" कथा, कविता, लेख लिहिण्याची उदासीनता!"
....... खरं तर या विषयावर लेख लिहिण्याचा विचार खूप दिवसांपासून मनामध्ये घोळत होता. आज लिहू, उद्या लिहू असं करता करता राहूनच जायचं,! जाम कंटाळा यायचा. अशा प्रक्रियेला 'प्रोक्रास्टीनेशन' म्हणतात.म्हणजे आजचं काम उद्यावर आणि उद्याचं काम परवावर! तसं बघितलं तर प्रत्येक उदयोन्मुख लेखकाच्या मनामध्ये खूप सार्या कल्पना आकार घेत असतात. काही तो कागदावर उतरवतो तर कधी तो विचार मनातच राहून जातो. याला कारण म्हणजे आपल्या मनातील अनामिक भीती! आपले लिखाण इतरांना आवडेल की नाही! त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावर, काय प्रतिसाद देतील. ही माझी कल्पना बालिश तर नाही ना वाटणार!