वैदेहीच मन आज दिवसभर विचलित होतं. हृदयात धडधडत होतं. लहानपणा पासून ते आत्ता पर्यंतच,गेल्या २९ वर्षांचं आयुष्य तिच्या डोळ्या सोमोरून तरळून गेलं. ती दहावी पास झाली तो क्षण. तिला ९७.७८ % पडले होते. ती शाळेतून पहिली आली होती. शिक्षक, आई-वडील, नातेवाईक मंडळी आणि इतर , सगळ्यांचाच समज असा होता की ती विज्ञान घेणार व बहुदा पुढे शल्यविशारद किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेऊन अभियंता वगैरे होईलच , पण तसे काहीही न करता ती मास मीडिया आणि मास कॉम्युनिकेशन ची पदवीधर झाली होती.
डोळ्यांत तुझ्या एक स्वप्न आहे
ओठांत तुझ्या माझे गीत आहे
दिसते तू जशी चंद्रकोर नभात
प्रेमात तुझ्या तो ईश्वर ही आहे
डोळे मिटूनी मी चांदणे स्मरतो
चांदण्यात तुझीच ज्योत आहे
कुंद भावनांचा झरा वाहतो एक
स्त्रोत त्याचा तुझ्या हृदयांत आहे
ती रात्र सारी सरली मिठीत तुझ्या
मावळतीस पूर्वेला शुक्र तारा आहे
कोंडला श्वास अवचित, हुंदका फुटला
जाणतो सखे वेळ बिछडण्याची आहे
मंगळवार , २६/०३/२०२४ , ०५:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
https://meghvalli.blogspot.com/
कधी वाटते मी कृष्ण मेघ व्हावे
पाऊस होऊनी बरसत रहावे
कधी कवीच्या त्या लेखणीतून
कविता होऊन बाहेर रिसावे
कधी वाटते मी वारा व्हावे
बेभान होऊन सुसाट वाहावे
मंद तुझा मी स्पर्शुन गंध
धुंद होऊन परत फिरावे
कधी वाटते मी स्वप्न बनावे
आणि अवचित मी तुला पडावे
स्वप्नातुन तुला येताच ग जाग
अंगावर तुझ्या रोमांच शहारावे
कधी वाटते मी चांदणे व्हावे
चकोर होऊन तु मला प्यावे
तृष्णेने न कोणत्या च उरावे
जे वांछीले ,ते कैवल्य मिळावे
शुक्रवार, २२/३/२०२४ , १२:५५ PM
अजय सरदेसाई (मेघ)
बराखाडीतील शब्द, स्वप्नी आले असे काही ऐकतोय खूप म्हणे वाढलय 'मी' पण
आम्हाला अजून कळलच नाही
जीवनभर मी ज्यास शोधले
सरणावर ते स्वप्न भेटले
भिरभिरणारे फूलपाखरू
बघुनी मज गालात हासले
बोलायाचे ठरवले मनी
पण ओठावर शब्द थांबले
हसतमुखाने करुन अलविदा
दुनियेने मज दूर लोटले
पून्हा हिच ती चूक भोवली
आभासाने हृदय धडकले
जीवन मृत्यू , खेळ चालतो
या खेळावर विश्व चालले
जी जी
....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार!
स्वप्न!
रात्रीचं जेवण आटोपलं आणि सगळी आवराआवर करून पुष्पा खोलीत आली. मी तिला म्हणालो,
``हे बघ पुष्पा, आता आपल्याला निर्णय घ्यायलाच हवा. पाच-सहा वर्षं झाली प्रतीकला मुंबईला जाऊन. आताश्या फारसं बोलणंही नसतं आपलं. आता आपण हा वाडा विकावा हेच बरं. वाडा विकूया. बँक लोन फेडूया आणि सरळ एखाद्या flat मध्ये राहायला जाऊया. आता आपल्याला flat विकत घेणं परवडणार नाहीच आहे. त्यामुळे पुढची काही वर्षं भाड्यानंच राहू. नंतर पाहू एखादा वृद्धाश्रम. कारण प्रतिक आता पुण्यात परत येईल असंही मला फारसं वाटत नाहीये...``
रुसलेल्या क्षणांना मनवणे,
मलाच जमले नाही...
नशिबापुढे आकाश ठेंगणे,
नशीब जागलेच नाही...
वाटलं देव पावेल,
भाग्य खुलतील...
सुख येतील,
आनंद देतील...
संकटाशी तडजोड,
मलाच जमली नाही...
अपयश्याच्या डोंगरात वळलेली,
वाट दिसलीच नाही...
प्रयत्न केले,
कधीतरी विजय होईल...
त्यातच आयुष्य सरले,
आता फक्त शेवट होईल...
दिवस उगवतात, मावळतात
रात्र सरते...
नवी आशा पल्लवित होते,
पुन्हा अश्रू देते...
सारी उम्र हम मर मर के जी लिऐ एक पल तो अब हमे जिने दो जिने दोओओ.....हे बोल आहे 3 ईडीयट्स मधल्या गाण्याचे,रोज तीच न्युज,पुन्हा तोच शब्द,पुन्हा तेच मन हेलावुन सोडणारे दृष्य,पुन्हा एकदा परीक्षांच्या वाढवल्या जाणार्या तारखा,हे सगळ होत असतांना अवतीभोवती होत जाणार वातावरण आणी या सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांंची बिकट होत जाणारी मानसिकता,मध्येच असं वाटु लागतं की कदाचित एक दिवस हे सगळ संपेल,भीतीत वावरणाऱ्या या जगात जगण्याची एक उम्मीद पुन्हा मिळेल पण पुन्हा तोच भीतिदायक कानात घुमणारा अँब्युलन्सचा आवाज,पुन्हा तेच ओसाड पडलेले रस्ते,सध्या चालु असलेल्या कोरोना युद्धात शत्रू कोण आणी मित्र कोण हेच विद्यार्थ्या