Submitted by बाळू जोशी. on 1 April, 2012 - 11:15
मायबोली नगरीतील पौरजनहो,
माझे डोळे उन्हाळ्यात जळजळ करतात. विशेषतः दुपारी झोपून उठल्यावर जळजळ होते. व सारखी पुन्हा झोपण्याची भावना होत राहते. थंड पाणी मारले तरी उपयोग होत नाही. दुपारी न झोपल्यास जळजळ होत नाही. शरीरात पाणी कमी पडते आहे का ? उपाय सा.न्गा कपृया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोरफडीचा गर,/ थंड
कोरफडीचा गर,/ थंड गुलाबपाण्याच्या पट्ट्या १० मिनीटे डोळ्यांवर लावा.
जयु असे बरेच प्रकार म्हनजे
जयु असे बरेच प्रकार म्हनजे काकडी, पाण्याच्या पट्ट्या वगैरे वापरून पाहिले. पण त्याने बाहेरचा भाग थंड होतो . आतला कॉर्निआ जळजळतच राहतो....
कैलास जीवन ट्राय केले आहे का?
कैलास जीवन ट्राय केले आहे का? शिवाय पापणीच्या आतील भागात खुपर्या वगैरे झाल्या असतील तर एक कोर्स औषधांचा घेउन बरोबरीने डोळे गरम पाण्याने शेकणे इत्यादी करावे. एक जेल भरलेला आय पॅच मिळतो तो काही वेळ फ्रिज मध्ये ठेवून मग डोळ्यावर बांधावा झोपताना. त्यानेही बरे वाटेल. वैद्यकीय सल्ला घ्यावाच. शिवाय पायाचे तळव्यांना तेलाने मालिश करणे. डोळे तळावतात म्हनजे नक्की काय ते मला माहीत नाही पण ते ही चेक करावे.
नाही ,रेग्युलर काहीही त्रास
नाही ,रेग्युलर काहीही त्रास नाही. फक्त दुपारी झोपून उठल्यावरच जळजळते . बाकी थंड पदार्थ वस्तु ठेवून बाहेरच फरक जाणवतो . आत थंडावा कसा पोचणार?
बाजो, साधारण असाच त्रास मलाही
बाजो, साधारण असाच त्रास मलाही अधूनमधून होतो. ऊन + धूळ दोन्ही एकत्र आले की जास्त. आमच्या डॉ ने ड्रॉप्स दिले होते, पण माझा अनुभव असा की डोळ्यांच्या आजूबाजूला कैलास जीवन लावले की खूप थंड वाटते. फक्त डोळ्यात जाऊ द्यायचे नाही. दुसरे म्हणजे बाहेर जाताना कायम गॉगल लावूनच जायचे.
आपल्या डॉ चा सल्ला घेउनच हे करा वगैरे डिस्क्लेमर धराच
बाळू जोशी, आत्तापर्यंत करुन
बाळू जोशी, आत्तापर्यंत करुन पाहिले नसेल तर, तळव्याला कैलास जीवन किंवा तुप लावून काशाच्या वाटीने रोज रात्री घासून पहा काही फरक पडतोय का. याने उष्णता कमी व्हायला मदत होते.
Baalya, dupari ekda jhopetun
Baalya, dupari ekda jhopetun uthlyawer parat jhopwese watat asel ter tyacha sambandha dolyashi nasun duparchya jewanashi asawa asa nahi waatat Ka tula? :fidee:
बाजो घरगुती उपाय करालच पण
बाजो
घरगुती उपाय करालच पण त्यासोबतच उन्हाळ्यात डोळे खूप कोरडे होतात त्यासाठी बर्याचदा डॉक्टर artificial tear drops देतात त्यामुळे डोळ्यातला कोरडेपणा कमी होतो. ते ड्रॉप्स वापरून उन्हाळा सुसह्य होवू शकतो. आमच्या सारख्या सतत कॉन्टॅक्ट लेन्स लावाव्या लागणार्या लोकांना तर एरवीही बर्याचदा असे ड्रॉप्स वापरावे लागतात. यात काहीही अपाय नाही. एकदा याबद्दल डॉक्टरांना विचारून बघा. बरेच ड्रॉप्स over the counter मिळतात डॉक्टरच्या prescription ची गरज नसते पण तरीही डॉक्टरांना विचारून मगच वापरून पहा.
Use 'eyetone'
Use 'eyetone'
Use 'eyetone'
Use 'eyetone'
रेग्युलर काहीही त्रास नाही.
रेग्युलर काहीही त्रास नाही. फक्त दुपारी झोपून उठल्यावरच जळजळते >>>>>>> दुपारी झोपु नका.
मी कालच या त्रासाला सामोरी
मी कालच या त्रासाला सामोरी गेले आहे. जीवदया नेत्रप्रभा वापरून पहा.. बरे वाटते. शिवाय भरपूर पाणि पिणे, ताक असे थ्म्ड पदार्थ पोटात गेलेच पाहिजेत उन्हाळ्यात.
अश्विनीमामीना अनुमोदन, शरिरातली उष्णता कमी करण्यासाठी योग्य ते उपाय करा.. शिवाय योग्य ती चप्पल वापरा... प्लॅस्टिक किंवा रबर वापरल्याने उन्हाळ्यात डोळ्यांना सगळ्यात जास्ती अपाय होतो.
रामदेव बाबाचे दिव्य दृष्टी
रामदेव बाबाचे दिव्य दृष्टी नावाचे आय ड्रॉप आहे.. वापरा.. अतिशय गुणकारी आहे. http://www.home-remedies-world.com/divya-drishti.html
तळव्यांना कैलास जीवन ने मालिश
तळव्यांना कैलास जीवन ने मालिश ==> उत्तम उपाय
अजून एक उपाय आहे. तांदूळ दिवसभर पाण्यात भिजवायचे. रात्री थोडे गार दूध घालून मिक्सरमध्ये वाटून चांगली पेस्ट करायची. पातळ धोतराचा किंवा मऊ पंच्याचा एक रुमालाएव्ह्ढा तुकडा किंवा कॉटनचा रुमाल घेऊन त्यात ही पेस्ट घालून घड्या घालायच्या आणि पट्टी डोळ्यांवर ठेवायची. (घरच्या घरी आय पॅच). करून बघा. खरंच खूप गार वाटतं. वाटल्यास ज्या पाण्यात भिजत घालायचे त्यात थोडे गुलाबपाणीही घालता येईल. सुगंधी आय पॅच होईल.
काळजी घ्या.
जामोप्या, तुमचा निषेध! त्या
जामोप्या,
तुमचा निषेध!
त्या बिन्डोक रामदेव बाबाचं नाव लिहिलंत म्हणून.
बाजो,
हा व्हायरल प्रॉब्लेम आहे. हिवाळ्याचा उन्हाळा अचानक झालाय. झप्कन तापमाण वाढलं आहे. जळजळ सोबत माईल्ड बॉडी-एक अन सर्दी ही असते. असे पेशंट्स खूप येताहेत आजकाल.
कोणताही कॉलिरियम ड्रॉप टाका. बरे वाटेल. वर लिहिलेला 'आय्टोन' देखिल चालेल. अगदी भुक्कड असला तरी. पण महत्वाचं म्हणजे तुमच्या गावात डोळ्याचे डॉक्टर नाहीत का? त्या गरीबाला पण पोटाला कमवू द्या की. थोडं दान द्या त्यांनाही..
तेच मीपण म्हणतोय... थोडं
तेच मीपण म्हणतोय... थोडं त्या गरीब बाबालापण कमवू द्या की !