शटर डाऊन!
कुठलाही धंदा सुरु केला आणि एक वर्ष झालं की रिव्ह्यु करण्याची पद्धत आहे. माझं लेखनाचं दुकान, दुकान पेक्षा टपरीच म्हणा हवं तर सुरु करुन बघता बघता एक वर्ष झालं. कवठीचाफाचा एक मस्त विनोदी लेख थोपुवर कोणीतरी पेस्ट केला होता; तो वाचण्यात आला(आता त्याच्या लेखामुळे मी इथे आलो म्हणुन कचाला शिव्या देउ नका), नंतर कळले की तो लेख मायबोलीवर लिहिण्यात आला आहे. आता मुळ मार्केटचाच पत्ता सापडल्याने इथे आलो आणि छोटीशी टपरी टाकली. इथल्या भाउगर्दीत, मोठ्या मोठ्या व्यापार्यांच्या गर्दीत हरवता हरवता सापडत राहिली ही टपरी. तसं मायबोलीवर इतर बरेच दुकानं आहेत लेखनाची. काही काही तर ठोक सामान/लेख/गझलांची दुकाने आहेत.