गेला श्रावण मला खूप सुखावून गेला
कारण माझ्याही नकळत
‘ तो ‘ माझ्या आयुष्यात आला.
तो आला माझ्या आयुष्यात
तेव्हा कळलं
यालाच प्रेम म्हणतात.
मग मी वहातच गेले
प्रवाहासारखी खळाळून गात गेले
मी विचारलं त्याला, ” आपण कोण आहोत ?”
तो म्हणाला, ” आत्मा एक असलेली
वेगवेगळ्या ठिकाणी धडधडणारी दोन हृदयं.”
मग आम्ही दोन हृदयांना एक करण्यासाठी धडपडलो
वेळ पडली तेव्हा प्रवाहाच्या विरुद्धही पोहत गेलो.
मग लाभला आयुष्याला एक नवा सूर
कधी आनंदाचा पूर
कधी विरहाची हुरहूर
चिवचिवणारे पक्षी, आभाळातली नक्षी
वाटलं निसर्ग आपल्या प्रेमाला साक्षी……..
……………..
………………
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!!
एकांती आर्त स्वरांनी..
विरहात रंग भरले,
स्मरणात तुझ्या गुंतुनी..
माझे 'मी' पण विरले,
मुग्ध ह्या भासांनी..
माझे जीवन भारलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!!
तुझे नक्षत्रांचे देणे..
माझ्या मनात दाटलेले,
रिक्त माझ्या क्षणांना..
काही अर्थ लाभलेले!
प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं.....???
मग आठवतो व्हॅलेंटाइन डे
तसा हा विविध डेज् मधलाच एक
पण नव्या प्रेमींच्या आयुष्यात
ठरलेला एक अनोखा ब्रेक,
तरुणाईत पसरलेली ती गुलाबी लाट
अन् मुलामुलींच्या चेहर्यावर आलेला नविनच थाट,
मुलांमध्ये सुरु होते प्रपोझलचे
प्लॅनिंग आणि फिक्सिंग
तर मुलींमध्ये डेटिंगसाठीची
हॉट हॉट शॉपिंग,
सगळीकडे वातावरण फक्त सेलिब्रेशनचं
पण माझ्या मनात एकच प्रश्नं
प्रेम प्रेम म्हणतात खरं,
पण हे करायचं तरी कसं...???
सध्या ज्या हॉबीज अंगी असायला पाहिजेत खास
त्यासाठीही निघालेत आता कोचिंग क्लास,
पण प्रेमासाठी अद्याप तरी नाही कुठले क्लास
बोलकी गं डुक्कर-
धुंदी मनाची उतरत नाही, झटकून आळस उठवत नाही!
जेंव्हा येतो तुझा विचार, बुद्धी होते बधीर पार!
भूकेचा वेळी ना लागते भूक,ना मिळतं झोपेचा सुख!
डोक्यात तुझाच पिक्चर असतो चालू, रीवाइंड-रीवाइंड मी खेळत बसतो वेडू!
भ्रमिष्ठा सारखा असतो नुसता बसून,
करायला भरपूर अभ्यास असून!
तासालाहीघुमतो तुझाच आवाज फक्त,
शिक्षकाचा जातो ठक-ठक करून नुसतं!
व्यायाम करायला येतो भलताच जोर, मनाचा नाचतो बघ सारखा मोर!
डोकं मात्र माझं नाही कुठंच हालत, तुझ्यापाशी सोडून नाही कुठं चालत!
आतातरी माझ्याकडे पाहशील का!
त्रासातून या मला काढशील का!
देशील का सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर!
वास्तव-प्रेमगाव-वास्तव
खेळत होतो मी मनाची गाडी
चालवत होता मेंदू अन कंडक्टर प्रेम दिवाणी !
कंडक्टरला वाटायचं सारखी बस भरावी
आत येऊ पाहणाऱ्यांची लाईन बघून खुदकन बस हसावी!
driver कधी चिडून मग घ्यायचा बस stop वर
म्हणायचा सीट नसलेल्यांनी उतराबघू पटकन!
तेवढयात त्याला दिसायचा कंडक्टर पायावर उभा
खास प्रवाशासाठी आपली सीट सोडून बघा !
पण तेवढी ढील driver द्यायचा बर का त्याला
कारण तोही होता थोडा प्रेमावरती फिदा!
