Submitted by शिल्पा८५ on 11 November, 2009 - 02:02
मला डोळ्यांच्या लेझर सर्जरीविषयी माहीती मिळेल का? कितपत सुरक्षित आहे ? side effects असतात का? मुंबईतील सर्वात चांगले Dr./ Hospital कोणते? चश्म्याचा नंबर पुर्णपणे खात्रीलायक जाउ शकतो का? मी breasfeeding करते तर अशावेळी करु शकते का? बाळाला काही त्रास नाही ना होणार? औषधांसहीत कीती खर्च येईल? please लवकरात लवकर मला माहीती पुरवा.........
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिल्पा, मी देखील डोळ्यांची
शिल्पा,
मी देखील डोळ्यांची लेसर सर्जरी केली आहे, ८ वर्षे झाली..अजुनतरी काही प्रॉब्लेम नाही. ( अहमदनगर्..डॉ.कांकरीया )
२-३ मिनीटे लागतात सर्जरी करायाला..आणि साधारण अर्धा दिवस हॉस्पीटल मध्ये रहावे लागते..
पण रिकव्हर होण्याचावेळ प्रत्येकासाठी वेगवेगळा असु शकतो. मला तर दोन दिवस डोळे सुद्धा उघडता येत नव्हते पण नंतर सगळे ओ़के.
माझ्या आईची पण डोळ्यांची लेसर सर्जरी केली केली होती १२ वर्षांपुर्वी...तीला देखील काही प्रॉब्लेम नाही.
ह्या सर्जरी मध्ये पुर्ण नंबर जाईल ह्याची खात्री नसते.. तसेच प्रत्येकावर ही सर्जरी करता येईलच ह्याची खात्री नाही..( it dependeds on Retina Thickness..as they remove few microns..)
तरी पण मी म्हणेन की ही सर्जरी फारच गरज असेल तरच करावी..कराण डोळ्यांचा स्टामीना कमी होतो ( माझा आणि आईचा अनुभव)
डोळ्यांचा नंबर २-३ असेल तर मी म्हणेन की सर्जरीची गरज नाही..
माझा नंबर -६.५ होता आणि मला जॉब मिळवताना प्रोब्लेम येणार होता म्हणुन हा निर्णाय घेतला.. ( आईचा -११ )
माझा पुर्ण नंबर गेला तर आईचा खुपच कमी झाला होता ( -१.५ ) पण चाळीशी नंतर परत थोडा वाढला.
मुम्बईतील डॉक्टारांबद्द्ल काही महिती नाही...
ह्या सर्जरीबद्दल नेटवर पण महिती मिळेल.
पनवेलमधे डॉ हळदनकर खूप फेमस
पनवेलमधे डॉ हळदनकर खूप फेमस आहेत्,डोळ्यांच्या ऑपरेशन साठी..
पनवेलमधे डॉ हळदनकर खूप फेमस
पनवेलमधे डॉ हळदनकर खूप फेमस आहेत्,डोळ्यांच्या ऑपरेशन साठी..
प्रत्येकाच्या कॉर्निया
प्रत्येकाच्या कॉर्निया थीकनेसवर अवलंबुन असतं लेसर सर्जरी होउ शकते की नाही ते. पण या सर्जरी नंतर डोळ्यांचा स्टामीना कमी होतो हे नक्की. खुपच गरज असेल तरच करावी ..
मी स्वतः पुण्यातल्या केळकरांकडे गेले होते, मला ते म्हणाले तुझा नंबर पुर्णपणे नाही जाणार. त्यांनीच सांगितलं लेसर सर्जरी करु नकोस म्हणुन.
डोळ्यांचा स्टॅमिना कमि होतो
डोळ्यांचा स्टॅमिना कमि होतो म्हणजे नक्कि काय होत?
