संध्याकाळ

Submitted by चिखलु on 29 August, 2012 - 00:56

माध्यम जलरंग
विषय भारतीय माळरानावरची एक संध्याकाळ
रंगसंगती मुख्य रंग पिवळा आणि काळा, छटा येण्यासाठी लाल रंग आणि थोडा निळा
An Evening.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
पण मावळणार्‍या सुर्यासाठी पिवळ्याऐवजी थोडा लालसर रंग हवा होता. Happy

मस्त काढलं आहे चित्रं, फक्त सकाळ वाटते आहे. आकाशाचे रंग अजुन डार्क असते तर. झकासने सांगितल्याप्रमाणे पक्ष्यांमुळे पण छान इफेक्ट आला असता. शेतकरी मात्र खुप छान जमले आहेत.

मला सकाळ वाटतेय अरेरे
>>>>
हो बरोबर आहे, अमेरिकेत संध्याकाळ असताना भारतात सकाळच असणार ना फिदीफिदी
असो
पुढच्यावेळेस जास्त काळजी घेईल चित्र काढताना. चुका दाखवून दिल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.

पण मावळणार्‍या सुर्यासाठी पिवळ्याऐवजी थोडा लालसर रंग हवा होता. स्मित
>>>>>>>>>>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे

पक्षी दाखवले असते तर अजुन चांगले वाटले असते.
>>>>
संध्याकाळी चित्र काढताना पक्षी होते, नंतर अंधारल्यावर घरट्यात उडून गेले बहुतेक Happy
असो,
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी आहे. लोभ असावा.

मला सकाळ वाटतेय अरेरे
>>>>
चित्र रंगवताना drastic चूक झाली असावी बहुतेक,
पुढच्या वेळेस जास्त चांगले रंगवायचा प्रयत्न करेल.

मस्त आहे चित्र. चित्रावर टीका करावी इतकी माझी चित्रकलेची लायकी नाहीच.
चित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.

मस्त आहे.
आकाशाचे रंग वेगळे असते तर जास्त उठावदार दिसले असते असे वाट्ते. काळ्या छटेतील माणसे/ जनावरे एक्दम सही

आकाशाचे रंग वेगळे असते तर जास्त उठावदार दिसले असते असे वाट्ते.
>>>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी... Happy

चित्रात टायटल न देता वर किंवा खाली दिलं तर रसभंग होणार नाही असं वाटलं.>>> +१

मावळतीच्या आकाशात थोडी लाल जांभळी छटा असते. क्षितिजाला लाल, सूर्याजवळ पिवळी आणि बाकीच्या आकाशात जांभळी. जांभळ्या रंगाने संध्याकाळची उदासीही जाणवते. गुलाबी पिवळा रंग अरुणोदयाचा फ्रेशनेस आणतो. माणसं घरी परतण्यासाठी चालत आहेत असं वाटलं पाहिजे. पाचपैकी ४ उभी वाटत आहेत. उंच सखल भाग पुर्ण काळा न करता मावळतीच्या सूर्याचे कवडसे पडून थोडा उजळलेला एखादा कंगोराही दाखवता येईल.

अजून थोड्या प्रॅक्टिसने खुप छान चित्रं काढाल Happy

चिखल्या चित्र मस्त जमलय!
विशेषतः कामावरून घरी जाणारी...
रंग संगती वेळेनुरुप व्हायला हवी थोडी..
अर्थात मला चित्र नाही काढता येत तरी सांगण्याचा आगाऊपणा करतो!! Happy

<< पण मला आधीची चित्रं जास्त आवडली होती >>

<< मावळतीच्या आकाशात थोडी लाल जांभळी छटा असते. क्षितिजाला लाल, सूर्याजवळ पिवळी आणि बाकीच्या आकाशात जांभळी. जांभळ्या रंगाने संध्याकाळची उदासीही जाणवते. गुलाबी पिवळा रंग अरुणोदयाचा फ्रेशनेस आणतो. माणसं घरी परतण्यासाठी चालत आहेत असं वाटलं पाहिजे. पाचपैकी ४ उभी वाटत आहेत. उंच सखल भाग पुर्ण काळा न करता मावळतीच्या सूर्याचे कवडसे पडून थोडा उजळलेला एखादा कंगोराही दाखवता येईल.>>

<< अजून थोड्या प्रॅक्टिसने खुप छान चित्रं काढाल स्मित >>
<< रंग संगती वेळेनुरुप व्हायला हवी थोडी.. >>
सुधारणा सुचवल्याबद्दल आभारी... स्मित
एकंदर वरील सर्व प्रतिसादावरून हे चित्र फसले आहे असे माझे मत झाले आहे, मी पुढच्यावेळेस नक्की सुधारणा करेल.
तोपर्यंत सांभाळून घ्या मज पामराला

हिरमुसला नको होऊस प्लिज Happy मला तो प्रतिसाद देताना कसंसंच वाटत होतं खरंतर, पण न राहवून दिला.

पामर >>>> इथे सगळेच पामर आहेत Proud

हिरमुसला नको होऊस प्लिज स्मित मला तो प्रतिसाद देताना कसंसंच वाटत होतं खरंतर, पण न राहवून दिला.
>>>
हिरमुसला वगैरे अजिबात नाही. तुम्ही दिलेला प्रतिसाद अगदी योग्य आहे.
माझ्यात सुधारणा व्हावी या उद्देशाने तुम्ही तो दिलाय, मला माहित आहे.
Such a constructive feedback is always welcomed

Pages