितली जाणारी तथ्ये ही तथ्ये नसतातच असे ते पूर्ण वाक्य होते असा खुलासा पण वाचायला मिळाला.
.
दार्शनिक नित्शे यांनी लिहिलेले आहे की ‘तथ्ये नसतातच फक्त निष्कर्ष असतात’ यातही त्यांचा निर्देश तथ्यांच्या सापेक्षपणा कडेच असावा.
.
या संकल्पनेचा एक अनुभव मला इतक्यातच युट्यूब वरचा एक विडियो पाहतांना झाला. तो विज्ञानाबाबत विडियो होता ज्यात म्हटले गेले की पारा हा द्रव्य स्वरूपातला धातू आहे, किंवा ऑक्सिजन हा वायू स्वरूपातला पदार्थ आहे ही विधाने किंवा तत्थे खरी म्हणजेच तत्थे असण्याला काही पूर्वअटी असतात आणि त्यांचा आपण नेहमीच्या बोलण्यात उल्लेख करत नाही पण त्या पूर्वअटी संपूर्ण झाल्या नाही तर ही तथ्ये खोटी ठरतात.
.
जसे साधारण समुद्रपातळीवरचे तापमान आणि वायुचा दाब या पूर्वअटी नसल्या तर सोने हा घन पदार्थ आहे आणि पारा हा द्रव्य पदार्थ आहे हे म्हणता येत नाही. तापमान खूप अधिक असेल तर सोने द्रव पदार्थ होतो आणि तापमान फारच कमी केले गेले तर पारा देखील घन पदार्थ होतो. जर वायुचा दाब खूप वाढवला तर ऑक्सिजन देखील द्रव पदार्थ होतो आणि तसा द्रव स्वरूपातच तो ऑक्सिजन सिलेंडर मधे भरलेला असतो.
.
या माहिती नंतर तथ्ये ही तथ्ये नसतातच हे विधान परत आठवले.
.
सध्या समाज माध्यमांवर सनसनाटी तयार करण्याच्या अनेक युक्त्यांपैकी एक युक्ती अशी दिसते की जुन्या पुस्तकांमधून, जुन्या ऐतिहासिक पात्रांच्या इतिहासामधून एखादी गोष्ट उचलायची आणि सध्याच्या परिवेशात ती चूक दाखवून ती ऐतिहासिक व्यक्ती चूक होती, किंवा महान नव्हती किंवा आदरणीय नव्हती हे सिद्ध करायला आणि त्यावर कुत्सित हेटाळणी करायची. त्या व्यक्तीला आदरणीय मानणाऱ्या समुदायाला अश्या प्रकारे हिणवायला ते सोपे ठरते. या सर्व प्रकारात इतिहासाच्या पूर्वअटी विसरून केलेले हे उद्योग असतात असे दिसते. वाचणारे त्यावर हसणारे आणि त्याने उद्विग्न होणारे सगळेच या पूर्वअटी वगळून वाद घालत असताना दिसतात. मुळात तत्थ्यांना खरे होण्यासाठी काही पूर्वअटी असतात आणि त्यांची माहिती असणे आणि त्या आहेत हे तपासणे महत्वाचे असते हेच माहिती नसल्याने फक्त वादविवाद यात अनेकांचा वेळ जातांना दिसतो.
.
एक काल्पनिक उदाहरण घेऊया जसे एका प्रदेशात प्रचंड गर्मी असल्याने आणि जुन्या काळात विज्ञानाच्या अल्प विकासाने तिथले लोक जर अगदी आवश्कय तितकीच वस्त्रे वापरत असततील आणि त्यातल्या एका व्यक्तीला व्रत म्हणून किंवा त्याग म्हणून खूप जाड आणि सर्वांगाला लपेटणारी वस्त्रे वापरावी लागली आणि त्यांनी ते सर्वशक्तीलावून केले असेल आणि त्यामुळे त्यांचा मान त्या प्रदेशात वाढला असेल आणि त्यांना आदर्श मानले जात असेल तर त्यांच्या तसबिरी किंवा चित्रांमधे त्यांचे परिधान तिथल्या साधारण लोकांच्या परिधानापेक्षा वेगळे दाखवलेले आढळणे शक्त आहे.
.
तसेच जर एखाद्या अतीथंड प्रदेशामध्ये जेव्हा सगळे भरपूर वस्त्रे घालत असतील आणि त्यांच्यातले आदरणीय व्यक्ती कमी कपडे घालून सुद्धा त्याग करत असेल ते त्यांच्या गोष्ती किंवा उल्लेखांमुळे कमी कपडे घालणे याला त्याग मानलेले दिसेल.
.
आताच्या काळात प्रदेशाचे तापमान कसे असायचे ही पूर्वअट लक्षात न घेता ठंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी जर त्या अनेक वस्त्रे घालणाऱ्या इतरांच्या आराध्य व्यक्तीची वस्त्रे यावर टिका आणि थट्टा सुरू केली आणि तसे कपडे घालणे म्हणजे कसला आलाय त्याग असले विधान पुढे आणले तर ते किती हास्यास्पद होईल?
.
या उदाहरणात मुद्दाम आपल्या लक्षात येईल असे विरोधाभास घेतल्याने पूर्वअटी डावलणे आणि त्या पूर्णअटी आहेत हे माहितीच नसणे याने काय घोळ होतो हे कळू शकते.
.
अनेक धार्मिक आणि ऐतिहासिक सांप्रतच्या वादांमधे त्या पूर्व अटींचा उल्लेखही नसतो आणो त्या इतिहासाची पुरेशी माहिती नसल्याने त्या पूर्व अटींचा विचारही न करता थट्टामस्करी चाललेली असते. त्यात थट्टा करणाऱ्यांना असषे वाटत असते की त्यांची तर्काच्या आधारावर काही बुरसटलेले दाखवून दिलेले आहे. ते तसे नाही याचा ज्या समुदायाची मान्यता असते ते सुद्धा त्या पूर्व अटींचा उल्लेक खरत नाहीत त्यांनाही त्या माहित असतात असे नाही. तर्काच्या आधारावर त्यांना पण मुद्दे खोडता येत नसले तरी त्यांना माहित असते की हे इतके साधे नाही आणि अशी थट्टा केल्या जाऊ शकत नाही त्यामुळे ते तशी थट्टा करणाऱ्याच्या उद्देशालाच टारगेट करून हल्ला परतवून लावताना दिसतात.
.
तुषार जोशी
नागपूर, बुधवार २९ जानेवारी २०२५