डोळ्यांचा स्टॅमिना कमि होतो
डोळ्यांचा स्टॅमिना कमि होतो म्हणजे नक्कि काय होत? >>>>
सर्जरी पुर्वी तुम्ही जितकावेळ सलग वाचु शकता / सलग कंप्युटरवर काम करु शकता तेव्हढावेळ सर्जरी नंतर करु शकत नाही...डोळ्यांना लवकर थकवा जणवतो..हा माझा अनुभव आहे...इतरांचा अनुभव कदाचीत वेगळा असु शकतो..
धन्यवाद राहुल.
धन्यवाद राहुल.
लेजर आय क्लिनिक म्हणून मुंबईत
लेजर आय क्लिनिक म्हणून मुंबईत एक हॉस्पिटल आहे. तिथे बहुतेक ही सर्जरी होते. आधी एका ऑप्थल्मॉलोजिस्टला भेटा. ते सांगू शकतील. बाळावर तुमच्या सर्जरीचा काही परिणाम होत नाही. नंबर मोठा असेल, तर थोडाफार शिल्लक राहू शकतो..
ही सर्जरी मेडिक्लेम मध्ये कव्हर होत नाही.
शिल्पा पनवेल चे सुहास
शिल्पा पनवेल चे सुहास हळदिपुरकर आहेत.खूप चांगले डॉ आहेत. माझ्या माहितितल्या सगळ्यांचि ऑपरेशन झालि आहेत तिथे. Laxmi Eye Institute हॉस्पिटल चे नाव आहे.
Laxmi Eye Institute
Uran Road
Panvel - 410296, Maharashtra
Phone # - +912227452228, +9122227453145
माझ्या सासर्यांच चेंबुरला
माझ्या सासर्यांच चेंबुरला झालय हे ऑपरेशन. आत्ता मला डॉ. नाव आठवत नाहिये पण तुम्ही त्या एरिया मधे असाल तर विचारुन सांगेन.
धन्यवाद सर्वाना, खुप मदत
धन्यवाद सर्वाना, खुप मदत होतेय तुम्हा सगळ्यांच्या अनुभवांची......
माझा नंबर -५.५ आहे, गेले ८ वर्ष मी लेन्स वापरतेय, आता कंटाळा आलाय, आम्हाला थोड्या थोड्या दीवसांनी गावी जाव लागत, ईथ्ल्या सारखी स्वच्छता तेथे नसते, शिवाय तिथेही घरातलं सगळ मलाच करायला लागत, चुलीवर जेवण, कपडे वगेरे, आणि आता तर बाळाला सांभाळुन कठीणच प़डणार आहे, गावच्या ठीकाणी चश्मा, लेन्स सांभाळण मला तरी थोड जडच जात. चुलीकडे चश्मा लावायच म्हट्ल तरी तो धुर, सततची उष्णता, त्यामुळे येणारा घाम नाही जमत बुवा( चश्म्याच्या काचा जाड दीसतात, लग्नाच्या वेळ्चे सगळे समारंभ लेन्स लावुन केले त्यामूळे सगळ्या नातेवाईकांना माहीत नव्हत मला नं. आहे ते आनी आता चश्मा(तो ही जाड काचेचा) दीसला की(अग्दी प्रत्येक वेळी) लगेच चोकशा, कुरबुरी सुरु होतात) आणी लेन्स जास्त वेळ वापरता येत नाहीत आणि आगीच्या एवढ्या close contact मध्ये वापरण risky वाटत. कुठेही १ दी. जायच म्हट्ल तरी चश्मा, लेन्स, लेन्स सोल्यशन सगळ बोचक घेऊन बाहेर पडाव लागत, picnic enjoy karta yet nahet, waterpark, waterfall, watergames नाही अनुभवता येत, लांब बसुन ईतरांना एन्जॉय करताना बघुन समाधान मानाव लागत. असो पण आता प्रेग्नंसी, डीलीव्हरी नंतर पुन्हा जॉबवर रुजु व्हायच आहे, computerchach काम आहे. पुन्हा नोकरी, घर कसरत करायची आहे आणि आता बाळ म्हण्जे बघाय्लाच नको , म्हणुन वीचार करत होते की atleast ह्या कटकटीतुन तरी सुटका झाली असती तरी बरं झाल असत....... बिनधास्त झोकुन देता आल असत, थांब चश्मा लावते, लेन्स लावते म्हणण तरी टाळ्ता आल असत.
मला किती खर्च येतो ते सांगेल का?
हा प्रश्न विचारला ते बरं
हा प्रश्न विचारला ते बरं झालं. मलाही हा प्रश्न पडलाच आहे.
मला माझ्या डोळ्यांच्या डॉक्टरांनी लेजर उपचार करून घे, म्हणजे नंबर जाइल व निदान वयाच्या ४५ वर्षापर्यंत तरी चष्म्याची गरज लागणार नाही असे सांगितले. आत्ता इथली चर्चा वाचून मी यावर विचार करतोय, बघू.
खर्च साधारणतः १४-१५ हजाराच्या आसपास येइल असे ते म्हणाले, पण नक्की चौकशी केली नाही.
>>कुठेही १ दी. जायच म्हट्ल तरी चश्मा, लेन्स, लेन्स सोल्यशन सगळ बोचक घेऊन बाहेर पडाव लागत, picnic enjoy karta yet nahet, waterpark, waterfall, watergames नाही अनुभवता येत, लांब बसुन ईतरांना एन्जॉय करताना बघुन समाधान मानाव लागत.>>
अगदी, पोहताना अथवा पावसात भिजताना हे जाणवत, फूटबॉल खेळताना अवघड जातं, रात्री अथवा रविवारी दुपारी पुस्तक वाचत मस्त झोप आली की लगेच डो़ळे मिटून ताणून द्यावी म्हटलं की हा चष्मा डोळे उघडवतो.
rangaseth, >>>खर्च साधारणतः
rangaseth,
>>>खर्च साधारणतः १४-१५ हजाराच्या आसपास येइल असे ते म्हणाले>>>>
हा बहुतेक एका डोळ्याचा खर्च असेल... कारण २००२ मध्ये मी जेव्हा अहमदनगर मघ्ये ही सर्जरी केली होती मी दोन्ही डोळ्यांचे २२०००/- दिले होते...त्याच वेळी माझ्या एका मित्राने पुण्यात सर्जरी केली त्याला
दोन्ही डोळ्यांचे ३५०००/- लागले होते...
लेसर सर्जरी चे पण प्रकार असतात PRK आणि LASIC असे...सघ्या प्रचलीत आहे ती LASIC..
पण कोणती सर्जरी करयाची हे डोळ्यांवर अवलंबुन असते..( Cornia Thickness वगैरे..)
..माझी ही महिती ७-८ वर्षांपुर्वीची आहे...त्यमुळे..चु.भु.द्या.घ्या..
सर्जरी केल्यावर जेव्हा प्रथम
सर्जरी केल्यावर जेव्हा प्रथम आपल्याला स्पष्ट दिसायला लगते तेव्हा...
" डॉक्टरसाब अब मै सब कुछ देख सकता हु..." अशी एकदंम पिक्चररमध्ये दाखवतात अशी फिलींग येते..
मी १९९७ करून घेतली आय सर्जरी.
मी १९९७ करून घेतली आय सर्जरी. ग्रँटरोड ला एक डॉक्टर आहेत शाह नावाचे, त्यांच्याकडून.
दोन्ही डोळ्यांकरता १८००० रुपये खर्च आला होता. पण जास्त नंबर असेल तर ही सर्जरी करून घ्यावीच.
>>>>जायच म्हट्ल तरी चश्मा, लेन्स, लेन्स सोल्यशन सगळ बोचक घेऊन बाहेर पडाव लागत, picnic enjoy karta yet nahet, waterpark, waterfall, watergames नाही अनुभवता येत, लांब बसुन ईतरांना एन्जॉय करताना बघुन समाधान मानाव लागत.
हे अगदी बरोबर. म्हणूनच ही सर्जरी करावी. या सगळ्या त्रासातून सुटका होते.
>>>>>" डॉक्टरसाब अब मै सब कुछ देख सकता हु..." अशी एकदंम पिक्चररमध्ये दाखवतात अशी फिलींग येते..
अगदी अगदी
शिल्पा, माझी पण लेजर सर्जरी ५
शिल्पा, माझी पण लेजर सर्जरी ५ वर्षापुर्वी झाली आहे. अजुन तरी काही प्रोब्लेम नाही. हा...वर ब-र्याच जणांनी सांगीतल्याप्रमाणे डोळे लवकर थकतात. डोळ्यांचे व्यायाम चालू ठेवायचे....
पण तुला लहान बाळ आहे ना...तर खालच्या सगळ्या गोष्टींचा विचार कर.
१) मला पहील्या दिवशी पट्टी बांधली होते. सकाळी ११ वाजता सर्जरी झाल्यावर साधारण ५ वाजता पट्टी काढली. आणि त्या दिवसभर आणि रात्रभर सुद्धा खुप डोके दुखत होते. डॉ. नी पेन कीलर दिल्या होत्या. पण तरीही डोके दुखत होते. रात्रभर मला झोप लागली नव्हती. तु बाळाला फीड करतेस तर मग या गोळ्या घेऊन फिड करता येइल का हे विचारुन घे. आणि त्या दिवसभर आणि रात्रभर बाळाला सांभाळायला कोणीतरी लागेल.
२)पट्टी काढल्यावर पण एकदम दिसायला लागत नाही. पहील्या दिवशीतर चेहरे पण नीट दिसत नाहीत. दुसर्या दिवशी थोडेफार दिसायला लागत. म्हणजे मोठे मोठे ऑब्जेक्ट्स. पेपरमधले फक्त पेपरच नाव नीट दिसल होत मला. आणि चेहरे नीट ओळखता येतात. मग तिसर्या दिवसापासुन हळू हळू नीट दिसायला लागत. म्हणजे पेपर मधल्या हेडलाइन वगैरे. पुर्ण नीट दिसायला साधारण ५ दिवस तरी लागतात. मग या काळात तुला बाळाला बघायला कोणीतरी लागेल. त्याची आंघोळ, गुटी, ऑषध द्यायला मदत लागेल. शिवाय डोळ्यात ड्रोप्स टाकून डोळे बंद करावे लागतात दिवसभरात ४-५ वेळा तरी.
३) साधारण ६-७ दिवस तरी फोडणी देणे, कांदा चिरणे ही कामे करता येत नाहीत.
४) ८-१० दिवसांनतर काही प्रॉब्लेम नाही. काही वेळा ड्रॉप्स टाकावे लागतात. त्यामुळे तु ऑफीस जॉइन करण्यापुर्वी आधी १५ दिवसतरी सर्जरी कर. मी पण १५ दिवस घरी होते.
मला ५ वर्षांपुर्वी २०००० खर्च आला होता पुण्यामधे.
>>>>जायच म्हट्ल तरी चश्मा, लेन्स, लेन्स सोल्यशन सगळ बोचक घेऊन बाहेर पडाव लागत, picnic enjoy karta yet nahet, waterpark, waterfall, watergames नाही अनुभवता येत, लांब बसुन ईतरांना एन्जॉय करताना बघुन समाधान मानाव लागत
हे मात्र अगदी खरय. चष्मा आणि लेन्स मुळे खुप लिमीटेशन येतात् डोळ्यांचा नंबर जास्त असेल तर. सर्जरी नंतर नो प्रॉब्लेम.
thanks again to
thanks again to all.
मुम्बईमध्ये कुणी केले आहे का ऑपरेशन? कुणी specialist suggest करु शकेल का?
मी नेटवर सर्च केले तर खुपच कॉस्ट दीस्ली पण ईथे तर सगळ्यांच्या अनुभवावरुन तरी जरा reasonable वाटतय. ईथे माबो वर कोणी डोळ्यांचे डॉ. नाहीत का? सभासद किंवा काही म्हणुन... जे detail माहीती देऊ शकतील? कारण मला पुर्ण (atleast sufficient) माहीती काढुन नंतरच मि. कडे विषय काढायचा आहे. बाळ लहान असल्याने मी बाहेर जाऊन enquiry करु शकत नाही ना म्हणुन please help me......
