दाग अच्छे होते हैं
Submitted by चिखलु on 24 February, 2013 - 22:15
मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो.
विषय: