बोलकी गं डुक्कर

Submitted by सुमित खाडिलकर on 11 April, 2011 - 11:05

बोलकी गं डुक्कर-

धुंदी मनाची उतरत नाही, झटकून आळस उठवत नाही!
जेंव्हा येतो तुझा विचार, बुद्धी होते बधीर पार!
भूकेचा वेळी ना लागते भूक,ना मिळतं झोपेचा सुख!
डोक्यात तुझाच पिक्चर असतो चालू, रीवाइंड-रीवाइंड मी खेळत बसतो वेडू!

भ्रमिष्ठा सारखा असतो नुसता बसून,
करायला भरपूर अभ्यास असून!
तासालाहीघुमतो तुझाच आवाज फक्त,
शिक्षकाचा जातो ठक-ठक करून नुसतं!
व्यायाम करायला येतो भलताच जोर, मनाचा नाचतो बघ सारखा मोर!
डोकं मात्र माझं नाही कुठंच हालत, तुझ्यापाशी सोडून नाही कुठं चालत!

आतातरी माझ्याकडे पाहशील का!
त्रासातून या मला काढशील का!
देशील का सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर!
मूग गीळून काय बसलीयेस, बोलकी गं डुक्कर!

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सुमित, तुम्ही डुक्करावर प्रेम केलेय का? तसे असेल तर ह्या कवितेकडे एक गंमत म्हणून पहाता येईल... पण इतकं छान पद्धतीने प्रेम व्यक्त करुन शेवटी तुमच्या प्रेयसीला डुक्कर संबोधले असेल, तर ह्या कवितेकडे कशा दृष्टीने पहावे? Uhoh तुम्ही आपल्या प्रेयसीला मनातसुद्धा असे कसे संबोधू शकता? कमाल आहे!!!

प्रगो, तू प्रतिसादाचे हे टेम्प्लेट तयार करुन ठेवलेयस का? जिथे तिथे हाच प्रतिसाद? Proud अर्थात इथे मात्र अगदी चपखल बसतोय हां... Lol

डुक्कर फार ताणल जाईल असं वाटला होतंच, पण जरा त्या मुलाचा राग व्यक्त करायचा प्रयत्न केला...माफी असावी आणि कृपया शब्दशः अर्थ घेऊ नये

.

एकमेकांना डुक्कर म्हणणा-यांची शिसारीच येते.. असली कसली कचराकुंडीछाप जवळीक ? रस्त्यावरची झाडूवाली पण स्वतःला डुक्कर म्हणवून घेणार नाही..
माफ करा तीव्र भाषेबद्दल !

लहानपणापासूनचा अत्यंत आवडता प्राणी यात असल्याने कविता भलतीच आवडली. येता जाता प्रत्येकाने ह्याच नावाने हाक मारल्याने अतिशय आत्मीयतेचे नाते जडले आहे.

पुढच्या कविता डुकरांवरच आल्या तरी आवडेलच.

बाबु Wink Wink Wink

मला वाटतय त्याची ती अशी दिसत असणार Light 1

( अवांतर : यावरुन आठवले आम्ही कॉलेजात असताना मुलींन्ना सिंव्हीण , बिबटीण आणि चित्तीण अशा कॅटॅगरीत विभागायचो Proud मुंबईत .. ऑफीसात....आल्या पासुन फक्त सिव्हीणी आणि चित्तीणीच दिसताहेत :खोखो:)

>>> श्शी डिस्गस्टींग !

प्रगो..कैच्याकै..हे गिनीपिग आहे...डुक्कर कुठले...
छे बाबा, तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हते

अरे, डुक्कर वर्गापेक्षा खूप वेगळे आहे रे हे...
खास प्रयोगशाळेसाठी वापरण्यात येणारे...
अरेच्या हा, ती प्रेयसी संशोधक असणार आणि म्हणूनच तिच्या प्रयोगांमुळे त्रस्त होऊन कवीने हा शब्द योजला होता...
बघ प्रगो, शेवटी कळला का नाय आपल्याला त्यातला गर्भित अर्थ..
शेवटी काळ आला होता वेळ आली नव्हती...:)

बघ प्रगो, शेवटी कळला का नाय आपल्याला त्यातला गर्भित अर्थ. >>>
खरच यार ...कित्ती गु ढ आहे ही कविता Happy

डुक्कर फारच मनावर घेता बुवा तुम्ही.....असो.....मग असं म्हणून बघा

"देशील का सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर! शब्दांवर तुझ्या लावून छान अत्तर"

पण मला सांगा गोड-गोड बोललं कीच कविता होते का? आणि आपण रागात जे शब्द वापरतो, समोरची व्यक्ती काय तशी दिसत असते का? तरी एकबरं झालं किमान काहीना हसू तरी आलं.

आमच्या ओळखीतले एकजण आहेत, त्यांच्या घरी त्यांची मुले लहान असताना जे सुखसंवाद चालायचे ते आठवले. अरे डुकरा, माकडा, भुता, इ. Lol

मला कवितेत खच्चून भरलेला उद्वेग भावला, अगदीं परमोच्च बिंदूसाठी वापरलेल्या 'डुक्कर'सहीत !
माझ्या लहानपणी 'साला', आयला' हे पण पब्लिकली वापरण्यासाठी निषिद्ध शब्द होते; आज 'आयचा घो' सुद्धा 'हॅलो' इतपत सर्रास वापरला जातो. शाळा-कॉलेजमधील मुलांच्या कांही टोळक्यात एकमेकाना सहजपणे 'डुक्कर' म्हणताना मी प्रथम ऐकलं तेंव्हा मीही चमकलो होतो. पण नंतर माझ्या लक्षात आलं कीं अशा शब्दांचा रूढ अर्थ सर्रास वापरामुळे घासून काढल्यासारखा निघून गेलेला असतो; वापरला जात असतो तो केवळ त्या शब्दाच्या उच्चाराचा 'साउंड इफेक्ट' !
नाही ना पटलं ? कांही वर्षानी कदाचित तुम्हालाच हंसू येई‍ॅल आपण या शब्दाला इतकं नाक मुरडलं होतं याचं !!