माझा डोळ्याचा नंबर खुप जास्त
माझा डोळ्याचा नंबर खुप जास्त आहे. तेव्हा डोळ्याचे आरोग्य चांगले रहावे यासाठी डोळ्यांचे काही व्यायाम कोणाला माहिती आहेत का?
आणखी एक उपप्रश्न, एकदा का
आणखी एक उपप्रश्न, एकदा का लेजर उपचार केले की चष्मा लावावा लागत नाही. मग डोळ्यांखाली असणार्या वर्तुळांवर काही उपाय आहेत काय? म्हणजे ते कमी कसे करायचे अथवा शक्य असल्यास पूर्णपणे नाहीसे करायचे?
प्लीज मदत करा ना............
प्लीज मदत करा ना............
शिल्पा ८५ माझी एक मेत्रीण आहे
शिल्पा ८५ माझी एक मेत्रीण आहे वाशीच्या होस्पीटल मधे आय सर्जन तीला दोन दिवसात फोन करुन विचारुन सांगेन.
धन्यवाद स्वाती, मी वाट पहातेय
धन्यवाद स्वाती, मी वाट पहातेय तुझ्या ऊत्तराची.........
मुंबई मध्ये डॉ. मेहता म्हणुन
मुंबई मध्ये डॉ. मेहता म्हणुन प्रसिध्द डोळ्याचे डॉ. आहेत.
मुंबईत कुंलाबा बस डेपो जवळ त्याचे रुग्णालय आहे. ते वेगवेगळ्या देशात सुध्दा जाऊन शस्त्रक्रिया करतात माझे जवळ जवळ १० ते १२ वर्षाचे संबध आहेत. त्याचा पत्ता देत आहे जाऊन बधा कसे वाटते
http://www.mehtaeyeinstitute.com/
The Mehta International Eye Institute
The Center for Advanced Eye Care, Surgery, Education and Research.
Asia's most advanced Eye Center
An ISO 9001-2000 Certified
Institute
A revolutionary “super-fast” dual energy, 500-Hz LASIK
Excimer Laser system with unsurpassed performance
Offering once again for the first time in the world the new
innovative IDCA (Intelligent Dynamic Customized Aberration)
coupled with five-dimensional 1,050 Hz turbo rotation
balance eye tracker, with Cyclotortion Tracker which
Guarantees results.
The Dawn of a new vista on Superlative Advanced Eye Care
Dr. Keiki R. Mehta, The
Surgical Chief & Medical
Director of the Institute, who
has recently been awarded the
Padmashree by the President
of India for his contribution to
Ophthalmology invites you to
visit his State-of-the-Art
Institute, considered to be
Asia's foremost Eye Institute,
and one of the world's premier
ophthalmic treatment, research
and education center.
Read below for more
information.
OUR SPECIALITIES INCLUDE
The pioneer in Intraocular implants, Glaucoma,
Phacoemulsification and LASIK, Dr. Keiki R. Mehta, the
Medical Surgical Director and Chief of the MIEI who has
many Gold Medals to his credit, states that "eye services at
the MIEI are comprehensive and include Cataract Surgery,
Glaucoma treatment / surgery, LASIK on the latest,
AMARIS Laser, the first in India and also the first LASIK
unit in Asia, Retina treatment / surgery, Cornea Graft,
Contact Lenses, Paediatric eye care, Squint / lazy eyes,
Low Vision Clinic, overall, the MIEI strives to maintain the most
up-to-date facilities, with the state-of-the-art technology, thus
enabling our patients to receive the best care possible.
The Mehta International Eye Institute (MIEI) is recognized
as a prominent center for patient care, vision research and
physician education. Our State-Of-The-Art facility is oriented
toward providing patient-friendly care. Our renowned physicians
possess the clinical and surgical expertise to provide consultations
and medical and surgical care for complex ophthalmic problems.
लासिक संबंधी माहिती-१. लासिक
लासिक संबंधी माहिती-१.
