प्रेम
!! प्रेमवेडा !!
गेलीस तू मला आशेचा किरण देऊन,
वाटलं होतं येशील परत फिरून !!
का गेलीस तू मध्येच निघून,
खेळ आपुला अर्धवट सोडून !!
वाट पाहत आहे तुझी डोळ्यात प्राण आणून,
बसलो आहे अन्न पाणी सोडून !!
डोळे आले आहेत अश्रूंनी भरून,
पण गेलो आहे तुझ्या प्रेमाने भारावून !!
स्वप्न होते मनी वसून,
पण राहिले ते फोल ठरून !!
वाटले एकदा हे जग जावे सोडून,
पण तू बसलीस मार्ग अडवून !!
वाट पाहता पाहता जाईन मरून,
आपल्या प्रेमाची साक्ष ठेवून !!
पण अजूनही आहे आशा मनी धरून,
स्वागत करीन तुझे चुंबन घेऊन !!