'वास्तव-प्रेमगाव-वास्तव' होता बस चा रूट
गावी पोचल्यावर कंडक्टर म्हणे, आता तू एकटाच सूट!
येताना जेवढ्यानी केले हात, तेवढ्या वाजवल्या मी घंटा
मी उशीवर मान टेकवली
की चंद्र हळूच डोकावतो..
तुझ्या आठवणीत बुडलेल्या मला बघून
चांदणीला अजूनच बिलगतो..
'रोजचाच झालाय हा चाळा त्याचा'
म्हणून मी आज मान फिरवली,
तर चांदणीला सोबत घेऊन स्वारी
थेट माझ्या खिडकीशी आली!
पडदा हळूच बाजूला सारून
म्हणतो कसा मला..
'रुसतेस कसली राणी, उठ की जरा!
माझ्या लाडक्या चांदणीचा
तुला दाखवायचाय तोरा!'
चांदणीनं ऐकलं हे
अन झक्कासशी लाजली
लखलखत्या तेजाला तिच्या
क्षणभर लाली चढली!
चंद्रानंही मग तिला
हळूच मिठीत घेतलं..
अन एक तळहातानं
माझ्या डोळ्यांनाही झाकलं!
मग मात्र माझा
पारा जरा चढलाच..
'काय चालवलयस चांदोबा,
हा काय तुला पोरखेळ वाटला?'
ती नेहमीच तर आठवाशी खेळत असते
खेळताना उगाच जुण्या चिंध्या वळत असते
रात काळी हवीहवीशी नेहमीच असे तिला
अमावसेला ती काळाची महीमा गात असते
उजाड रानात अनवानी फ़िरणे आवडते तिला
दुरवर नजर असते आणी काही गात असते
भर पावसात भरलेली नदी तिचीच होत असते
काट्यांची फ़ुले ओंजळीत भरुन अर्ध्य देत असते
हे जगणे तिचे, माझे काळीज कापत असते
मी नाही नाही करीत तिच्यात गुंतत असते
ऐकले काय अशी कुणाची प्रेमकहाणी केव्हा
का वाट बघावी तिने , त्याचे गाव बेपत्ता असते
कल्पी जोशी
तुझ्या सवे फीरताना
झाले उन्हाचे चांदणे
तनमनाचे अद्वैत
नाही काही देणे-घेणे
कधी बसावे रुसुन
कधी बोलावे हसुन
सागराचे चंद्रासाठी
पुन्हा भरतीचे येणे
कधी वाटले तुटले
सारे सर्वस्व लुटले
पण धागे रेशमाचे
भक्कम ताणे बाणे
एकच दिवस प्रेमाचा?
एक गुलाब देण्याचा?
हा जन्माचा उत्सव
साता जन्माचे हे लेणे
तुझे डोळे
वेडावुन जाती तुझे डोळे
तुझे डोळे
मन जड झाले
भांबावुन गेले
विरहात माझे
रंग हरवले
सप्तरंगी तेव्हा
स्मरणांच्या भेटी
रंगवुनी देती तुझे डोळे
सुगंधात न्हाते
मोहरून येते
पाहताना माझे
भान हरपते
पापणीच्या आड
प्रेम साठवती
सखे माझ्या साठी तुझे डोळे
स्वप्न जगण्याचे
उंच उडण्याचे
तुझ्यामुळे सारे
क्षण स्वर्ग माझे
आशेची किनार
समृद्धिची ओटी
चैतन्याच्या ज्योती तुझे डोळे
तुषार जोशी, नागपूर
तुझे काळे काळे रूप
मला आवडते खूप
तुझ्या रंगात साठली गुंगी गूढ
सखी गं सखी गं सखी गं
तुझ्या रूपाचा प्रभाव
जाणवतो चारी ठाव
काळ्या सावळ्या रंगास किती ओढ
सखी गं सखी गं सखी गं
तुझे असणे केवळ
करी जगणे प्रेमळ
तुझे नसताना आयुष्य अगोड
सखी गं सखी गं सखी गं
तुझे बोलणे लाघवी
रोमारोमात पालवी
तुझे लाजणे जिवास लावी वेड
सखी गं सखी गं सखी गं
(सावळ्या मुलीची गाणी / तुषार जोशी, नागपूर)