लासिक संबंधी माहिती-२.
आपण सर्व सूज्ञ आहात. 'नेट सॅव्ही' आहात. वानगीदाखल वरील लिंक तपासा.
नंबर कमी करण्याचे 'ऑपरेशन' हे ऑपरेशन आहे हे आपण विसरतो. जगातील प्रत्येक ऑपरेशन ला, काही 'फेल्युअर रेट' आहे. जर, तुमचे ऑपरेशन 'फेल' झाले तर काय होईल? याचा कधी विचार केलाय का?
इतर ऑपरेशन्स फेल होतात तरी ती करतात. का? उदा. तुम्हाला मोतिबिंदू आहे. ऑपरेशन करून १००० पैकी ३ रुग्णांचे डोळे कायमचे बंद होणार आहेत. सुमारे .३% 'failure rate' is acceptable in surgical procedures. पण, ऑपरेशन न करता, १००० पैकी १००० रुग्णांचे डोळे त्या आजारामुळे बंद पडणारच. याच प्रकारे risk benefit ratio हा LASIK (Laser Assited In Situ Keratomielusis) बद्दल काढून पहा. ऑपरेशन न करता किती लोकांचे डोळे केवळ चष्मा असल्यामुळे बंद पडणार आहेत?
जरा विचार करा. केवळ मला चप्पल आवडत नाही. मग पायाला नाल ठोकून घेऊ का? ...
असो. शेवटी डोळा तुमचा आहे, अन माझ्या व्यवसाय बंधूंच्या पोटापाण्याचाही प्रश्न आहे.
ही सर्जरी मेडिक्लेम मध्ये
ही सर्जरी मेडिक्लेम मध्ये कव्हर होत नाही. >>> जामोप्या आता नाहीत, पण त्यांनी वर लिहिलेल्या या वाक्यामधे करेक्शन करायचं आहे मला. एखाद्याचा नंबर ७ पेक्षा जास्त असेल तर ती कॉस्मेटिक सर्जरी नाही. ती मेडिकल ट्रीटमेंट कन्सिडर करुन इन्शुअरन्स क्लेम करता येतो. माझ्या घरामधे केला गेला आहे आणि पैसेही परत मिळाले. सर्जरी - २००६ कॉस्ट - २५हजार. डॉक्टर - माधुरी चांदोरकर, पौड रोड आयडियल चेंबर्स. आता माहित नाही.
आपली माहिती बरोबर आहे... ..
आपली माहिती बरोबर आहे... .. त्यामुळे ७ पेक्षा जास्त नंबर असेल तर क्लेम मिळतो. पण ही माहिती सर्जरी करणारे डॉक्टर देतातच .. कमीनंबर असताना सर्जरी करणे हे कॉस्मेटिक मानले जाते व क्लेम मिळत नाही.
ता क . जामोप्या मरते नहीं .
जामोप्या मरते नहीं .>>> ओ मी
जामोप्या मरते नहीं .>>> ओ मी असं कधी म्हणाले. मी म्हटलं जामोप्या आता माबोवर नाहीत. ते अवतारी पुरुष असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या रुपात त्यांचं अस्तित्व आहेच.
एप्रिल २०१३मध्ये मला लेसिक
एप्रिल २०१३मध्ये मला लेसिक करुन एक वर्ष होईल. माझा नंबर पूर्णपणे गेलाय.
मला अजूनतरी इतर कसलाही प्रॉब्लेम आला नाहीये.
मला सर्जरी करुन ३-४ वर्ष झाली
मला सर्जरी करुन ३-४ वर्ष झाली आहेत.. नंबर तर पुर्णपणे गेलाच पण चाळीशी चा चश्मा ही लागला नाहीये !! डोळ्यांचा कोरडेपणा सोडल्यास काही त्रास नाही.
चमकी, डोळ्यांचा कोरडेपण
चमकी, डोळ्यांचा कोरडेपण म्हणजे काय? डोळ्यात ओलसरपणा जाणवत नाही की काय?
Pages