डोळे

वेळ बिछडण्याची आहे

Submitted by Meghvalli on 26 March, 2024 - 07:40

डोळ्यांत तुझ्या एक स्वप्न आहे
ओठांत तुझ्या माझे गीत आहे
दिसते तू जशी चंद्रकोर नभात
प्रेमात तुझ्या तो ईश्वर ही आहे
डोळे मिटूनी मी चांदणे स्मरतो
चांदण्यात तुझीच ज्योत आहे
कुंद भावनांचा झरा वाहतो एक
स्त्रोत त्याचा तुझ्या हृदयांत आहे
ती रात्र सारी सरली मिठीत तुझ्या
मावळतीस पूर्वेला शुक्र तारा आहे
कोंडला श्वास अवचित, हुंदका फुटला
जाणतो सखे वेळ बिछडण्याची आहे

मंगळवार , २६/०३/२०२४ , ०५:०५ PM
अजय सरदेसाई (मेघ)

https://meghvalli.blogspot.com/

अन् होतात डोळे ओले...

Submitted by मी_अनामिक on 22 January, 2020 - 04:36

कशी लिहावी कविता
हात थरथरत असताना...

आह् निघत नाही कधीही
वार काळजावर होताना...

कुठल्या दुःखात आहेस तू
कुणी विचारतो मज हसताना...

ओझे मणांचे वाटे मज
जीवन जगत असताना...

अन् होतात डोळे ओले
द्वंद मनीचे मांडताना...

शब्दखुणा: 

आळव तू गीत माझे

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 April, 2018 - 03:12

आळव तू गीत माझे

आळव तू गीत माझे
मी जवळ नसताना
तान माझीच येइल
तू रागदारी गाताना

हा कसा सुगंध खासा
मातीचा दरवळला
कालचा पाऊस माझा
दारी तुझ्या घुटमळला

चिंब चिंब तू झालीस
अंगोअंगी मज नशा
डोळे तुझेही शराबी
बोलतात माझी भाषा

कालचे ते स्पर्श सारे
आज कसे जागले
अन मनाने आजही
मागू नये ते मागले

नित्य नवी हुरहूर
खेळ कधी सरु नये
पाऊस आठवांचा हा
कधीच ओसरु नये
कधीच ओसरु नये

© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 

उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ......

Submitted by बाळू जोशी. on 1 April, 2012 - 11:15

मायबोली नगरीतील पौरजनहो,

माझे डोळे उन्हाळ्यात जळजळ करतात. विशेषतः दुपारी झोपून उठल्यावर जळजळ होते. व सारखी पुन्हा झोपण्याची भावना होत राहते. थंड पाणी मारले तरी उपयोग होत नाही. दुपारी न झोपल्यास जळजळ होत नाही. शरीरात पाणी कमी पडते आहे का ? उपाय सा.न्गा कपृया

विषय: 
शब्दखुणा: 

डोळ्यांची भाषा

Submitted by राजीव शेगाव on 7 January, 2012 - 02:44

डोळे आहेत तुझे... फारच बोलके...
म्हणून तर डोळ्यांची भाषा... डोळ्यांनाच कळते...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझे डोळे

Submitted by तुषार जोशी on 31 January, 2011 - 10:14

तुझे डोळे
वेडावुन जाती तुझे डोळे
तुझे डोळे

मन जड झाले
भांबावुन गेले
विरहात माझे
रंग हरवले
सप्तरंगी तेव्हा
स्मरणांच्या भेटी
रंगवुनी देती तुझे डोळे

सुगंधात न्हाते
मोहरून येते
पाहताना माझे
भान हरपते
पापणीच्या आड
प्रेम साठवती
सखे माझ्या साठी तुझे डोळे

स्वप्न जगण्याचे
उंच उडण्याचे
तुझ्यामुळे सारे
क्षण स्वर्ग माझे
आशेची किनार
समृद्धिची ओटी
चैतन्याच्या ज्योती तुझे डोळे

तुषार जोशी, नागपूर

गुलमोहर: 

सई तुझ्या डोळ्यातील

Submitted by kaljayee on 23 October, 2010 - 10:56

सई तुझ्या डोळ्यातील
दे मज थोडे जळ
धुवून टाकायचा आहे
माझ्या मनातील मळ

सई तुझ्या वेदनांचे
मला घाल थोडे बळ
फुटेल धीर पुन्हा
माझ्या स्वप्नांना निर्बळ

सई तुझ्या लाघवांचे
प्रतिबिंब नितळ
राहू दे माझ्या जिवनी
हर घडी हर पळ

सई तुझ्या दर्शनाचा
लागो मज चळ
डोळ्यांत असू दे तुझी
प्रतिमा अढळ

सई तुझ्या सानिध्यात
जावे आयुश्य सकळ
ओठांवर गाजो तुझा
भावस्वर निखळ

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

डोळ्यांच्या लेझर सर्जरी विषयी माहिती हवी आहे?

Submitted by शिल्पा८५ on 11 November, 2009 - 02:02

मला डोळ्यांच्या लेझर सर्जरीविषयी माहीती मिळेल का? कितपत सुरक्षित आहे ? side effects असतात का? मुंबईतील सर्वात चांगले Dr./ Hospital कोणते? चश्म्याचा नंबर पुर्णपणे खात्रीलायक जाउ शकतो का? मी breasfeeding करते तर अशावेळी करु शकते का? बाळाला काही त्रास नाही ना होणार? औषधांसहीत कीती खर्च येईल? please लवकरात लवकर मला माहीती पुरवा.........

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - डोळे