Group content visibility: 
Use group defaults

फ्रेम ऑफ रेफरन्स (संदर्भ) मध्येच तथ्ये मांडली जातात. सोने तापमान, दाब, निर्वात पोकळीत इ. इ. क्वॉलिफायर्स देऊनच घन का द्रव आहे ते मांडले जाते. तुम्ही आम्ही रोजच्या बोलण्यात जी विधाने करतो त्याला सर्वसाधारण परिस्थती हे अदृश्य गृहितक असते. त्यात तापमान वाढलं तर सोने द्रव असेल.... हा अगदीच भोंगळ युक्तिवाद ठरेल. तो सेल्फ हेल्प वगैरे पुस्तकात ठीक आहे, पण तथ्ये ही तथ्ये नसतातच असं सनसनाटी विधान करायला पुष्टी म्हणून विज्ञानाचा कोणतेही विधान करतानाचा मूलभूत नियम, अर्थात फ्रेम ऑफ रेफरन्स, याला बासनात गुंडाळून ठेवणे अंमळ मजेशीर आहे. हेच ते संदर्भ सोडून विधान ना?
लेखाच्या शेवटी संदर्भ सोडून विधाने करणे बरोबर नाही हे पटवून द्यायला तथ्ये ही तथ्ये नसतात हा संदर्भ सोडूनच काढलेला निष्कर्ष वाचून गंमत वाटली. काव्यात्मक न्याय वगैरे. .. Happy

इतिहासातले संदर्भ लक्षात नं घेता तेव्हा कोण व्यक्ती कसं चुकीचं वागली... वगैरे वगैरे....दखवण्याची अहमहीका मला नेहमीच खटकत आलीय.
कुणीतरी म्हटलंय,'आपण फक्त सारासार विचार करून निर्णय घ्यायचा असतो. तो चूक की बरोबर हे काळच ठरवतो.'
खरे आहे. आपण एसीत सोफ्यावर आरामात बसून कुणी काय करायला हवं होतं किंवा नको होतं हे सांगणं डोक्यात जातं अगदी.

लेख विस्कळीत वाटला आणि उदाहरणांची सरमिसळ झालीय असे वाटले. Frame of reference बद्दल अमीतव यांनी लिहिले आहेच.
बाकी इतिहास हा जेत्याने लिहिला असतो, त्यात काही जुन्या बखरीत वगैरे त्रुटी असु शकतात, काही निष्कर्ष चुकीचे असु शकतात, वैज्ञानिक संशोधनात कन्फर्मेशन बायस अथवा इतर काही ज्येनेविन (उच्चार बरोबर का?) त्रुटी तर कधी कुणी स्वार्थासाठी मुद्दाम लादलेला चुकीचा निष्कर्ष असू शकतो (पण पुढे उघडकीस येऊन त्यात सुधारणा केली जाते) वगैरे मान्य. तसेच अज्ञानाने किंवा मुद्दाम निवडक काहीतरी वेचून एकमेकांना धोपटले जाते हे ही मान्य.

पण नेमका विषय काय हे कळले नाही.

कृपया शुद्धलेखन सुधारा. मी ऱ्हस्व दीर्घ वगैरेच्या चुका म्हणत नाहीये पण लेखाच्या शीर्षकापासूनच खूप शब्द खटकत आहेत लेखात.

Submitted by अमितव on 19 February, 2025 - 19:26>>> सहमत.
कदाचित त्यांची तथ्य ( Fact ), किंवा वास्तविक सत्य ( Factual truth) आणि पुर्ण सत्य ( absolute truth - जो की एक फिलॉसॉफीकल कन्सेप्ट आहे) या दोन संकल्पनांमधे गल्लत झाल्यासारखे वाटतेय....जसं "चौकोन हा कधीच वर्तुळाकार असू शकत नाही." हे पुर्ण सत्य झालं, (आता तुम्ही चौकोनाकाराला किंवा वर्तृळाकाराला इतर कोणत्याही नावाने संबोधत असाल, ते गौण आहे, तसेच ईथे दृष्टीचा प्रश्र्न ही गौण आहे कारण त्या दोघांना ते धारण करत असलेले कोन परिपुर्णता देतात. त्यामुळे ते दोन आकार (अथवा काहीही संबोधन) एकच असू शकत नाहीत हे पूर्ण सत्य आहे.

हो.
जसं चौरसाचा कोन ९० अंशाचा असतो. हे कार्टेशिअन प्लेन मध्ये बरोबर आहे. सर्क्युलर प्लेन मध्ये नाही. वर्तुळावर चौरस काढून बघा. पण म्हणून ९० अंश हे तथ्यच नाही म्हणण्यात अर्थ नाही. या वर्तुळावर लोक त्रिकोणमिती कशी वापरावी वगैरे काय काय करतात. धडा इतकाच की मर्यादा लक्षात ठेवाव्या. विज्ञानात आणि जीवतातही! Wink Proud

@अमितव, @अनया, @SharmilaR, @मानव, @स्वाती, @पियू, @फार्स, @धनि,
वेळ देऊन लिखित प्रतिसाद दिलात आणि चुका लक्षात आणून दिल्याबद्दल अनेक आभार.
.
अभिप्रायांमध्ये आलेल्या सूचना आणि सल्ल्यांचा मला उपयोग होईल आणि विचारकप्रक्रियेला चालना मिळेल याची खात्री आहे.